• 70
  • 4 minutes read

चांदवडच्या रंगमहाली जाऊन आलो !

चांदवडच्या रंगमहाली जाऊन आलो !

चांदवडच्या रंगमहाली जाऊन आलो !

        सह्याद्रीच्या डोंगररांगातील सुप्रसिद्ध रेणुका देवी तीर्थक्षेत्राचे गाव चांदवड हे मुंबई – आग्रा महामार्गावर, नाशिकपासून ६६ किमी.वर आहे. पिंपळगाव बसवंत नंतर व मालेगावच्या आधी चांदवड हे तालुक्याचे गाव येते. हा परिसर शेती व दुग्ध उत्पादनासाठी नैसर्गिकपणेच समृद्ध आहे. येथील खास खव्याचे पेढे प्रसिद्ध आहेत. अहिल्याबाई होळकर यांनी १८ व्या शतकाच्या मध्यावर चांदवडला तटबंदी, सात प्रवेशद्वार (वेस), मंदिरे व पाण्यासाठी तलाव, विहिर इत्यादी स्थापत्ये उभारली. त्यातच वैशिष्ट्यपूर्ण ‘रंगमहाल’ देखील येतो.

        चांदवडचा ऐतिहासिक होळकरवाडा ‘रंगमहाल’ या नावाने ओळखला जातो. आता नष्ट झाली असली तरी या तीन चौकांच्या प्रशस्त प्रासादातील भिंती अनेक रंगीत चित्रांनी रंगविलेल्या होत्या. भव्य लाकडी कोरीवकामावर राजस्थानी शैलीचा स्पष्ट प्रभाव दिसतो.
        १९९० पर्यंत या भव्य प्रासादात औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासह २१ सरकारी कार्यालये होती. त्यामुळे तिथे कायम माणसांची वर्दळ होती. हे स्थापत्य सुस्थितीत राहण्यासाठी हा राबता उपयुक्त ठरला. पण ही कार्यालये बंद झाल्यावर ‘रंगमहाला’चा रंग उडू लागला. वाड्याचे छप्पर व काही पडझड झाली. सध्या वाडा बंद आहे. २०२२ पासून तिथे संथगतीने दुरुस्तीची कामे चालू आहेत.
        रंगमहालाचे मुख्य प्रवेशद्वार बंद असले तरी आत जिर्णोद्धार करणारे कामगार जिथून जा-ये करतात तिथून जाऊन वाडा पाहिला. आतील कामास गती आली व पुरेसा निधी वेळेत प्राप्त झाला तर ‘रंगमहाल’ पुन्हा त्याचे नाव सार्थ करील !
         सोबतचे फोटो पाहिले तर ‘रंगमहाल’ कधीकाळी किती ऐश्वर्यसंपन्नतेचा साक्षीदार होता ते सहज कळते.

         चांदवड जैनांचेही तीर्थक्षेत्र आहे. तसेच पूर्वापार मुस्लिमांचेही गाव आहे . नानावली शरीफ व जुम्मनशाह बुखारी शरीफ यांचे दोन दर्गे शहरातच आहेत. रंगमहालाच्या तटबंदीला लागूनच बुखारी शरीफ उर्दू हायस्कूलची इमारत आहे.
         चांदवड राजकीयदृष्ट्या सजग व चळवळींचा वारसा असलेला संपन्न शेतकऱ्यांचा परिसर आहे. शेतकरी संघटनेचा स्त्रीमुक्तीचा विचार मांडणारे शेतकरी संघटनेचे महिला अधिवेशन चांदवडलाच भरले होते. तिथे मांडलेल्या ठरावांचा मसुदा ‘चांदवडची शिदोरी ‘ नावाने प्रसिद्ध आहे.
          चांदवडपासून सव्वाशे किमी. अंतरावर कसारा घाटात, यात्रेकरूंसाठी ‘जलजीवनसरिता महाराणी अहिल्याबाई’ होळकरांनी बांधलेली आच्छादित टोपाची विहीर प्रसिद्धच आहे.

– किशोर मांदळे

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *