- 157
- 1 minute read
आंबेडकरी समाजाचा हरिजन असा उल्लेख करणाऱ्या जातीयवादी इम्तियाज जलीलच्या विरोधात आंबेडकरी जनता मैदानात….!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 176
औवेशीचे मतं विभाजनाचे राजकारण म्हणजे हिंदुत्ववादी सावरकरांच्या राजकारणाचा एक भाग....!
लोकशाही व धर्मनिरपेक्ष देशात धर्मांध राजकारण करण्यासाठी व त्यास बहुसंख्य हिंदूंच्या पाठिंबा मिळविण्यासाठी संघ, भाजप यासारख्या धर्मांध शक्तींना कट्टर मुस्लिम पक्ष, संघटनेची गरज होती व आहे. त्यासाठीच या धर्मांध शक्तींनी ऑल इंडिया मजलिस _ ए_ इफत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)पक्षाचे असदुद्दीन औवेशी यांना बी टीम म्हणून राजकीय मैदानात उतरविले आहे. लोकशाही राज्य व्यवस्था, संविधान व धर्मनिरपेक्ष व्यवस्थेच्या विरोधात सरळसरळ लढाई करणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजप व अन्य हिंदुत्ववादी संघटनांना शक्य नाही. स्वतंत्र भारतात व स्वातंत्र्य पूर्व काळात ही ते या धर्मांध शक्तींना सहज शक्य नव्हते. त्यामुळेच हिंदू महासभा व माफीवीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली मुस्लिम लीग व हिंदु महासभेने एकत्र येवून स्वातंत्र्याच्या अगोदर ही एकत्रित सरकारे स्थापन करून देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनाला संयुक्तपणे विरोध केला होता. संविधानातील धर्म निरपेक्षतेला हिंदुत्ववाद्यांचा विरोध राहिला आहे, तसा कट्टरतावादी मुस्लिमांचा राहिला आहे. आज औवेशी कट्टरतावादी मुस्लिमांचे नेतृत्व करून अप्रत्यक्षपणे भाजपला राजकीय फायदाच मिळवून देत आहेत, ते हिंदू महासभा व सावरकर यांच्या धर्मांध राजकारणाचाच एक भाग आहे. माफीवीर सावरकरांच्या हिंदुत्वाला पोषक राजकारण औवेशी करीत आहेत.
AIMIM ची स्थापना १९२६ साली म्हणजे स्वातंत्र्य पूर्व काळात औवेशी यांच्या आजोबांनी केलेली असून १९६७ पासून हैद्राबाद लोकसभा मतदारसंघाचे नेतृत्व औवेशी परिवार करीत आहे. या पक्षाने हैद्राबाद वगळता कुठे ही पक्ष वाढविण्याचे काम गेल्या शंभर वर्षात केले नाही. मात्र केंद्रात मोदीच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून या पक्षाचा विस्तार देशभर सुरू आहे. हे समजून घेतले म्हणजे औवेशी देशभर धर्मनिरपेक्ष पक्षांबरोबर युती न करता निवडणुका का लढवित आहेत, हे समजून येईल. एका बाजूला संघाचे हिंदुत्ववादी राजकारण व दुसऱ्या बाजूला औवेशीचे कट्टर मुस्लिमवादी राजकारण २०१४ पासूनच सुरू झाले असल्याने या दोन्ही शक्तींना एकमेकांची किती गरज आहे , हे सहज लक्षात येते. जय श्रीरामाचा नारा सावर्जनिकरित्या भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दिला,अन् तो देण्यासाठी त्यांनी लोकसभेच्या व्यासपीठाचा वापर केला. ते करताना ही त्यांनी अगदी धोरणात्मक रित्या औवेशीच्या कट्टर धार्मिक राजकारणाचा वापर केला. हे सर्व देशाने पाहिले आहे.
२०१४ मध्ये मिळालेली सत्ता कुठल्या ही परिस्थितीत जाणार नाही याची खबरदारी घेऊनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वच निवडणुकांमध्ये साम, दाम दंड नीतीचा वापर करीत आहे. इलेक्ट्रॉरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून निवडणूक आयोग व तपास यंत्रणांना खरेदी करून संघाने भाजपला निवडणुका जिंकून देण्याचा सपाटा लावला आहे. त्याच बरोबर संघ व भाजपने दलित आणि मुस्लिम मतांचे ठेकेदार ही याच निधीच्या माध्यमातून उभे केले असून हे ठेकेदार स्वतंत्रपणे निवडणुका लढवून भाजपसाठी सत्तेचा मार्ग काही प्रमाणात का होईना मोकळा करून देत आहेत. यामध्ये एक नाव आहे ते म्हणजे ऑल इंडिया मजलिस _ए _ इत्तेहादूल मुस्लिमीन पक्षाचे असदुद्दीन औवेशी. हिंदुत्ववादी शक्तींना निर्माण करायच्या हिंदु राष्ट्रासाठी संघ, भाजपची बी टीम म्हणून औवेशी काम करीत आहेत. यासाठी त्यांनी आपले काही दलाल ही राज्या राज्यात उभे केले आहेत. महाराष्ट्रात इम्तियाज जलील त्यापैकीच एक दलाल. ज्या आंबेडकरी चळवळीने त्याला देशाच्या विधिमंडळात व संसदेत ही पाठविले, त्या आंबेडकरी जनतेचा हरिजन असा जाती वाचक उल्लेख इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्या विरोधात आज औरंगाबादमध्ये आंबेडकरी संघटनांनी जातीयवादी जलीलच्या विरोधात एका मोर्चाचे आयोजन केले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात भाजपसाठी मत विभाजन केल्याच्या बदल्यात २०१४ साली पहिल्याच झटक्यात हा जलील आमदार झाला, तर २०१९ मध्ये त्याला भाजपसाठी मत विभाजनाची मोठी बक्षिसी मिळून तो खासदार झाला. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचितची साथ ही त्यावेळी त्याला मिळाली होती. मात्र संघ, भाजपसोबतचे हे सौदेबाज राजकारण लोकशाही,संविधान व धर्मनिरपेक्षतेवर निष्ठा असलेल्या मुस्लिम व दलित जनतेच्या लक्षात आले आणि २०२४ मध्ये या जनतेने औवेशी व जलीलला योग्य ती जागा दाखविली. जलील पराभूत झाला. तेव्हापासून त्याचे संतुलन बिघडले असून समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार अबू असीम आजमी व समाजवादी पार्टीवर तो असंसदीय भाषेत टीका करीत आहे. २०२४ झालेल्या लोकसभा व नंतर विधानसभा निवडणुकीत ही त्याचा पराभव झाला, समाजवादी पार्टीच्या उमेदवारीमुळे पराभव झाल्याचा त्याचा आरोप आहे. पण उत्तर प्रदेशात याच AIMIM मुळे मुस्लिम मतं विभाजित झाल्यामुळे समाजवादी पार्टीचे लोकसभेला व विधानसभेला मिळून शंभरीक उमेदवार पडले व त्याचा फायदा भाजपला झाला. महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक व गुजरातमध्ये ही भाजपने औवेशीना मत विभाजनासाठी वापरून घेतले, हे निवडणूक निकालांवरून स्पष्ट झालेले आहे. त्याबद्दल हा जलील काहीच बोलत नाही.
समाजवाद व अबू असीम आजमींवर टीका करण्याची जलीलची लायकी नाही….!
औरंगाबाद शहर व परिसरात मुस्लिम मतदारांची संख्या निर्णायक असल्याने ही मतं बाद करूनच या ठिकाणी भाजपची ताकद वाढू शकते, हे संघाला माहित होते. त्यासाठी त्यांना औवेशीच्या AIMIM ची व एका स्थानिक सौदेबाज दलालाची गरज होती आणि जलीलमुळे ती पूर्ण झाली. जलीलच्या माध्यमातून भाजपने मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेचा लोकसभा निवडणुकीत पराभव करून सेनेची ताकद कमी केली व त्यानंतर याच जलीलच्या माध्यमातून मत विभाजनाचा फॉर्म्युला यशस्वीपणे राबविला. गेल्या दहा वर्षात संघ व भाजपने मत विभाजनाचा फॉर्म्युला अनेक राज्यात वापरला व त्यात ते यशस्वी ही झाले. महाराष्ट्र,बिहार, उत्तर प्रदेशात आणि काही प्रमाणात गुजरातमध्ये औवेशीचा वापर केला गेला व तो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत यशस्वी ही ठरत होता.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसाठी मत विभाजन करणारे दलित, वंचित आणि मुस्लिम आधार असलेले पक्ष व त्याचे नेते आयडेंटीफाय झाले. राजकीय समिक्षाकांनी तसे विश्लेषण केले. यातून एक नंबरवर असलेले नाव म्हणजे औवेशी. बिहार व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ही त्यांचा करिश्मा चालला. उत्तर प्रदेशात तर समाजवादी पार्टीला सत्तेपासून दूर ठेवण्यात आणि भाजपला सत्ता मिळवून देण्यात त्यांचा व कांशीराम _ मायावतीचा फार मोठा वाटा राहिला आहे. हे निवडणूक विश्लेषक ही सांगतात. बिहारमध्ये ही असेच घडले. पण या निवडणूक विश्लेषणानंतर औवेशी व अन्य बी टीमच्या नेत्यांना जनतेने ओळखले व नाकारले. आता हे बी टीमवाले दलित, मुस्लिम मतांचे ठेकेदार राहिले नसल्याने भाजपसाठी पूर्वी इतके ते उपयुक्त राहिले ही नाहीत. मात्र आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी औवेशी व इम्तियाज जलील आज ही प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच ते भाजपवर कमी आणि विरोधी पक्षांवर अधिक टीका करताना दिसतात. समाजवाद व आमदार अबू असीम आजमी यांच्यावर टीका करण्याची लायकी जलीलची नाही.तो इतका मोठा नाही.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औवेशी व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीने भाजपला महाराष्ट्रात किमान १२ जागा अधिकच्या मिळवून दिल्या. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये औवेशी व मायावती स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात असल्याने भाजपचा फायदा झाला. भाजपला सत्ता ही मिळाली, पण दलित आणि मुस्लिम विरोधी असलेल्या संघ, भाजपचे हे मत विभाजनाचे राजकारण २०२४ पर्यंत या मतदारांच्या लक्षात आले व त्यांनी या बी टीमला नाकारले. आता ते भाजपला फायदा पोहचवून देऊ शकत नसल्याने संघ, भाजपच्या दरबारात यांना किंमत राहिलेली नाही. यामुळे इम्तियाज जलीलचे मानसिक संतुलन बिघडले असून आजकाल तो बेताल वक्तव्य करू लागला आहे. राज्याचे समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना त्याने आंबेडकरी जनतेचा हरिजन असा जातीयवादी उल्लेख ही केला आहे. राज्य सरकारचा त्याला छुपा पाठिंबा असल्याने तो अशी सामाजिक सलोखा बिघडवणारी विधाने करीत आहे. पण त्या विरोधात औरंगाबादमधील सर्व आंबेडकरी विचारांच्या संघटना एकत्र आल्या असून त्यांनी जलीलच्या विरोधात आज एका मोर्चाचे आयोजन केले आहे.
………………………… …
राहुल गायकवाड,
महासचिव समाजवादी,
पार्टी महाराष्ट्र प्रदेश
ReplyForward Add reaction |
0Shares