टी क्लब ही अनऑफिसियल थेरेपी असते असे म्हणतात. दिवसभर कामाच्या ताणतणावातून मुक्त व्हायचे असेल तर सकाळी किंवा सायंकाळी मित्रांसोबत शहरातील एखाद्या चौकात चहा घेत गप्पा मारल्या पाहिजेत, त्यातून ताणतणाव दूर होते. डोपामिन आणि सेरोटेनिन मिळते.
काय आहेत हे डोपामिन आणि सेरोटेनिन?
डोपामिन हे हॅपी हारमोन आहे. या हारमोनच्या कमतरतेमुळे माणूस उदास होतो. दु:खी होतो. विषेशतः हे हारमोन मेंदूत तयार होते. औषध किंवा अन्नामुळे हे हारमोन तयार होत नाही. हे हारमोन निर्माण होण्यासाठी एकच उपाय आहे; तो म्हणजे मनुष्याचे हास्य. आपण हसलो किंवा साधे स्मित जरी केले तरी मेंदूतील डोपामिन वाढत असते. कृत्रिम हास्य केले तरी डोपामिन वाढत असते. म्हणूनच अनेक शहरात हास्य क्लब दिसतात.
परंतु या डोपामिनचा एक दोष पण आहे. जर हे हारमोन मेंदूच्या पुढच्या भागात जास्त वाढलेले असेल तर ती व्यक्ती जास्त चिडचिड करते आणि कुणावरही अकारण रागावत राहते. तुमच्या टी क्लबमध्ये अशी व्यक्ती आहे का ते शोधा आणि तिच्यावर वैद्यकीय इलाज करा.
सेरोटेनिन हे देखील मेंदूतील केमिकल आहे. हे केमिकल प्राण्यांच्या मांसातून मिळवता येते. गोमांसात सेरोटेनिन मोठ्या प्रमाणात असते. विशेषतः मेंदूमधील सेरोटेनिन घटल्यास माणूस वेडा होतो. किंवा तो विक्षिप्त वागू लागतो. म्हणून तुमच्या मित्रांपैकी कुणी विक्षिप्त वागत असेल तर समजावे की त्याच्या मेंदूतील सेरोटेनिन घटले आहे.
डोपामिन आणि सेरोटेनिन (Neurotransmitters) हे दोन केमिकल आपले मानसिक स्वास्थ्य राखत असतात. हे दोन्ही केमिकल जर आपल्या टी क्लबमधील आपल्या गप्पाटप्पामधून मिळत असतील तर ही गोष्ट खूप चांगली आहे. परंतु या टी क्लबमध्ये जात किंवा धर्माच्या श्रेष्ठत्वाचे रंग येऊ देऊ नयेत. जर ते आले तर टी क्लबमध्ये आम्ही जवळ जवळ बसलेले असलो तरी मनाने खूप दूर गेलेले असतो. असे होऊ नये ,तरच डोपामिन आणि सेरोटेनिन आम्हाला मिळेल!