• 22
  • 1 minute read

“गोबळी झालेल्या पँथरची घोस्ट”

“गोबळी झालेल्या पँथरची घोस्ट”

चाण्या,चूणचूण्या,बोटी,डल्लीवर पोसलेला पँथर खरच गो बळी झालाय.
त्यानं आपली मूंडी गाईच्या जबड्यात दिलीय.

गाय आता गवत खात नाही.
ती झालीय नरभक्षक झूंडबळी घेणारी.
गाय जरी खात असेल चारा तरी.
गाईच्या रक्षणासाठी मारला जातो अखलाक.

मेलेल्या गाईच्या अंतेष्ठीसाठी उनाव मधल्या
अस्पृश्यांच्यापोरंठोरांची फरपटत काढली जाते धींड.
मारला जातो पहलूखान गाय तस्कर म्हणून.

गाईने मध्यंतरी म्हणे गो रक्षक वाघाचीही शिकार केली.
पँथरला चळचळा कापायचे म्हणे गायधनी.
पँथरचा बाप घालायचा गोंडा उठवायचा गोठेची गोठे.

कधी काळी गो रक्षकही द्यायचे यज्ञात गाईची आहूती.
मिटक्या मारत खायचे यज्ञात भाजलेले गाईचे मांस.

पण,यज्ञातली लूट थांबवली म्हणून
त्यांचे साम्राज्य लयाला गेले.
गो मांस भक्षक गो रक्षक झाले.
त्यांनी गाईला गोमाता केले.
उदरात तिच्या ३३कोटींना कैद केले.
गोमुत्राने पापे धूवायला सुरुवात केली.
शेण खावून ग्यान पाजळायला सुरुवात केली.

ती पवित्र गाय खाणे महापाप.
याच जन्मी तुम्हाला गोबळी करणारी.
गाय हंबरे गोठ्यात माणूस मरणाच्या दारात.

त्याच गाईच्या सागूत्यावर पोसलेला पँथर
गाईच्या जबड्यात मान देवून मानाच्या भिकेवर जगतोय.
स्वत:ची मान गाईच्या जबड्यात देवून
पँथर असल्याची बतावणी करतोय.

त्या बतावणीत व्हायचं का नाचे?
पँथरचं कातडं पांघरुन रेशीम बागेत ६१-६२ कवायत करणारे.

मग नाचु नका,झूकु नका. वाकू नका.
मणका मोडला तरी गाईची शिकार होवू नका.
पन्नाशीतल्या पँथरमधला ‘लढवय्या’ गुलाम होवू देवू नका.

– जयवंत हिरे
(दलित पँथरच्या पन्नाशी निमित्त)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *