Monday , 23 July 2018
Breaking News
Home » लोक सहभाग » लोक मत

लोक मत

निर्णय मात्र कोणीच …..?

घोषणांच्या साखळदंडात तुला बंदिस्त करून . तुझ्या विच्यारांचा मुडदा पाडला जातोय . जयंतीच्या माध्यमातून . कोण म्हणत भिंम डोक्यात घ्या . कोण म्हणत भिंम डोक्यावर घ्या कोण म्हणत कृतीत घ्या. कोण म्हणत पुस्तकात घ्या . कोण म्हणत पुतळ्यात घ्या . तर कोण म्हणत कृतीत घ्या . मी म्हणतो भिंमांने काय काय, केलं यावर नस्त तोंडसुरव घ्या . शिका सघंटित व्हा ... Read More »

बहुजन समाज जागा झाला तर काय होईल?

भारत हा एकमेव देश आहे जिथे माणसाच्या श्रमाला किंमत नाही,पण जात व धर्माला किंमत व प्रतिष्ठा आहे.जगात शिक्षणाला खूप महत्व आहे त्यातही वेगवेगळ्या डिंगऱ्या पदव्या मिळविल्या असल्यास त्याला समाजात देशात खूप मानसन्मान मिळतो.त्याला कोणी जात धर्म विचारत नाही. भारतात मात्र कितीही  पदव्या असल्या तरी त्यांची जात व धर्म खूप महत्त्वाचा ठरतो.देशात तीन टक्केनी सर्वच ठिकाणी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.देश स्वतंत्र ... Read More »

भंडारा लोकसभा पोटनिवडणूक : आंबेडकरी राजकीय पक्ष आणि वस्तुस्थिती

अघोषित आणीबाणीचा सामना करित असलेल्या परिस्थितीत कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुका या २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मिनी आवृत्ती म्हणून पाहिल्या जात आहेत. त्यामुळे या निवडणुकीला राष्ट्रीय पातळीवर अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील पालघर आणि भंडारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूककडेही त्याच अनुषंगाने पाहिले जात आहे.  परंतु त्याहूनही अधिक महत्त्वाचे म्हणजे या निवडणुकीत एका अत्यंत महत्वपूर्ण ऐतिहासिक निवडणुकीतील पराभवाचे स्मरण करून ... Read More »

संविधान आणि संविधानिक मूल्ये

काँग्रेस ने दिल्लीत “संविधान बचाव” मोहिम सुरू केली. हा राजकारणाचाही भाग असु शकतो. पण आज संविधान न बदलविता सुध्दा देशात अराजकता नंगानाच करीत आहे. संविधान हतबल झालं आहे. काही न्युज चैनल कर्नाटक निवडणुकी नंतर हिंदू राष्ट्र येणार अशा गप्पा मारीत आहे. अटलबिहारी बाजपेयी यांनी घटना समीक्षा आयोग स्थापन केला होता. त्यात ते यशस्वी झाले नाहीत. राज्यसभेत 2022 ला बहूमत प्राप्त ... Read More »

बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व आणि विचार हे व्यवस्था बदलाचे एक विधायक आणि शाश्वत परिवर्तनाचे उर्जा स्त्रोत

स्वतंत्र भारतातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव आणि राजकीय छळ कुणी केला बाबासाहेब आंबेडकर समग्र भारतीय समाजाच्या मूलभूत हक्क आणि अधिकारासाठी आजीवन लढले, ज्या मुल्यांसाठी लढले, ज्या वर्ग समुहासाठी  लढले त्या सर्व घटकांना  बाबासाहेबांच्या  हयातभर  ज्या व्यवस्थेने  सतत कडाडून विरोध केला ती पुतना मावशी व्यवस्था गेले काही दशकांपासून आंबेडकरांचे गुणगान गाताना दिसु लगली आहेत.        मागील दोन ... Read More »

सोशल मीडियातून आजचा चर्चेचा विषय

आसीफा, लोयाच्या जोडीला पुजा सकट न्याय मिळालाच पाहीजे आसीफा, लोयाच्या जोडीला पुजा सकट. न्याय मिळालाच पाहीजे. फालतु विषयांतर करणार्‍या मुद्द्यांवर चर्चा करणार नाही. किशोर पुष्पा काशिनाथ पूजा, भीमा-कोरेगाव दंगलीची साक्षीदार असतांना तिच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची होती? पूजाला वारंवार धमक्या येत होत्या त्या बाबतीत पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली होती तिने, अजून काय करायला हवे होते? योगेश भीमराव गाडे   Read More »

छत्रपती शिवाजी महाराज यांनी समतावादी स्वराज्य स्थापले!

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे समतावादी विचारांचे मूर्तीमंत प्रतिक!!! जगभरात ज्यावेळी भारताचा ऊल्लेख होतो त्यावेळी शिवरायांचा नामोल्लेख होण्याशिवाय गत्यंतर नाही . महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेल्या या सुपुञाने आपल्या पराक्रमाने शून्यातुन स्वराज्याची निर्मिती केली शेतकरी, कष्टकरी, सर्व सामान्य जनतेला जात पात न बघता सोबत घेऊन स्वतःच राज्य निर्माण केले व समतावादी स्वराज्याचा संकल्प साधला.    ३ एप्रिल  १६८० रोजी छत्रपतीपती शिवरायांचे निधन  झाले ... Read More »

बाबासाहेब नाव कसे झाले

बाबासाहेब नाव कसे झाले बाबासाहेबांना “बाबासाहेब” हे संबोधन कसं सुरू झालं? मूकनायक सुरू केल्यानंतर त्याची कचेरी होती, दामोदर हॉल परेल येथे. त्या कचेरीत बाबासाहेबांचे येणे जाणे होत असे. पण पूर्णवेळ तिथे थांबणे शक्य नव्हते. म्हणून खेडेगावातून शहरात शिकण्यासाठी आलेल्या ०७ मुलांना बाबासाहेबांनी तिथे ठेवले होते. तिथे ती मुलं अभ्यासही करत असत आणि कचेरीचे कामही पाहत असत. टिळक निर्वतले होते. त्यांना ... Read More »

कॉमन मिनिमम अजेंडा

२०१४ च्या विधानसभेला भारिपला सुमारे साडेपाच लाख आणि बसपाला सुमारे अकरा लाख एकोणनव्वद हजार मतदान झालेले होते. सुमारे सतरा लाख ही निर्णायक मतं आहेत. एकत्रित आली तर काही प्रबळ मतदारसंघात अपेक्षित परिणाम आणला जाऊ शकतो. रामदास आठवले भाजपसोबत असल्याने त्यांची समर्थक मतं भाजपला आणि जोगेंद्र कवाडे आणि राजेंद्र गवई यांची समर्थक मतं काँग्रेसला जाताना दिसतात. त्या मतांना वळवता येऊ शकते. ... Read More »

आझाद मैदानातील निळा एल्गार

प्रा. प्रतिमा परदेशी   देशातील शेतकरी, दलित, बहुजन, कामगार कष्टकरी, सकल स्त्रिया अस्वथतेच्या उंबरठ्यावर आहेत. त्यातून एक असंतोष साकार होत आहे. या सामाजिक घटकात कमालीचा असंतोष पाहायला मिळतो, त्याची कारणे आजच्या परिस्थितीत पहायची झाल्यास २०१४ पासून सत्ताधारी वर्गाने चालविलेल्या धोरणात प्रामुख्याने ती दिसत आहेत. लोकशाही मार्गाने निवडून येत लोकशाही प्रणालीचाच घात करण्याचे प्रकार वारंवार देशातील जनता अनुभवत आहे. सरकार विशिष्ठ ... Read More »