सामाजिक 1021 minute read अरे माणसा… 3waysmediadmin February 2, 2024 Post Views: 138 अरे माणसा,होशील कधी माणूस,मी पणाच्या नादात,करशील किती नासधूस…जन्मला तेव्हा,होता अगदी निरागस, दिसे का तो चेहरा,इतका कासावीस….चकाके ते सारेच,सोने नसते रे,मृगजळ मोहात,उगीच पडू नको रे…दिसती जे आज,ते उद्या नसणार,काही ना शाश्वत,सत्य हेच चौफेर…भूक का भागेना,पोट तर चिमुटभर,नको रे ओरबडने,देह गड्या नश्वर…गेलीना वेळ,जाण माणूसपण,जन्म एकदाचा,सोड अमाणूसपण…– प्रकाश डबरासे Facebook 0 WhatsApp Messenger Twitter 0 Print 0Shares