- 16
- 1 minute read
अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !
अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !
ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश म्हणतो ते तिथल्या निवडणूक पद्धतीमुळे. पण अमेरिका त्यांच्या नागरिकांसाठी म्हणजे श्वेत वर्णियांसाठी लोकशाहीवादी आहे. इतरांसाठी नाही. हे त्यांच्या लोकशाहीचे खरे अंतरंग.
आजची अमेरिका लोकशाहीवादी आहे हा प्रचार आहे. अमेरिकेचा खरा अंतस्थ पिंड विस्तारवादी आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर लौकिक अर्थाने साम्राज्यवाद ढासळत असताना नव्या युगाचा आर्थिक, सामरिक, तंत्रज्ञानाने युक्त भांडवली साम्राज्यवाद अमेरिकेने खरे तर उदयाला आणलेला.
जगातील सर्वाधिक प्रभावी प्रचार आणि प्रसार माध्यमातून प्रकट होत असल्याने आपल्याला तो देश लोकशाहीवादी वाटतो खरंतर आपलाही तसा भ्रमच आहे असे म्हणावे लागेल. जगालाही दाखवण्याचा चेहरा असाच आहे. पण अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद आहे.
लोकशाहीवादी बुरखा आणि व्यवस्थेचा अंगरखा पांघरून विस्तारवाद कायम ठेवलेला युरोपियन जीन्स आहे हेच अधिक खरं.
साम्राज्यवादाच्या लालसेतून युरोपातील विविध देशांतून व्यापार आणि शेतीसाठी अमेरिकन भूमीत उतरलेले युरोपियन श्वेत वर्णीय खरे तर आजच्या अमेरिका या भूमीतले तीनशे ते साडेतीनशे वर्षांपूर्वीचे वसाहतवादी आणि उपरे.
1776 साली ब्रिटीश साम्राज्यातून सुमारे 13 वसाहती संघर्ष करून बाहेर पडल्या. ब्रिटन ने त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले आणि त्यातून तेरा वसाहतींचा अमेरिका म्हणजे United State of America USA अस्तित्वात आला. आजच्या अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील आपल्या केरळची पट्टी वाटावी अशा आकारमानाचा स्वतंत्र अमेरिकी देश. पण आज या देशात 50वर राज्ये आहेत आणि पूर्वे कडील समुद्रापासून पश्चिमेकडील समुद्रापर्यंत अखंड भूभागावर आज विस्ताराला आहे.
असाच विस्तार अरब जगतात असलेल्या जॉर्डन नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर विस्तारात इस्रायल वाढत आहे. पॅलेस्टाइन गिळंकृत करून त्याच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला भिडल्या शिवाय नेतन्याहु सारखे यहूदी थांबतील असे वाटत नाही. विस्तारवाद आणि वांशिक अहगंडाने पछाडलेले white supremacy माननारे हे दोन देश. अमेरिका आणि इस्रायल. ट्रम्प आणि नेतन्याहु त्यांचे शिरोमणी. ज्यांच्या भूमीत या दोन्ही वंशांना पाय ठेवायला जागा मिळाली तर त्यांनी तिथल्याच आधीच्या अनुक्रमे रेड इंडियन आणि पॅलेस्टाइन लोकांच्या वंशानाच संपवण्याचा इतिहास घडवलेला.
युरोपातून तिथं गेलेल्या ट्रम्प च्या पूर्वजांनी म्हणजे श्वेत वर्णियांनी त्या रेड इंडियन लोकांना मागे रेटत रेटत आज नामशेष होण्यावर आणून सोडले आहे. तिथले मूळ निवासी म्हणजे ज्यांना आपण रेड इंडियन म्हणतो ते मूळ अमेरिकी लोकं. जगाच्या पाठीवर ज्ञात इतिहासात एखादा मानववंशच नष्ट करावा इतके क्रौर्य फक्त अमेरिकेचे आहे.
ताजे उदाहरण व्हेनेझुएला देशावर ट्रम्पने केलेले आक्रमण हेच दर्शविते. तिथल्या तेलाच्या साठ्यावर नजर ठेवत हे सर्व केलेय. यापूर्वी इराकवर बुश यांच्या कारकिर्दीत हेच घडवले. पण इराक भूमी दूर असल्याने त्यांच्या विस्तारवादी भूमीला जोडता येणे शक्य नव्हते.
अमेरिकी अलास्का आणि काही बेटे पाहता व्हेनेझुएला वर केलेले आक्रमण अमेरिकी विस्तारवादी भूमिकेची ताजी आवृत्ती आहे.
हे जाणून घ्यायला सोबतचा अमेरिकी विस्ताराचा इतिहास दर्शविणारा व्हिडिओ बोलका आहे. तो जरूर बघण्या सारखा आहे. समुद्राच्या कडेने असलेला युरोपीय वसाहतीतून मूळ स्वतंत्र झालेला देश देश आज आहे तसा यापूर्वी नव्हता.
आर एस खनके