ओबीसींच्या मदतीने वंचित राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा लढणार…? प्लॅन व उमेदवारांची यादी ही तयार ?

ओबीसींच्या मदतीने वंचित राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागा लढणार…? प्लॅन व उमेदवारांची यादी ही तयार ?

वंचितच्या सतत बदलत्या भूमिकांमुळेच वंचितला 3 की 5 जागा सोडायच्या यावर मविआचे एकमत होताना दिसत नाही. पण मोदीला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कुठलाही त्याग करण्यास मविआचे नेते तयार आहेत. वेळ आलीच तर 5 काय आणखी एखाद दुसरी जागा वंचितसाठी सोडायला मविआ तयार होईल. पण वंचित खरेच भाजप व मोदीच्या विरोधात लढायला तयार आहे का ? हा प्रश्न मविआ नेत्यांपुढे आहेच. थोडक्यात प्रकाश आंबेडकर किती ही मोठे नेते असले तरी त्यांची विश्वासाहर्ता राहिलेली नाही. मोदीची बी टीम म्हणून वंचितवर शिक्का बसला आहे. तो इतक्या लवकर व सहज पुसला जाणार नाही. त्यातच मराठा आरक्षणाच्या मागणीनंतर उभे राहिलेले ओबीसी आंदोलन व ओबीसी नेत्यांसोबत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक संबंध प्रस्थापित केले असून या नेत्यांना सोबत घेऊन 2019 चीच पुनरावृत्ती करण्याची प्रकाश आंबेडकरांची योजना आहे. अन् या योजनेचा सर्व प्लॅन, आराखडा आजच्या तारखेला ओबीसी नेते व प्रकाश आंबेडकर यांच्याकडे तयार आहे. * 2019 प्रमाणेच भाजपला घवघवीत यश मिळवून देण्याचा सर्व कार्यक्रम ओबीसी नेते व वंचितने ठरविला आहे. सर्व काही ठरले आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा गोंधळ उडलेला कुठेच दिसत नाही. मविआ बरोबरची बोलणी फिस्कटेल व युती होणार नाही. तोडगा निघणार नाही, याचे कसलेच दडपण त्यांच्यावर नाही, उलट युती होऊच नये. तोडगा निघूच नये, अशाच भूमिका ते सतत घेत आहेत. यावरूनच प्रकाश आंबेडकर आपल्या सोबत येणार नाहीत. याची पक्की खात्री मविआच्या नेत्यांना आहे व असणारच. पूर्वानुभव ही तसाच आहे. तर युती करायची नाही, हे पक्के असल्याने प्रकाश आंबेडकर व ओबीसी नेत्यांनी आपले उमेदवार ही ठरविले आहे. आता फक्त त्यांची नावे जाहीर करण्याचेच तेवढे बाकी आहे. मविआ बरोबरची बोलणी अधिकृत फिस्कटण्याची वाट वंचित पाहत आहे. तर यासंदर्भातील पूर्ण कल्पना काँगेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांच्या सेनेला असल्याने ते ही सावधपणे चर्चा करीत आहेत.
देशाच्या राजकारणात संघ,भाजप, मोदीची प्रतिमा देशद्रोही म्हणून तयार झाली आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणारे ही देशद्रोही, संविधान व जनविरोधी ठरत असल्याने हा शिक्का आपल्यावर बसु नये यासाठीच वंचितकडून मविआ सोबत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. इतकाच अर्थ या चर्चा करण्याच्या मागे आहे.
2019 च्या लोकसभा व विधानसभा निवडणूकीत वंचितने निर्णायक मतं मिळवून राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविला असला तरी त्यामुळे त्यांची प्रतिमा मोदीची बी टीम म्हणून तयार झाली आहे. त्यामुळे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर आज ही मविआचे नेते विश्वास ठेवायला तयार नाहीत. अन् ते चुकीचे ही नाही.
मोदीच्या नेतृत्वाखालील एनडीए आघडीला पर्याय म्हणून इंडिया आघाडी उभी राहताच संघाच्या व भाजपच्या सत्तेला हादरा बसला होता. आज ही तो हादरा कायम आहे. त्यामुळे मोदी या ही वेळी वंचित व वंचित सारख्या पक्षांना मतं विभाजनासाठी मैदानात उतरविणारच. भाजपला एनडीए विरुद्ध इंडिया असा सरळ सामना निवडणूक मैदानात नको आहे. त्यात भाजपचा पराभव अटल आहे. निवडणुकीमध्ये मतं विभाजन झाले तर ते भाजपच्या फायद्याचे ठरु शकते. त्यासाठी निवडणुका तिरंगी, चौरंगी करण्यावर भाजपचा भर असेल. अन् त्यासाठी बी टीमची भाजपला गरज आहे.

-राहुल गायकवाड…

0Shares

Related post

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा

पहलगाम हल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा दादरमध्ये निषेध मोर्चा.         जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरील भ्याड…
धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

धर्म पुछ्कर हत्या करने का संघी और मोदी अजेंडा आतंकीयो ने कैसे अपनाया…?

देश के मातम के माहोल को संघ और मोदी सरकार जिम्मेदार…!        पुलवामा के…
वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन…

वाचीत जावे, समजून घ्यावे, शहाणे करावें सकल जन… मला लहानपणापासूनच पुस्तकांची प्रचंड आवड. वडिलांनी घरात एका…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *