- 115
- 2 minutes read
एक्झिट पोलचे निकाल भाजपने मॅनेज केल्याप्रमाणेच….!
भाजपचे पंतप्रधानपदाचे अघोषित उमेदवार व संघाच्या गळ्यातील ताईत नितीन गडकरी स्वतः ही नागपूरात अडचणीत…?
काहीच तासानंतर १८ व्या लोकसभेसाठी ७ टप्प्यात झालेल्या मतदानाच्या बंदिस्त मतपेट्या उघडतील अन् त्याच आता या देशाचा फैसला करतील. १९ एप्रिल ते १ जून या दरम्यानचे ४२ दिवस लागले मतदान प्रक्रिया पार पडायला. खर तर विश्र्वगुरु बनायला निघालेल्या मोदींसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. या अगोदर इतका कालावधी कधीच लागलेला नाही. पण “मोदी है तो मुमकिन है.” वो कुछ भी कर सकता है. अस्थित्वात नसलेल्या रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा म्हणून मोदी स्वतःला इस्टब्लीस करीत असेल तर तो काही ही करू शकतो. अन् त्यांच्या या काही ही करण्याचा विट आल्याने देशातील जनतेने या निवडणुकीत संघ, भाजप व मोदी विरोधाची सूत्र आपल्या हातात घेऊन त्यांना सत्तेवरून हाकलून लावण्याचा निर्णय घेतला आहे. मतपेट्या उघडतील तेव्हा हाच निकाल बाहेर पडेल, अन् संघ, भाजप अन् मोदीचा निकाल लागलेला असेल. अगदी काही तासांवर सत्ता बद्दल, परिवर्तन येवून थांबले आहे.
निवडणूक आयोगाने भाजप व मोदींच्या सोयीनुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर भाजपने लगेच ४०० पारचा नारा दिला. म्हणजे या देशातील संसदीय राजकरणात आता भाजप शिवाय काही राहिलेच नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न हा नारा देवून केला गेला. अन् लगेच गोदी मिडिया कामाला लागली. भाजपने तर केवळ नारा दिला होता. दलाल व गुलाम गोदी मिडियाने तर ४०० जागा देवून ही टाकल्या आहेत. २०१९ मध्ये उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार व झारखंड या राज्यांनी भाजपला खंभीर साथ दिली होती. यावेळी या राज्यात भाजपला चांगलाच फटका बसू शकतो, हे वास्तव संघ, भाजप, मोदी व गोदी मिडियाने ही आता स्विकारले आहे. या राज्यातून लोकसभेत १८२ सदस्य जातात. या राज्यांनी पूर्ण साथ दिलेली असताना भाजप ३३० चा आकडा पार करु शकली नाहीतर, ते विरोधात उभी राहिल्यावर ४०० पारचा आकडा पार कसा होईल ? याचा कसलाही विचार न करता गोदी मिडिया मोदी भक्तीमुळे भाजपला ४०० पार करीत आहे.
संघासह भाजपच्या सर्व नेत्यांची हवा टाईट झाली आहे. सत्ता हातातून निसटत नाही, तर गेल्यातच जमा आहे, असे असताना गोदी मिडियांचा एक्झिट पोल भाजपला सत्ता मिळवून देत आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारा २७२ आकडा सहज पार करीत भाजप ३४० चा आकडा पार करीत आहे, हे अन् अशाच प्रकारचे सारे एक्झिट पोल आहेत. भाजपला EVM मध्ये घोटाळा करून जिंकता यावे, याची वातावरण निर्मिती करण्यासाठी हे एक्झिट पोल करण्यात आले आहेत. आज जे एक्झिट पोल येत आहेत ते तीन महिन्यांपूर्वीच तयार करण्यात आले असल्याची चर्चा आज सर्वत्र सुरु आहे.
निवडणुका जाहीर झाल्यानंतर भजपला ४०० पार जागा देण्याची स्पर्धा गोदी मिडियात लागली होती. मात्र त्यांना स्वतःच याबाबत लाज वाटू लागल्याने जागा कमी करण्यात येत असून ३०० पारची चर्चा आता गोदी मिडियाचे दलाल अँकर करीत आहेत. पण हकीकत त्यांना माहित आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश व गुजरात या राज्यांचा अपवाद सोडला तर भाजपची स्थिती एकदम वाईट आहे. या राज्यांमध्ये ही काही ही घडू शकते. अन् इतर राज्यांतील मतदारा प्रमाणेच येथील मतदारांनी विचार केला असेल तर भाजप २०० पार ही होणार नाही. ही निवडणूक जनतेने भाजपच्या विरोधात लढविली असल्याने हे होऊ ही शकते.
निवडणुकीचे निकाल इंडिया आघाडीच्या बाजूनेच येतील, याबद्दल जनतेच्या मनात कसली ही शंका नव्हती. मात्र ७ व्या टप्प्यांतील मतदान पार पडताच जे एक्झिट पोल आले, त्या एक्झिट पोलने जनतेच्या मनात भीतीचे वातावरण तयार केले. भाजपला EVM मशीनमध्ये गडबड करून निवडणुका जिंकण्यासाठीच संघ व भाजपनेच हे सट्टा बाजार अन् एक्झिट पोलचे सर्व्हे आणले आहेत. हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे उद्या होणाऱ्या मत मोजणीवर जनतेचे अधिक लक्ष आहे. भाजप काही गडबड करेल तर त्याची किंमत ही भाजपला मोजवीच लागेल. प्रत्यक्ष निवडणुकीची सूत्रे हाती घेतलेल्या जनतेचे मत मोजणीवर ही लक्ष ठेवलें आहे. असे असले तरी भाजप काही प्रमाणात का होईना घोटाळा करणारच, असे मत जनतेचे झाले आहे.
महाराष्ट्र,बिहार, झारखंड, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल येथील १६४ जागा, अन् दक्षिण भारतातील १६५ जागा अशा ३२९ जागांवर भाजपची स्थिती फारच नाजूक आहे. तर उत्तर प्रदेशात लोकसभेच्या सर्वाधिक ८० जागा असून समाजवादी पार्टी व काँग्रेस युतीने तगडे आव्हान दिल्याने येथे ही भाजपला तगडा फटका बसणार आहे. अशा परिस्थिती जे एक्झिट पोल भाजपला ३०० पार जागा देत आहेत, हे एक्झिट पोल गोदी मिडियाच्या माध्यमातून संघ, भाजपनेच मॅनेज केले आहेत.
सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकिकृत शिवसेना व भाजप युतीने ४२ जागा जिंकल्या आहेत. आज उद्धव सेना भाजपसोबत नसली नाही. शिवसेनेला फोडून भाजपने राज्यात बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केली. त्यासाठी शिंदेच्या गळ्यात गद्दारीची घंटा बांधली. तरी ही राज्यात लोकसभेच्या दहा पेक्षा अधिक जागा आपण जिंकत नाही, हे स्वतःच केलेल्या सर्व्हेतून पुढे आल्यानंतर भाजपने राष्ट्रवादी पार्टी तोडून ही अजित पवारांना सोबत घेतले. त्यातून ही भाजपला सावरता आलेले नाही. उलट भाजपने सत्तेच्या राजकारणासाठी जे काही असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला त्यामुळे देशभरात नाचक्की झालेली आहे. अन् त्याचा फटका महाराष्ट्रात तरी जबर बसणार आहे.
खात्रीने निवडून येईल, अशी परिस्थिती एका ही मतदारसंघात नाही. भाजपचे अघोषित पंतप्रधानपदाचे उमेदवार व संघाच्या गळ्यातील ताईत नितीन गडकरी यांची स्वतःची जागा ही अडचणीत आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय असून येथेच गडकरी यांना काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी तगडे आव्हान दिले आहे. नागपूरची ही स्थिती असेल तर राज्यातील इतर जागांची स्थिती यापेक्षा ही वाईट आहे. भाजप सहज जिंकेल, अशी खात्री देवून सांगता येईल, अशी एका ही जागा राज्यात तरी नाही. इतकी दारूण अवस्था यावेळी भाजपची झालेली आहे. उद्या मतपेट्या उघडतील त्यावेळीं भाजपचा दारूण पराभव त्यातून बाहेर पडेल…!
– राहुल गायकवाड,
(मगासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश)