• 53
  • 1 minute read

आमदार सुनील टिंगरे यांना अटक करा : राहुल डंबाळे

आमदार सुनील टिंगरे यांना अटक करा : राहुल डंबाळे

कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणी
आमदार सुनील टिंगरे यांना अटक करा : राहुल डंबाळे

पुणे : कल्याणी नगर येथील हिट अँड रन प्रकरणांमधील आमदार सुनील टिंगरे यांचा सहभाग स्पष्ट होत आहे. त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना या प्रकरणी अटक देखील करण्यात आलेली आहे , त्यामुळे आता या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांच्यावर अटकेची कारवाई करून त्याची नार्को टेस्ट करणियात यावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे वतिने राहुल डंबाळे यांनी केली आहे.

सुनिल टिंगरे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आज रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतिने राहुल डंबाळे यांचे नेतृत्वाखाली विश्रांतवाडी येथिल मुकुंदराव आंबेडकर चौकात तिव्र निदर्शनांचे आंदोलन करण्यात आले होते. यात किरण सोनवणे , संजय कांबळे , जिवन घोंगडे , शालन कांबळे , प्रतिक डंबाळे , सुरेखा कांबळे , कमला महाजन , शमशुद्दीन शेख , आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

टिंगरे यांच्यामुळे आमदारकीची प्रतिष्ठा कलंकित
” सुनिल टिंगरे यांचा याप्रकरणातील सहभागामुळे मतदार या नात्याने वडगांवशेरी विधानसभा मतदार संघाचे ते प्रतिनिधीत्व करत असल्याची लाज आम्हाला वाटत आहे. टिंगरे यांच्यामुळे आमदारकीची प्रतिष्ठा कलंकित झाली असल्याने अजित पवार यांनी टिंगरे यांची पाठराखण न करता त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आहे. ” असेही राहुल डंबाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

टिंगरेच्या राजीनाम्यासाठी पुन्हा आंदोलन
सुनिल टिंगरे जोपर्यंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत त्यांचेविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. सदर घटनेला 19 जून रोजी 1 महिना पुर्ण होत असल्याने त्याच दिवशी कल्याणी नगर येथे अॅक्सीडेंट झालेल्या टिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात या प्रकरणी न्यायासाठी आवाज उचलणार्या सरव्च लोकप्रतिनीधी , सामाजिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरीक यांनाही सहभागी करुन घेतले जाणार आहे.

तरि सदर बातमी प्रसिध्द होणेस विनंती आहे.

कळावे ,
– राहुल डंबाळे, अध्यक्ष
रिपब्लिकन युवा मोर्चा

0Shares

Related post

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन भाजपचे अश्रित विद्रोहीचा आरोप !!!

दिल्लीचे मराठी साहित्य संमेलन भाजपचे अश्रित विद्रोहीचा आरोप !!!

आधी राजकीय बनलेल्या अखिल भारतीय चे आता शासकीय आणि पक्षीय संमेलनात रूपांतर विद्रोहीचा घणाघात !!! विद्रोही…
तारामंडलातील  तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत !

तारामंडलातील तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत !

तारामंडलातील तेजस्वी तारा म्हणजे संत रोहिदास आहेत ! संत रोहिदास हे पंधराव्या शतकातील एक महान संत…
जागतिक किर्तीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड !

जागतिक किर्तीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड !

जागतिक किर्तीचे राजे महाराजा सयाजीराव गायकवाड ! 1893 मध्ये शिकागोच्या सर्वधर्म परिषदेत भाषण करून सर्वांची मने…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *