Elon Musk: X Larry Ellison: CBS, likely takeover of TikTok Jef Bezos: Washington Post, Twitch Mark Zuckerberg: Facebook, Instagram, Whatsapp
इतरही अनेक आहेत. उदा रुपर्ट मरडोक वगैरे
यातील काहींची फुटप्रिंट जागतिक आहे. उदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
कोट्यावधी लोकांनी काय वाचायचे, बघायचे, ऐकायचे आणि मुख्य म्हणजे विचार कसा करायचा हे हाच मिडिया ठरवत असतो. ____
आज जगातील अमेरिकेसकट अनेक देशात असंतोष धुमसतो आहे. त्याची मुळे टोकाची आर्थिक, संध्याची विषमतेमध्ये आहेत. ती गेल्या ४० वर्षातील नव उदारमतवादी धोरणांची परिणीती आहे हे अनेक अभ्यासक दाखवून देत आहेत.
नवउदारमतवादी धोरणांची ढकलशक्ती आणि लाभार्थी दोन्ही याच व्यक्ती आणि कॉर्पोरेट राहिल्या आहेत _____
याच कॉर्पोरेट आजच्या काळातील कोट्यावधी जनतेच्या मनातील असंतोषाला व्यक्त करणारे, त्यांना त्या त्या इश्यूवर संघटित होण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत. ते अर्थातच त्यांची लोकशाही प्रणाली आणि सामान्य नागरिकांप्रति बांधिलकी आहे म्हणून नाही. त्यांचा तो धंदा आहे. नमूद करायचा भाग हा की त्यांचा त्या प्लॅटफॉर्मवर एखादी कंट्रोल आहे. काही क्षणात कळ फिरवून ते आपला access बंद करू शकतात.
या अनेक देशात लोकशाही अजूनही आहे. त्या निवडणुकात नागरिक मतदारांमधील असंतोष मतपेटीद्वारे व्यक्त होतो अशी थियरी तरी आहे. हीच मंडळी आणि कॉर्पोरेट निवडणुकांमध्ये कोण निवडून येणार यावर निर्णायक प्रभाव पाडत आहेत.
भारतातील मिडिया मालकांची आणि निवडणूक निधी पुरवणाऱ्यांची यादी आपल्याला माहीत आहे.
असंतोषाचे जनक, असंतोषाला प्लॅटफॉर्म देणारे आणि असंतोष निवडणुकीद्वारे व्यक्त होताना त्याचे रिझल्ट्स काय असतील हे ठरवणारे एकच आहेत.
आजच्या जगातील हा सर्वात मोठा संरचनात्मक विरोधभास (structural contradiction) आहे.