पुणे : कल्याणी नगर येथे झालेल्या हिट ॲन्ड रन प्रकरणामधील आरोपींना सहाय्य केल्या प्रकरणी वडगांवशेरीचे आमदार सुनिल टिंगरे यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. तसेच यातील मृतांच्या नातेवाईकांना शासनाने प्रत्येकी ५ कोटी रूपये द्यावेत अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने करण्यात येत आहे.
प्रकरणात आमदारांचा हस्तक्षेप
अपघात घडल्यानंतरनं यात मृत्यूमुखी पडलेल्या पिडीत कुटुंबियांचे सांतवण करून आरोपींना कठोर कारवाई करावी. यासाठी प्रयत्न करण्या ऐवजी टिंगरे यांनी आपल्या पदाचा दुरोपयोग करून आरोपींना रॉयल ट्रीटमेंट देण्यात सहाय्य केले आहे. तसेच सदर प्रकरणी दोषी आढळलेल्या डॉ. तावरे याचे नियुक्ती संदर्भात टिंगरे यांनी केलेली मदत ही आरोपी ब्लड सॅम्पल बदलण्यास सहाय्यभूत ठरण्याची शक्यता जाणवत आहे. टिंगरे हे स्वत:ला आगरवाल कुटुंबाचे कामगार दाखवत असले तरी काही ठिकाणी टिंगरे हे अगरवाल कुटुंबियांचे व्यवसायिक पार्टनर आहेत, ही बाब ते अद्याप लपवून का ठेवत आहेत? याचा खुलासा त्यांनी करणे अपेक्षित आहे.
ससूनचे अधिष्ठाता डॉ. काळे यांना बळीचा बकरा बनविले
या प्रकरणातील ससून मधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सहभागा बद्दल तब्बल ४ जनांना अटक करण्यात आली असून यामुळे आरोग्य व्यवस्थेतील आदर्श भ्रष्टाचार पध्दती समोर आली आहे. डॉ. तावरे यांच्या बेकायदेशीर नियुक्तीला टिंगरे यांच्या शिफारशीनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हेच जबाबदार असल्याचे दस्ताऐवज बाहेर आलेले असताना हे प्रकरण आपल्या पर्यंत येवू नये या भितीतून मुश्रीने सूसनचे अधिष्ठाता डॉ. काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांना बळीचा बकरा बनविले आहे.
वास्तविक या प्रकरणी झालेल्या गंभिर चूकीचे प्रायश्चित म्हणून मुश्रीफ यांनी वैद्यकिय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.
पोलीस आयुक्तांच्या कारवाईना पाठिंबा
सदर प्रकरणात प्राथमिक एफआरआय नोंदविताना केलेल्या त्रुटींमुळे २ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन पोलीस आयुक्तांनी केले असून सुरूवातीपासून पब्ज व रेस्टोरंट विरोधात पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी कठोर भुमिका घेतलेली आहे व याचा फटका पब्ज व लिकर माफीयांना बसला असून या प्रकरणामुळे कारवाई आणखीन कठोर होईल या भितीनेच लिकर माफीया पोलीस आयुक्तांविरोधात सक्रिय झालेले आहेत. पुणे पोलीस आयुक्त हेच या प्रकरणामध्ये ठोस कारवाई करीत असल्याने पुणे पोलीस आयुक्तांच्या कारवाईना पाठिंबा देत आहोत.
आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार
वरील सर्व बाबींकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार दि. ०७ जून रोजी सकाळी ११:०० वाजता विश्रांतवाडी येथील मुकुंदराव आंबेडकर चौक येथे आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे.