Friday , 15 December 2017
Breaking News
Home » Breaking News

Breaking News

नीरा-भीमा नदीजोड योजनेच्या बोगद्यात दुर्घटना; सात जण ठार

पुणे – पुण्यात सोमवारी भीमा-नीरा नदीजोड प्रकल्पाचे बांधकाम सुरू असताना बोगदा कोसळून सात मजुरांचा मृत्यू झाला आहे. भिगवण जवळील अकोले गावात नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पातील बोगद्याचे बांधकाम सुरु होते. येथे १५० मीटर खोल बोगदा तयार करण्यात येत असून या बोगद्यातून बाहेर येताना क्रेन उलटली. त्यामुळे अपूर्णावस्थेत असणारे येथील बांधकाम कोसळले. सध्या अग्निशामन दलाचे जवान या ठिकाणी दाखल झाले असून त्यांनी बचावकार्य ... Read More »

डिसेंबरमध्ये राहुल गांधींचा राज्याभिषेक?

नवी दिल्ली – अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रक्रियेला येत्या १ डिसेंबरपासून सुरुवात होणार असून १९ डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन नव्या अध्यक्षाची घोषणा होणार आहे. दरम्यान, ४ डिसेंबर रोजीच पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे अध्यक्ष बनण्याची शक्‍यता आहे. विद्यमान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक आयोजित केली होती. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे ... Read More »

भारतात माझ्या जीवाला धोका – विजय मल्ल्या

नवी दिल्ली – भारतात माझ्या जीवाला धोका आहे असे आता ९ हजार कोटींचे कर्ज बुडवणाऱ्या विजय मल्ल्याने म्हटले आहे. सोमवारी वेस्टमिनिस्टर कोर्टात प्री-ट्रायलसाठी विजय मल्ल्या आला होता. त्यावेळी त्याच्या वकिलांनी विजय मल्ल्याच्या जीवाला भारतात धोका असल्याचे पत्रकारांना सांगितले. विजय मल्ल्याचीच भूमिका वकिलाने मांडली. मात्र हा विजय मल्ल्याचा नवा कांगावा आहे ही बाब उघड आहे. एकीकडे विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण करण्यासाठी भारत ... Read More »

काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचं निधन

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचं आज प्रदीर्घ आजारानं वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झालं. गेल्या नऊ वर्षापासून ते कोमातच होते. येथील अपोलो रुग्णालयात आज त्यांची प्राणज्योत मालवली. २००८ पासून आजारी असलेले प्रियरंजन दासमुन्शी नऊ वर्षापासून कोमातच होते. त्यांच्यावर नऊ वर्षापासून अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार घेत असताना त्यांना लकवा मारला होता ... Read More »

कार्ती चिदंबरम यांना परदेशी जाण्यास सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी

नवी दिल्ली – माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्यावर आर्थिक घोटाळ्यांचे आरोप असल्याने त्यांना परदेशात जाण्यास बंदी घालण्याची मागणी नुकतीच सीबीआयने केली होती. मात्र, लंडनमधील केंब्रिज विद्यापीठात त्यांच्या मुलीला प्रवेश घ्यायचा असल्याने तिच्यासोबत जाण्यासाठी सुप्रीम कोर्टाने त्यांना आज परवानगी दिली. न्यायालयाच्या परवानगीनुसार, २ डिसेंबर रोजी कार्ती चिदंबरम लंडनला जाणार आहेत. त्यानंतर १० डिसेंबर रोजी ते भारतात ... Read More »

अंधुक प्रकाशामुळे कोलकाता कसोटी अनिर्णित

कोलकाता – अंधुक प्रकाशाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने कोलकाता कसोटीत आपला पराभव टाळला आहे. दुसऱ्या डावात भारताने श्रीलंकेसमोर विजयासाठी २३१ धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराट कोहलीच्या शतकाच्या आधारावर भारताने दुसऱ्या डावात ३५२ धावांवर आपला डोव घोषित केला. कोहलीने दुसऱ्या डावात १०४ धावांची शतकी खेळी केली. अखेरच्या दिवशी श्रीलंकेला उरलेली दोन सत्र फलंदाजी करणं भाग होतं. त्यामुळे कोलकाता कसोटी रंगतदार अवस्थेत पोहचली. ... Read More »

‘रामाची पूजा फक्त उत्तर भारतात; कृष्णाची पूजा देशभरात’

गाझियाबाद – २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. भाजपचे श्रीराम मंदिर पूर्ण करण्याचे प्रयत्न निष्फळ करण्यासाठी समाजवादी पक्षाने आता कृष्णाचा मुद्दा पुढे आणला आहे. अखिलेश यादव यांनी श्रीकृष्णाचा ५० फूट उंचीचा पुतळा स्थापण्याची घोषणा केली केली आहे. तर आता मुलायम सिंह यादव यांनी श्रीरामाची पूजा फक्त उत्तर भारतात केली जाते तर श्रीकृष्णाची पूजा देशभरात केली जाते असे वक्तव्य केले आहे. ... Read More »

गुजरातमध्ये काँग्रेस – पाटीदार आंदोलन समितीचे कार्यकर्ते भिडले

अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकीत हार्दिक पटेल सोमवारी (आज) काँग्रेसला पाठिंबा जाहीर करणार असतानाच सुरतमध्ये काँग्रेस आणि पाटीदार आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेसने रविवारी रात्री ७७ उमेदवारांची यादी जाहीर केल्याने पाटीदार समितीचे कार्यकर्ते नाराज असून सुरतमधील काँग्रेस कार्यालयात काम होऊ देणार नाही असा इशाराच पाटीदार समितीने दिला आहे. त्यामुळे आता हार्दिक पटेल पाठिंबा जाहीर करणार की नाही याकडे सर्वांचे ... Read More »

‘सिद्धरामय्या दहशतवादी कसाबचीही जयंती साजरी करू शकतात’

कर्नाटक – कर्नाटकचे मुख्यमंत्री के सिद्धरामय्या यांनी उद्या दहशतवादी अजमल आमिर कसाबची जयंती कर्नाटकात साजरी केली तरीही आश्चर्य वाटणार नाही, अशी टीका करत अनंतकुमार हेगडे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांनी याआधी टिपू सुलतानच्या जयंतीवरूनही सिद्धरामय्यांवर टीकेचे बाण चालवले होते. आता पुन्हा एकदा हाच मुद्दा पुढे करत त्यांनी पुन्हा एकदा सिद्धरामय्यांवर टीका केली आहे. कित्तूरची राणी ... Read More »

डाळ निर्यातीवरील निर्बंध हटवले; केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली – देशात डाळीचे विक्रमी उत्पादन झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्व प्रकारच्या डाळींच्या निर्यातीवरील निर्बंध हटवले आहेत. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे डाळ उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. निर्यातीवरील निर्बंध हटवल्याने डाळीला चांगला भाव मिळू शकेल. यंदा देशभरात सर्व प्रकारच्या डाळींचे विक्रमी उत्पादन झाले आहे. देशात यापूर्वी दरवर्षी डाळींचे उत्पादन १७९ लाख टन होते. यावर्षी हे प्रमाण २२० लाख टनांवर पोहोचले आहे. ... Read More »