• 95
  • 2 minutes read

पोलीस आयुक्तांसमवेत बकरी ईदची बैठक संपन्न

पोलीस आयुक्तांसमवेत बकरी ईदची बैठक संपन्न

ईदच्या उत्सवात आम्ही देखील सहभागी आहोत : अमितेश कुमार

पुणे : मुस्लिम समाजासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या सणांपैकी बकरी ईद हा सण दिनांक 17 जून रोजी जगभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. बकरी ईद निमित्ताने आज पुणे शहरातील मुस्लिम समाज बांधव व पुणे पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार , अप्पर पोलीस आयुक्त श्री. प्रवीण कुमार पाटील , पोलीस उपायुक्त श्री हिम्मत जाधव यांच्या समवेत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे वतिने संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली.

नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रशीद भाई शेख यांचे अध्यक्षतेखाली सदर बैठकीचे आयोजन अल्पबचत भवन येथे करण्यात आले होते. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे राहुल डंबाळे उपस्थितीत होते.

हिंदु – मुस्लिम एकता हा भारताचा मुळ डिएनए असल्याने सर्वांच्या सहभागातुन बकरी ईद परंपरेनुसार केवळ आनंदी वातवरणात साजरी करण्याचीच मुस्लिमांची भावना असल्याचे डॉ. पी. ए. इनामदार यांनी स्पष्ट केले.

सदर बैठकीत उपस्थित मान्यवरांनी महत्त्वपूर्ण सूचना पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. ” समाजबांधवांनी केलेल्या सूचनांची गंभीर दखल घेऊन त्यांची सोडवणूक करण्याची स्पष्ट आश्वासन देत बकरी ईद सर्व समाज बांधवांनी आनंदाने व उत्साहाने साजरी करावी , त्यांच्या या उत्सवात आम्ही देखील सहभागी आहोत ” असा विश्वास व्यक्त करत सर्व समाज बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावेळी बैठकीतुन दिल्या.

राज्य शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करुनच बकरी ईद साजरी केली जाणार आहे. आमच्यासाठी हा सण अत्यंत पवित्र व आनंदाचा असल्याने यामुळे कोणालाही त्रास होणार नाही. असे मत रशिद शेख यांनी व्यक्त केले.

आज पार पडलेल्या या बैठकीमध्ये शिक्षण महर्षी डॉ. पी. ए. इनामदार यांच्यासह माजी नगरसेवक हनीफ शेख , माजी नगरसेवक रफिक शेख , माजी नगरसेवक मुक्तार शेख , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मुनवर कुरेशी, पुणे सिरत कमिटीचे सिराज बागवान , जमीयत उलमा हिंदचे कारी मोहम्मद इद्रीस तसेच जमीयत उलमाचे मुफ्ती शाहिद , रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सुवर्णा डंबाळे , सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांपैकी शिवसेनेचे जावेद शेख , कॉंग्रेसचे समीर शेख , आबिद सय्यद , सुफियान कुरैशी , आरिफ चौधरी, हसीनाभाभी इनामदार , इकबाल अन्सारी, हाजी फिरोज , हाजी जुबेर मेमन , अंजुम इनामदार , आमिर शेख , शाकीर शेख , सलीम पटेल , शहाबुद्दीन शेख , खिसाल जाफरी , किरण सोणवणे , प्रतिक डंबाळे , संजय कांबळे , आदी मान्यवर उपस्थित होते

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *