अदानीने एअरटेलमध्ये भागीदारी मिळविताच एअरटेल ग्राहकांवर भुर्दंड पडला असून रिचार्ज प्लॅनची किंमत किमान 100 रुपयांनी सर्वच प्लॅनमध्ये वाढली आहे. देशात एअरटेलचे 60 करोड ग्राहक असून वाढीव 100 रुपये प्रमाणे 600 करोड रुपये अधिकचा नफा आता एअरटेल अन AESL म्हणजे अदानी एनर्जी सोल्युशन लि. च्या तिजोरीत जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीत दिलेल्या चंद्याची परतफेड करण्याची ही पहिली तातडीची कृती मोदींनी केली आहे. सर्व चंदावाल्यांना मोदींने गॅरंटी दिली आहे, त्यामुळे एअरटेलच नव्हे, आणखी काय काय भुर्दंडांचा सामना देशातील जनतेला करावा लागेल, हे येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला कळेलच. पण हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या गोर गरीब जनतेने मोदीला मतं दिली त्यांनी यासंदर्भात आता तरी गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. सुनील भारती मित्तल परिवाराच्या मालकीच्या या एअरटेल कंपनीचे शेअर्स राजीव जैन यांच्या अमेरिका स्थित कंपनीने मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. अन आता अदानी ग्रुपच्या ” अदानी एनर्जी सोल्युशन लि. या कंपनीने यात भागीदारी घेतली आहे. अदानीच्या भागीदारीचे करार एअरटेलसोबत होताच एअरटेलने आपल्या प्लॅनचे दर वाढविले आहेत.