- 585
- 2 minutes read
ज्वलंत हिंदुत्वाच्या आडून तरुणाईच्या मेंदूची नसबंदी…..!
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 564
ज्वलंत हिंदुत्वाच्या आडून तरुणाईच्या मेंदूची नसबंदी…..!
स्वतःच्या अन देशाच्या भवितव्याची चिंता नसणारी युवा पिढी रस्त्यावर…..!
आलिशान गाड्या व विमानाने फिरणाऱ्या, आलिशान हॉटेलात राहणाऱ्या, अन वर्ष दोन वर्षांनी आपली महिला पार्टनर बदलणाऱ्या क्रिकेटरांना पाहण्यासाठी आज हजारो तरुण – तरुणी दक्षिण मुंबईतील नरिमन पॉईंट, मंत्रालय, गेट वे ऑफ इंडिया, चर्चगेट, हुतात्मा चौक, सीएसटी आदी परिसरातील रस्त्यांवर हुदगड घालताना दिसली.अन या तरुण पिढीची फारच किव आली. भारतीय क्रिकेट टीमने वर्ल्ड कप जिंकल्यावर ही टीम मुंबईत आली व क्रिकेटरांना पाहण्यासाठी तरुणाईने ही गर्दी केली. या तरुणांना वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजप व मोदींने त्यांचे असलेले रोजगार ही गेल्या दहा वर्षांत हळूहळू काढून घेतल्याने ते अगोदरच रस्त्यावर आणले आहे. या क्रिकेट वेडाने पुन्हा आणले. याला भिकेचे डोहाळे असे म्हणतात.
ब्राह्मणी व्यवस्थेने ज्वलंत हिंदुत्वाचे इंजेक्शन देवून या तरुणाईच्या मेंदूची नसबंदी केली असल्याने आपल्या स्वतःच्या अन देशाच्या भवितव्याची कसलीच चिंता या तरुणाईला नाही.
या क्रिकेटरांना पाहण्यासाठी रस्त्यावर उतरण्या ऐवजी रिकाम्या हातांना काम मागण्यासाठी या तरुणाईने खरे तर रस्त्यावर उतरायला हवे. पण तसे होताना दिसत नाहीं.हे असले वेड पहिल्यांदा स्वतःची व मग देशाची बर्बादी करणारे आहे.
देशातील युवा पिढी समोर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. शिक्षण अन बेरोजगारी. शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने ते महागडे ठरले आहे. जी भीड काल रस्त्यावर हुडदूंग घालताना दिसली, ती या महागड्या शिक्षण व्यवस्थेपासून वंचित झाली आहे. ती व्यवसायिक व उच्च शिक्षण घेऊ शकत नसल्याने आयटी क्षेत्रातील रोजगारापासून ही वंचित झाली आहे. ती बेकार आहे. त्यांची डोकी रिकामी आहेत. अन संघ, भाजपसारख्या धर्मांध शक्तींनी त्यांच्या या रिकाम्या डोक्यात हिंदुत्व घुसविले आहे.” हिंदू खतरे में है ” हा कार्यक्रम त्यांना दिला आहे. “जय श्रीराम नारा ” ही दिला आहे. या देशाला हिंदू राष्ट्र बनविणे हेच त्यांचे स्वप्न आहे. अन ते साकार करने हीच राष्ट्र सेवा आहे, हे या ब्राह्मणी व्यवस्थेने या युवकांच्या मनात पक्के बिंबवले असल्याने देशासमोरील खऱ्या समस्यांचा हा तरुण विचार करीत नाहीं.
भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्ड कप जिंकला, ही अभिमानाची गोष्ट आहे. संघातील खेळाडूंनी आपले कर्तव्य पार पाडत हा कप जिंकून दिला. त्या क्रिकेटरांचे अभिनंदन करणे योग्यच. देश तुमच्या सोबत आहे, दाखवून देणे ही चांगलेच. पण शेतकरी आपल्या शेती मालाला हमी भाव मागत असताना त्यांना चिरडून मारले जात असेल तर तरुणाईची भुमिका काय असली पाहिजे ? याचा विचार करण्याची क्षमताच आजच्या तरुणाईमध्ये नसेल तर क्रिकेटरांचे अभिनंदन करणे, हा त्यांचा बेगडीपणा आहे. देशाला सुवर्णं पदकं मिळवून देणाऱ्या खेळाडू महिला जाहीरपणे सांगत होत्या की आमच्या चरित्र्याशी खेळले जात आहे. त्यावेळी ही तरुणाई मूग गिळून गप्प बसत असेल, तर क्रिकेटपट्टूचे अभिनंदन करण्यासाठी केलेल्या प्रदर्शनाचा देशभक्तीशी काहीच संबंध नाही. तो केवळ एक धुडगूस होता. या पलिकडे काही नाही.
देशातील बेरोजगारी, आरोग्य व्यवस्था, नागरिकांचे दरडोई उत्पन्न, गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार, धार्मिक व जातीय हिंसाचार, अल्पसंख्यांक समाजाची सुरक्षितता या सर्व गोष्टींचा विचार करून जगभरातील देशांची स्थिती ठरविली जाते. त्या स्थितीवरून नागरिकांची किंमत होते. यामध्ये आपण पाकिस्तान व बांग्ला देशापेक्षा गये गुजरे आहोत, पण यापेक्षा या देशातील बहुसंख्य नागरिकांना हिंदुत्व महत्वाचे वाटते. जे हिंदुत्व याच नागरिकांना नीच मानते, शूद्र ठरवते, महिलांना नीच, अन दासी बनवून त्यांचा उपभोग घेते. तरी तेच हिंदुत्व ज्यांना हवे असते. त्यांच्या मेंदूची नसबंदी या धर्मांध शक्तींनी केली आहे. हे या युवा पिढीला कळतच नाही.
भारतीय रेल्वे, भारतीय बँका, एअर इंडिया, एअर पोर्ट, देशातील सर्व बंदरे, खाणी, खनिज, वन, जंगले सर्व काही गेल्या दहा वर्षात विकली जात आहेत. देशाची संसद, संविधान, लोकतंत्र म्हणजे या देशाचा गौरव, शान, आत्मा अन या देशाला घडविणारे महापुरुष या साऱ्यांचा पावलो पावली अपमान होत आहे. संसद, प्रधानमंत्री निवास व कार्यालय अन राष्ट्रपती भवनापासून हाकेच्या अंतरावर या देशाच्या नागरिकांच्या हक्क, अधिकाराची सनद असलेले संविधान जाळले जात आहे. देशाला घडविणाऱ्या युवा पिढीला घडविणाऱ्या विद्यापीठांना जाणीवपूर्वक आतंकवादाचे अड्डे बनविले जात आहेत. मणिपूरमध्ये पोलिस संरक्षणात महिलांवर सामूहिक बलात्कार होत आहे. त्याचे चित्रीकरण करून ते जगभर वायलर केले जात आहे. देशाला सुवर्णं पदकं मिळवून देणाऱ्या महिला खेळाडूंच्या इज्जतीचा लिलाव मांडला जात आहे, शेतकऱ्यांना हक्क मागितले म्हणून चिरडून मारले जात आहे. रोजगार मागणाऱ्या तरुणांवर लाठी हल्ला केला जात आहे. पाणी अन अश्रूधुराच्या नळकांड्याची फवारणी त्यांच्यावर केली जात आहे.
या देशात हिंदुत्ववादी मानसिकता जनतेच्या मनात रुजविण्यात ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला यश आले आहे. त्यामुळे धर्माच्या नावाने राजकारण करीत भाजपने देशाच्या केंद्रीय सत्तेवर कब्जा केला आहे. पण या धर्मांध विचारधारेच्या विरोधात लढणाऱ्या विचारधारा आहेत. काल हजारो तरुण क्रिकेटरला पाहण्यासाठी हूडदूंग घालीत असताना शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्ट्राचार, बेरोजगारी अन नेट परीक्षेचे पेपर फुटीच्या विरोधात डाव्या व समाजवादी विचारांच्या विद्यार्थी व युवक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होते. हे चित्र आश्वासक आहेच की.
बाकी काल अचानक उसळलेल्या या तरुणाईच्या गर्दीमुळे रोजच्या चाकरमान्यांना थोडासा त्रास जरूर झाला.
………..
राहुल गायकवाड,
महासचिव, समाजवादी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश.
0Shares