• 123
  • 1 minute read

गावखेड्यात संविधानाची मूल्ये रुजवुया -ह. भ. प. धर्मकिर्ती महाराज

गावखेड्यात संविधानाची मूल्ये रुजवुया -ह. भ. प. धर्मकिर्ती महाराज

गावखेड्यात संविधानाची मूल्ये रुजवुया -ह. भ. प. धर्मकिर्ती महाराज

भारतीय संविधान,सन्मान,सुरक्षा व संवर्धन राष्ट्रव्यापी महा जन जागरण अभियान अंतर्गत धुळे येथील सैनिक लॉन्स येथे लोकतंत्र आणि संविधान यशस्वीतेचा लोक महोत्सव- 2024 साजरा करण्यात आला.
यावेळी लोकमहोत्सवाचे उद्‌घाटक म्हणून ह.भ.प.धर्मकिर्ती महाराज परभणीकर म्हणाले की, संविधानाची मूल्ये आमच्यासाठी महत्वाची आहेत. मुक्यांना बोलण्याची संधी संविधानाने दिलेली आहे.संत,महंतांनी संविधान समजून घेणे आवश्यक आहे.
लोकमहोत्सवाच्या प्रथम सत्राआधी पथसंचलन आणि माल्यार्पन व ध्वजारोहन करण्यात येऊन राष्ट्रगान घेण्यात आले.
उदघाट्न व प्रबोधन सत्राचा विषय — संविधानाच्या अंमलबजावणीचा लोकाग्रह हा सत्ताधाऱ्यांच्या वर्तनाची दिशा व कार्यप्रणालीचा आस ठरेलं या विषयाची प्रस्तावना मूलनिवासी प्रणाली मराठे यांनी केली. प्रस्तावनेत त्या म्हणाल्या की,आपल स्वप्न विकसित भारताच आहे. ते पूर्ण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करने आवश्यक आहे. सद्यस्थितीत संविधानाची अंमलबजावणी पूर्णता होत नाही.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान हे आर्थिक व सामाजिक विषमता दूर करण्याचे साधन आसल्याचे सुचविले.
या लोक-महोत्सवाचे उदघाट्न व प्रबोधन सत्राची अध्यक्षता करतांना बामसेफचे राष्ट्रीय संघटन सचिव मूलनिवासी संजय मोहिते म्हणाले की,भारतीय जनतेला जागृत करून संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सत्ताधारी व विरोधी पक्षावर दबाव आणणे आवश्यक आहे.
या सत्रात मा.अकीफ डफेदार,छ.शिवाजी मुस्लिम बिग्रेड, मुंबई,एड.राहूल पाटील,जिल्हा अध्यक्ष,धुळे बार असो.मा.आनंद लोंढे, प्रदेशध्यक्ष,आझाद समाज पार्टी,धुळे मा.ललिता शिरसाठ,जिल्हा प्रभारी धुळे,प्रा.मोहन मोरे,राज्य मीडिया सचिव,मूलनिवासी संघ,धुळे यांनी आपले विचार मांडले.
सदर सत्राचे सूत्रसंचलन मुलनिवासी संजय निकुंबे,जिल्हा सचिव,बामसेफ तर आभार मुलनिवासी संघरत्न नेरकर,जिल्हा अध्यक्ष,बामसेफ यानी मानले.
दुसऱ्या सत्रात मूलनिवासी बहुजनांच्या सामाजिक अभिसरणादवारे राष्ट्र उभारणे शक्य आहे या विषयावर प्रतिनिधीचे खुले सत्र घेण्यात आले. या सत्राची अध्यक्षता मूलनिवासी रवि मोरे,राज्य कार्यकारिणी सदस्य,बामसेफ यांनी केले.
प्रस्तावना मूलनिवासी सुरेश मोरे यांनी केली.तर सूत्रसंचालन डॉ.दिलीप लोखंडे व मूलनिवासी रोहन मोरे यांनी केले. या सत्रात मा.राज‌कुमार सोनवणे,एड.राहूल वाघ,मा.अनिल दामोदर,मा.बी.यु.वाघ, मा.बी.टी.अहिरे,मा.प्रा.प्रज्ञा मोरे,मा.राजू हाके,मा.अजय चांगरे,मा.जय वाघ यांनी विषयाला अनुसरून आपले मत व्यक्त केले.
या सत्रांचे आभार प्रदर्शन मूलनिवासी कैलास जगताप यांनी केले.राष्ट्रगाणने कार्यक्रमाची सांगता झाली.
लोक महोत्सव यशस्वी करण्यासाठी मू.नरेंद्र खैरनार,मू.चैताली गायकवाड, मू.संतोष साळवे,मू.सुनील सरदार,मू.संतोष चव्हाण,मू.दादाभाऊ वाघ,मू.सिद्धार्थ पवार,मू.आप्पा कुवर,मू.संगीता तपासे, मू.राजदीप वाघ,मू.रियाज सर,एड. प्रसेनजीत बैसाणे, मू.शांताराम सोनवणे,मू.दीपक जाधव,मु.रूपाली अहिरे,मू.ईशान मोरे,मू.शिवाजी सोनवणे,मू.कपिल मोरे,मू. ईश्वर ढिवरे,मू.सुभाष पगारे,मू. शोभा लोखंडे,मू.उषा मोरे,मू.अरुना मोरे,मू.विजय वाघ,मू.किशोर अहिरे,मू.प्रशांत अहिरे,मू. पी.बी.निकुंभे आदिंनी परीश्रम घेतले.
या अधिवेशनासाठी आपले आर्थिक योगदान देणाऱ्या मूलनिवासी बहुजन समाजातील प्रबुद्ध नागरिकांना BS4 अभियानाचे सन्मान चिन्ह देऊन धन्यवाद व आभार मानण्यात आले.

0Shares

Related post

अमेरिकेचा असलीयत चेहरा  लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !

अमेरिकेचा असलीयत चेहरा लोकशाहीवादीच्या नावाने चालवलेला विस्तारवाद !      ज्या अमेरिकेला सर्वसामान्यपणे आपण लोकशाहीवादी देश…
लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा  निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे

लाडक्या बहिण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी नको : राहुल डंबाळे पुणे : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहिण…
कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी  आपल्या पर्यंत पोचवतात.

कार्टून्स एक शब्दही न लिहिता, लेखातून कदाचित मांडता येणार नाही ते, अगदी आपल्या पर्यंत पोचवतात.

जागतिक पातळीवर प्रत्येक राष्ट्र फटकून वागत आहे फार कमी चित्रे, कार्टून्स एक शब्दही  न लिहिता, काही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *