- 77
- 1 minute read
जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र राज्य स्थापना दिन : देान आव्हाने ठळकपणे
एक
भारतीय कामगार वर्गाने ब्रिटिशां विरेाधात स्वातंत्र्यासाठी लढत असतानाच भांडवलशाही शेाषण व्यवस्थेविरूद्ध संघर्ष केला . गेल्या शंभर वर्षातील कामगार क़ायदे निर्माण हेाऊन कामगार हित साधले गेले . हककाची पायाभरणी झाली .
मेादी व भाजप सरकारने हे कामगार कायदे रद्द गुंतवणुक दारा साठी त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करणारे व कामगारांना वेठबिगार बनविणारे 4 लेबर केाड निर्माण केले . !
हे लेबर केाड १ जुलै २०२४ पासून लागू हेातील .
सरकारी क्षेत्र असो किंवा खाजगी क्षेत्र , कामगार हा कंट्राटदारा नेाकर असेल व तेा केवळ तीन किंवा पांच वर्ष अशीच फिक्स्ड टर्म नोकरी करील . पेन्शन व प्रोविडेण्ट फण्ड इतिहासजमा होइल , क़ायम स्वरूपाची नेाकरी व निवृतीवेतन ही संकल्पना मोडीत काढली जात आहे .
सामाजिक सुरक्षा व आरोग्य सुविधा याचे पूर्ण खाजगी करण सुरू झालेच आहे !
ताबडतेाबीचे आव्हान केंद्र सरकार व राज्य सरकार जनतेच्या एकजुटीतुन बदलणे अत्यावश्यक आहे ,
कामगाराची एकज़ूट आपल्या अधिकारांची पुनर्स्थापना करु शकेल , शोषण व्यवस्थेविरुद्ध सातत्याचा संघर्ष करावाच लागेल . !
मे दिवस झिंदाबाद !
2)
1 मे 1960 रेाजी मुंबई सहीत संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्माण झाले . मुंबई गुजरातला जेाडणे किंवा केंद्र शासित ठेवणे हा डाव मुंबई व महाराष्ट्र राज्यातील जनतेने उधळून लावला . मुंबई चा कामगार वर्ग व महाराष्ट्र राज्यातील शेतकरी यांनी एकजुटीने हा डाव हाणून पाडला ! या संघर्षात 109 हुतात्मे झाले . त्याचे स्मारक हुतात्मा चौक येथे निर्माण झाले . महाराष्ट्र राज्याचा स्थापना जागतिक कामगार दिनी म्हणजे 1 मे रेाजी रेाजी असावी हे
कॉ . श्रीपाद अमृत डांगे यांनी
पं जवाहरलाल नेहरू यांच्या कडे मागणी केली .
संयुक्त महाराष्ट्र राज्य कृति समिति चे नेतृत्व
आचार्य प्रह्लाद केशव अत्रे , एसएम जोशी व कॉ श्रीपाद अमृत डांगे यांनी केले .
या चळवळीत प्रबोधन ठाकरे , सेनापति बापट , साथी मधु दण्डवते , लालजी पेंडसे ,
शेकडेा साहित्यिक व पत्रकार , समाजातील अग्रणी बुद्धिजीवी प्रत्यक्ष रस्…
महाराष्ट्र राज्यात समाजवादाचा पाळणा हलेल हे पहिले मुख्यमंत्री मा यशवंत राव चव्हाण यांचे धोरण होते .
समाज कारण , अर्थकारण व उद्योगात महाराष्ट्र राज्याने प्रचंड प्रगति केली . मूल्यांवर आधारित राजकारण महाराष्ट्राला पुरेागामी चेहरा देऊन हेाता !
आता धेाका काय आहे ?
————————-
आज
महाराष्ट्र राज्याला 64 वर्ष पूर्ण करून 65 व्या वर्षात पदार्पण करीत असताना, गेली दहा वर्ष पुरेागामी विचारधारा व महाराष्ट्र राज्या च्या विकास प्रक्रियेला तड़े जात आहेत. !
मनुवादी विचाराच्या भाजपाने सर्व सरकारी यंत्रणा व सत्ताकेंद्रात प्रचंड घूसख़ोरी करुन भ्रष्टाचार व गुन्हेगारी प्रवृतिना प्रोत्साहन देउन त्यांचा समाजातील सर्व क्षेत्रात दहशत माजवीण्यासी वापर केला आहे .
मुंबई पुणे ठाणे सारखी महानगरे बिल्डर ,कांट्रेक्टर, व भ्रष्ट राजकारणी यांच्या ताब्यात आहेत . देशाचे व मुंबई ची अर्थव्यवस्था मूठभर कॉर्पोरेट घराणी भ्रष्ट नेाकर शहा केन्द्र सरकार शी हात मिळवणी करूनच चालते . . संपतीचे निर्माते करेाडेा कष्टकरी शेतकरी व छोटे उद्योग करणारे आहेत . पण त्यानी निर्माण केलेल्या सम्पत्ति चे केन्द्रीकरण सरकारी धोरणांमुळे मूठभर कॅारपेारेट उददयेागपती ची (असेटस )संपती वाढणे यात हेात आहे . !
मुंबई व महाराष्ट्र राज्याच्या सर्व साधन सम्पत्तिवर म्हणजे जमिन, पाणी, हवा , वीज , आरोग्य , शिक्षण , सार्वजानिक वाहतुक व्यवस्था ,वित्तीय व्यवस्था यावर भाजप व मोदी सरकार च्या हातमिळवणीतूनच कबजा करता आला आहे .
आता मागील काही बजेट मधून एसेट मेानटायझेशन पाईपलाईन
ASSET MONETISATION PIPE LINE मधून सर्व साधन संपत्ति चे 55 वर्ष लीज़ वर अत्यंत कवडी मेाल मूल्यांकन आधाराने मूठभर कॉर्पोरेट उद्योगपति व मुख्यतः विदेशी गुंतवणुकदार यांना हस्तांतरण हेात आहे !
मुंबई व महाराष्ट्र राज्यातील ST एस टी डेपेा ची हजारेा एकर जमिन, बेस्ट BESTची मुंबई तील जमिन . महाराष्ट्र राज्य व मुंबई तील रेलवे लगद ची हजारेा एकर जमिन ,हडपली जात आहे . मुंबई बंदर हा ट्रस्ट आहे . मुंबई चा १/३ भाग या ट्रस्ट च्या हाती आहे . अदाणी चा कब्जा मुंबई बंदराबर व विमानतळावर निर्माण झलाच आहे . संपूर्ण धारावी अदाणीकडे गेली च आहे . मुंबई ठाणे , पालघर. रायगड, व नवी मुंबई याला आता
(MMRDA) मुंबई मेट्रोपोलिटन रीजनल डेवलपमेंट अथॉरिटी नियंत्रित विभाग असेच स्वरूप आले आहे . !
केन्द्र सरकारने दिल्ली राज्य
विस्तार करून त्याला नँशनल कैपिटल रजिस्टर ( NCR) बनविले व त्याचे नियंत्रण स्वतः कड़े ठेवले . लेाक नियुक्त मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना अधिकारमुक्त केले आहे
लेाकसभा अधिवेशनात 150 खासदार लोकशाही पायदळी तुडवून निलंबित करणयात आले त्या लोकसभेत भयंकर क़ायदे एकतर्फ़ी दडपशाही त मंजूर करून घेतले आहेत .
यामुळे नेशनल कैपिटल रजिस्टर प्रमाणे महाराष्ट्र राज्यातून MMRDA क्षेत्र केंद्र शासित करणे हा डाव उघड आहे . !
याकरिताच एकनाथ शिंदे गट न अजितदादा पवार यांची तैनाती फैाज घेऊन विकसित भारताची घेाषणा करीत महाराष्ट्र राज्याचे तुकडे करणे हा नजिक चा कार्य क्रम आहे .
महाराष्ट्र राज्यावरील मेादी व कॉरपोरेट उद्योगपति यांच्या संगनमता तून निर्माण झालेले संकट महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील सर्व शक्ति नी उधळून लावले पाहीजे !
जय हिंद ! जय महाराष्ट्र !
कामगार शेतकरी एकजुटी चा विजय असेा !
विश्वास उटगी
1 मे 2024
9820147897