मुळातच हे अटकेपार प्रकरण फारच valourized वाजवीपेक्षा बढ़ाया मारून आणि uncritical पद्धतीने सांगितल्या जाते. अटक स्वारी ही 1752 च्या करारानुसार मुघल सत्तेच्या रक्षणासाठी केल्या गेली होती. त्यामागे कोणतेही strategic objectives नव्हते. या स्वारी मुळे मराठी राजवटीचा कोणताही फायदा झाला नाही. उलट सिंधु नदी पार करणे ही दुर्रानी साठी फार मोठी red line होती. त्यामुळे पानिपत घडले. तसेच कोणत्याही नवीन alliances झाल्या नाहीत. मुळातच ज्या लोकांनी हे घडवून आणले ते फारच सुमार दर्जाचे military leaders होते. मोहीम राबवण्याचा master class शिवाजी महाराजांनी दिला आहे त्यांच्या दक्षिण मोहिमेतून. त्यात मराठी राज्याला strategic depth मिळाली (जिंजीचा किल्ला). अनेक लढाया जिंकल्या. कुतुबशाही सोबत alliance झाली. अर्धा खर्च Kutubshah नेच उचलला. ही युती कुतुबशाही राजवटीचा मुघलांनी संपूर्ण पराभव केल्यावरच संपली. मोहिमेचे financial architecture सुद्धा बळकट होते. Even Adilshahi state maintained neutrality. याउलट अटकेच्या स्वारीमुळे प्रचंड कर्ज झाले. शिखांच्या अथवा भरतपुरच्या जाट राजवटीसोबत alliances नाही झाली. मुघलांच्या वजीर नवाब असलेल्या शुजा उद दौला याच्यासोबत सुद्धा संबंध खराब झाले इतके की त्याने दुर्रानीच्या मोहिमेला आर्थिक सहाय्य केले (याचे कारण धर्म नव्हते). मुळातच अटक स्वारी आणि पर्यायाने पानिपतची catastrophe ही बाजीरावाच्या उत्तरेकडील चुकीच्या धोरणांचा परिपाक होते. एवढ्या प्रचंड मोठ्या catastrophic घटनेकडे आपण critically बघत नाही हे महाराष्ट्रातील historiography चे मोठेच वैशिष्ट्य आहे. आपण अटक हे शहर युद्ध न करता जिंकले आणि युद्ध न करता हरले. मात्र, त्यामुळे दुर्रानीच्या आक्रमणाला उगाच निमंत्रण मिळाले. याउलट शिवाजी महाराज यांच्या दक्षिण मोहिमेचे नीट strategic आकलन केल्या जात नाही. दक्षिण मोहीम झाली नसती तर कदाचित Mughal-Maratha War (1681-1707) मध्ये मराठी राज्य टिकले असते की नाही हा प्रश्नच आहे. शिवाजी महाराज यांनी राज्यनिर्मिती केली याचे आश्चर्य नाही. आश्चर्य याचे आहे की इतक्या मर्यादित human, material आणि political resource वर ते निर्माण केले.