• 46
  • 1 minute read

कमलाकर जमदडे ; समता पथावर चालणारा मानवमुक्ती लढ्याचा बेडर लीडर

कमलाकर जमदडे ; समता पथावर चालणारा मानवमुक्ती लढ्याचा बेडर लीडर

व्यवहारात जगतांना बहुतांश वेळा कथणी आणि करणी याची सांगड न घालता वागणारी माणसे पावलोपावली दिसतील .माञ बोले तैसा चाले या संताच्या सत्वचनाने चालणारी माणसे हल्ली दुर्मिळ होत चालली आहेत.याच पंगतीमधील एक म्हणजे कमलाकर जमदडे ..महात्मा बसवेश्वर , शिव , फुले , शाहु – आंबेडकर यांच्या परीवर्तनवादी चळवळीतील ह्या समतावादी आणि मानवमुक्ती लढ्यातील यौद्ध्याचा आज वाढदिवस आहे.त्या निमित्त हा लेखनप्रपंच …


बिलोली तालुक्यातील रुद्रापुर सारख्या ग्रामीण भागात जन्मलेल्या या बेडर कार्यकर्त्यांवर म.बसवेश्वर यांच्यापासुन ते शिव – फुले – शाहु – आंबेडकर यांच्या विचारांचा विशेष प्रभाव आहे. जमेल त्या पद्धतीने गरजुंना मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो मृग ती गरज वैद्यकीय असो की आर्थिक स्वरुपाची ..त्यामुळेच रुद्रापुरात त्यांना लोकांनी ग्रा.पं.निवडणुकीत मताधिक्याने निवडुण दिले होते. प्रवाहाच्या नेमके विरोधात जाणे जमदडे यांचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या कन्येचा वाढदिवस स्मशानात साजरा केला व करतात. अंधश्रद्धा व जादुटोणा विरोधी चळवळीचे ते तालुक्यातील अविभाज्य घटक आहेत. तालुका व परीसरात प्रचाराच्या हेतुने संविधान संवादाची लोकचळवळ त्यांनी नेटाने चालवली .शहरात संविधान संवादक कोल्हापुरचे राजवैभव शोभा रामचंद्र यांची संविधान संवाद कार्यशाळा घेऊन संविधानाचा जागर केला.असे हे संविधानप्रेमी जमदडे कर्तुत्व , नेतृत्व , आणि वकत्तृव अश्या सर्वार्थाने परीपुर्ण आहेत.शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टीकोन रुजला पाहीजे म्हणुन तालुक्यातील अनेक शाळांत त्यांनी विज्ञानाचे प्रयोग करुन बुवा बाजी करणाऱ्या ढोंगी बुवा , महाराजांच्या कर्तुत्वाचा बुरखा फाडला आहे. अनिंस ची चळवळ ते आजही नेटाने चालवतात. प्रसंगी ते पदरमोड ही करत असतात. सद्या ते धर्मकिर्ती महाराज यांच्या मानव मुक्ती मिशन चे बिलोली तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. समाजाचे काही देणे लागतो ही उत्तरदायित्वाची भावना जमदडे यांच्या ठायी भरलेली आहे. आपल्या शांत , संयमी स्वभावाने त्यांनी नवख्यांनाही आपलेसे करतात अशा ह्या अजात शञु व्यक्तीमत्वाचा दि.4 जुलै रोजी वाढदिवस आहे त्या निमित्त त्यांना दिर्घायुष्यांच्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्याप्रती मंगल कामना व्यक्त करतो.

– गौतम लंके ( पञकार ) बिलोली

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *