जन्मजात काँग्रेसवासी असलेले बौद्ध जसे नितीन राऊत, वर्षा गायकवाड, मुकुल वासनिक, मल्लिकार्जुन खरगे, इत्यादी आणि नंतर काँग्रेसवासी झालेले हांडोरे, भालचंद्र मुणगेकर, सारखे नेते आणि सरकारी नोकरीत भ्रष्टाचार करून काँग्रेसवासी झालेले बरेच छूट भय्ये बौद्ध नेते, ह्यांच्या समाजनिष्ठेवर बौद्ध समाजातील बहुसंख्य लोक शंका घेत नाही. गांधींच्या विचारधारेवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षात काम करूनही ह्या लोकांना समाज आंबेडकरवादी समजतो. जेव्हा की हे काँग्रेसवासी बौद्ध हे बौद्धांच्या वोटांची चोरी करून काँग्रेस च्या झोळीत टाकून, आंबेडकरी चळवळीसोबत गद्दारी करण्याचे समाजविघातक कार्य करत असतात. तरी ह्या काँग्रेसी नेत्यांना बौद्ध समाज डोक्यावर घेतो.
त्याउलट तरुणपणापासून आंबेडकरी चळवळीसाठी जमिनीवर लढलेले, चळवळीला अख्ख आयुष्य वाहुन घेतलेले प्रा कवाडे आणि रामदास आठवले ह्यांच्या सारखे नेते कधीच भाजप मध्ये सामील झाले नाहीत, आपले स्वतंत्र पक्ष अबाधित ठेवून भाजप सोबत त्यांनी युती केली म्हणुन बौद्ध समाज ह्या नेत्यांना समाजद्रोही समजतो. वस्तुस्थिती बघितली तर हे नेते बौद्ध समाजाच्या लोकांचे मत भाजप कडे ट्रान्स्फर करत नाही, करू शकत नाही तरीपण त्यांना समाज गद्दार समजतो.
बौद्ध समाजाचा हा जो कोण समाजद्रोही आणि कोण गद्दार, कोण आंबेडकर चळवळीचे मारेकरी आणि कोण समर्थक ह्याचा मोजमाप करण्याची जी मोजपट्टी आहे ( Moral Compass) ती मोजपट्टी तुटलेली आहे असे वाटते.
रामदास आठवले आणि प्रा कवाडे सारख्या दिग्गज बौद्ध नेत्यांना, त्यांच्या राजकीय करिअर च्या उत्तरार्धात भाजपा च्या वळचणीला आसरा शोधावा लागला. ह्याचे मुख्य कारण आहे जातीवादी, मनुवादी काँग्रेस पक्ष. मराठा समाजातील ग्रामपंचायत स्तरावरच्या नॉन मॅट्रीक लोकांना काँग्रेस ने आमदार, खासदार, मंत्री आणि मुख्यमंत्री बनवलं. पण बौद्ध समाजातील उच्च विद्याविभूषित, राज्यभर मोठ नाव असलेल्या प्रा कवाडे आणि आठवले सारख्या बौद्ध नेत्यांना मात्र काँग्रेसने सत्तेचा वाटा मिळू दिला नाही. त्यांच्या मार्फत फक्त बौद्धांच्या मतावर डाका टाकला. ह्यामुळे नाईलाजाने त्यांना काँग्रेसला लाथ मारून, पर्यायी राजकीय मित्र निवडावा लागला.
प्रा कवाडे आणि रामदास आठवले ह्या सिंहासारखे लढवय्ये असलेल्या बौद्ध नेत्यांचे ज्या काँग्रेसने हे बेहाल केले त्याच जातीवादी काँग्रेस मध्ये आताचे काही चिल्लर बौद्ध नेते, आपला भाग्यविधाता शोधत आहेत !