• 24
  • 1 minute read

जातीव्यवस्थेने सर्वच क्षेत्रात समस्या निर्माण केल्या आहेत. जातीव्यवस्था ही समस्या निर्माण करणारी व्यवस्था आहे

जातीव्यवस्थेने सर्वच क्षेत्रात समस्या निर्माण केल्या आहेत. जातीव्यवस्था ही समस्या निर्माण करणारी व्यवस्था आहे

महामानवांच्या विचारांवर आधारित, सद्धम्म चर्चा भाग-२७ (०३ जुलै २०२४)

प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते, हिंदूंच्या नितीमत्तेवर जातीव्यवस्थेचा झालेला परिणाम अत्यंत शोकजनक आहे. नितीमत्तेवर सार्वजनिक हिताची वृत्ती जातीने ठार मारली आहे. सार्वजनिक दयाबुद्धी जातीने नष्ट करून टाकली आहे. सार्वजनिक लोकमत जातीने अशक्य करून सोडले आहे. हिंदू समाज म्हणजे त्यांची जात. एक व्यक्ति फक्त आपल्या जातीपुरताच जवाबदार आहे. त्याची प्रामाणिकता फक्त त्याच्या जातीपुरतीच मर्यादित असते. सर्व सद्गुण जातीच्या घोड्यावर बसलेत. आणि, नीतीमत्ता जातींच्या मर्यादेत बंदिस्त झाली. जातीव्यवस्था माणसाला इतकी संकुचित बनवत असते की, आपल्या जातीच्या मर्यादेबाहेर व्यक्ति विचारच करू शकत नाही. आणि, म्हणूनच केवळ आपल्या जातीच्या स्वार्थाकरिता हिंदूंनी देशद्रोह देखील केला आहे.

जातीव्यवस्थेच्या बाहेर पडण्याचा मार्ग सुद्धा मोकळा नाही. जातीचे नियम मोडल्यास त्या व्यक्तीवर बहिष्कार घालण्याचा जातील निर्विवाद हक्क आहे. असे सांगून पुढे बाबासाहेब म्हणतात की, जातीबहिष्कार म्हणजे जातीतील माणसाशी सर्व प्रकारचे व्यवहार करण्याची पूर्णतः बंदी. हा शिक्षेचा प्रकार मृत्युदंडाच्या शिक्षेइतकाच भयंकर आहे. या वरुन असे सिद्ध होते की, जातीच्या नियमांचे उल्लंघन करणे शक्य नाही. म्हणूनच, परिवर्तनाचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. जातीपद्धतीमध्ये घालून दिलेले नियम मान्य करायला पाहिजेत, अशी बंधने आहेत. बाबासाहेबांच्या मते, “दुसऱ्यांनी घातलेली आचारविचारांवरील बंधने मान्य करावयास भाग पाडणारी समाजस्थिति म्हणजे गुलामगिरी होय. म्हणूनच भारतात गुलमगिरी ही कायद्याच्या दृष्टीने नसली तरी जातीव्यवस्था ही गुलामीपेक्षाही भयानक अशी पद्धत आहे”.

जातीपद्धतीमुळे समस्या कशा निर्माण झाल्यात, या संबंधीचे विश्लेषण करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जातीच्या पायावर तुम्ही कोणताही इमला उभारू शकत नाही. तुम्ही राष्ट्राची उभारणी करू शकत नाही. तुम्ही नितीमत्तेची उभारणी करू शकत नाही. जातीच्या पायावर तुम्ही जे म्हणून काही बांधाल ते कोसळून पडेल आणि एकसंघ कधीच होणार नाही.

जातीव्यवस्थेचे केवळ सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राष्ट्रीय दुष्परिणाम नाहीत तर, आर्थिक व्यवस्थेवर देखील फार मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम झाले आहेत. जातीव्यवस्थेनुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या जातीचा व्यवसाय करावा असे नियम आहेत. त्यामुळे, व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर दुष्परिणाम झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जातीसंस्था हे केवळ श्रमविभाजनच नव्हे, तर ते श्रमिकांचे देखील विभाजन आहे. म्हणून, ती श्रमिकांचे गट निर्माण करणारी संस्था तर आहेच, पण त्याशिवाय तो श्रमिकांच्या गटाची एकाच्या वर दूसरा, दुसऱ्याच्यावर तिसरा या प्रमाणे जन्मजात प्रतवारी लावून देणारी संस्था आहे. आपला उद्योग अथवा व्यवसाय परिस्थितीनुसार बदलण्याची मुभा जातीने नाकारली आहे. त्यामुळे जातीव्यवस्थेने निर्माण केलेली उद्योगांची ही प्रतवारी अत्यंत घातक असल्याचे बाबासाहेब म्हणतात.

जातीची समस्या ही केवळ समाजमुलक नाही. जर ती सामाजिक असती तर ही समस्या आतापर्यंत नष्ट झाली असती. परंतु, शेकडो वर्षांपासून जातीव्यवस्था टिकून आहे. कारण, जातीव्यवस्थेला धार्मिक मान्यता आहे. जातीव्यवस्था ही केवळ एक समस्या आहे असे नाही, तर तिचा सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, आदी सर्वच क्षेत्रावर प्रभाव असून या प्रत्येक क्षेत्रात जातीच्या दुष्परिणामांचा प्रादुर्भाव झाला आहे. जातीव्यवस्थेने या सर्वच क्षेत्रात समस्या निर्माण केल्या आहेत. जातीव्यवस्था ही समस्या निर्माण करणारी व्यवस्था आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात.

संकलन व संपादन: प्रकाश डबरासे,
(मा. प्रदीप आगलावे यांच्या, समाजशास्त्रज्ञ डॅा. बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथातून)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *