• 104
  • 1 minute read

ठाणे जिल्हा bs4 कल्सटर अधिवेशन उल्हासनगर येथे उत्साहात संपन्न झाले

ठाणे जिल्हा bs4 कल्सटर अधिवेशन उल्हासनगर येथे उत्साहात संपन्न झाले

ठाणे जिल्हा bs 4 कल्सटर अधिवेशन उल्हासनगर येथे उत्साहात संपन्न झाले

दि. १५.०९.२०२४ रविवार रोजी ठाणे जिल्हा स्तरीय BS4(भारतीय, संविधान, सन्मान, सुरक्षा, संवर्धन) याराष्ट्र व्यापी महा जनजागरण अभियानांतर्गत लोकतंत्र आणि संविधान यशस्वीतेचा लोक महोत्सव, #BS4 कल्सटर अधिवेशन-२०२४ उल्हासनगर पूर्व येथील लीलावतीबाई कुंडलीकराव वाघमारे हाँल येथे सकाळी ११ ते ५ वा. मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सदर कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० ते ११ वा. जिजामाता उद्यान, मराठा सेक्शन, ते वाघमारे हाल पर्यंत संविधान सन्मान गौरव यात्रा बाइक रंँली च्या स्वरूपात झाली. आणि ११ ते १ प्रथम उद्घाटन सत्र आणि २ ते ५ द्वीतीय खुले सत्र असा प्रबोधन सभा आयोजित करण्यात आले होती.
सदर कार्यक्रमात मा. चंद्रकांत सोनवणे (संपादक 3 व्हे मिडिया) यांना उद्घाटक म्हणून आमंत्रित केले होते. या सत्राचा विषय: “भारतीय संविधानाची अमलबजावणी करण्याचा आग्रह आगामी शासनाची दिशा ठरले!” हा होता. मूलनिवासी अनुप लोखंडे (सदस्य बामसेफ ठाणे जिल्हा) यांनी सूत्रसंचालन केले, तर मूलनिवासी धम्मपाल वाघमारे (सदस्य बामसेफ महाराष्ट्र राज्य) यांनी विषयाची पार्श्वभूमी सांगून प्रस्तावना केली.
उद्घाटन सत्रात

१. मूलनिवासी चंद्रकांत सोनवणे यांनी संविधानिक अंमलबजावणी साठी दबाव कसा टाकावा ह्या बद्दल मार्गदर्शन केले. जातीचे संघटन हे देश विकासाला घातक आणि ब्राह्मणवादाला पोषक ठरते,असे प्रतिपादन केले, बि. एस 4 अभियानामूळे देशभरात जनजागृती मोठ्या प्रमाणात होत आहे ह्यामुळे संविधान विरोधी शासक समूह पंचायत मधे घेरला गेला आहे. असे सांगितले.
२. मूलनिवासी अरुण गोडघाटे (बामसेफ महाराष्ट्र अध्यक्ष ) ह्यांनी बि. एस. 4 अभियानाचे कार्य, महत्व, आणि उद्देश सांगितला,व हे अभियान संपूर्ण भारतात सुरू असून 200 जिल्ह्यात अधिवेशन घेतले जात आहेत त्यातून संविधान अंमलबजावणी साठी जन रेटा निर्माण केला जात आहे अशी माहिती दिली.

३. प्राध्यापिका अंँश्विनी शिरसाट मॅडम(समाज चिंतक) ह्यांनी अभ्यासपूर्ण भाषण दिले त्यांनी आंदोलन बळकट करण्यासाठी राजकीय आणि आर्थिक बाजू कशी भक्कम करता येईल या वर विस्तारपूर्वक माहिती दिली. हे स्पष्ट करण्यासाठी दादाभाई नौरोजी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचे राजकीय आणि आर्थिक धोरण सांगितले. तसेच विद्यार्थींचा उत्साह वाढवण्यासाठी संत कबीरांचे दोहे बोलून व गाऊन सादर केले.

४.मूलनिवासी पुष्परज दहिवले (राष्ट्रीय अध्यक्ष मूलनिवासी कर्मचारी कल्याण महासंघ) ह्यांनी आपल्या भाषणात ब्राह्मणी पक्ष्यान कडून कडा संविधान द्रोह सुरू आहे ह्या बद्दल माहिती दिली त्यांनी सांगितले की संविधान अंमलबजावणी करण्यासाठी संविधानाचे तीन अंग विधायिका, कार्य पालिका आणि न्यायपालिका ह्या वर मूलनिवासी बहुजन ह्यांनी नियंत्रण मिळविले पाहिजे आणि संविधान विरोधी लोकांना ह्या अंगातून बाहेर काढले पाहिजे. काहीही करून आपले मत ब्राह्मणी पक्षांना देऊ नये असे आवाहन केले.
नंतर या सत्राचे आभार प्रदर्शन मा. देवेंद्र घाडगे (सदस्य मूलनिवासी संघ ठाणे) यांनी केले. आणि दु. १ ते २ भोजन अवकाश होता त्या दरम्यान शिल्ड फाउंडेशन गृप च्या विद्यार्थींनी नशा मुक्ती, ड्रग्स विरुद्ध पद नाट्य सादर केले व *मा.सितल भंडारे (विद्रोही गायिका)*यांनी संविधान वाचवा चला रे गड्यांनी संविधान वाचवा चला, हे गीत सादर केले.
व द्वितीय सत्र विषय:- मूळनिवासी बहुजनांच्या सामाजिक अभिसरणाद्वारेच राष्ट्र निर्मीती शक्य आहे
या सत्राचा सत्राचे सुत्रसंचालन मूलनिवासी विक्रांत लोखंडे (सदस्य बामसेफ ठाणे जिल्हा) यांनी केले, तर मूलनिवासी अँंड. विशाल गायकवाड (अध्यक्ष बामसेफ ठाणे जिल्हा) यांनी विषयाची पार्श्वभूमी सांगून प्रस्तावना केली.
१. मा. विरेंद्र ढोके (स्कांँलर- टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स) यांनी विषयावर आपले मत मांडले. ते म्हणाले की भारत देशाला पूर्वी जम्बूद्वीप संबोधले जायचे. परंतु विशेष राष्ट्र नव्हते. राष्ट्र ही संकल्पना विदेशात उदयास आली. वेगवेगळ्या देशात जागतिक क्रांती घडवून आलेत त्या प्रक्रिया मधून राष्ट्र ही भावना प्रचलित होत गेली. असे सांगितले.
२.मा. सुधाकर मोहोळ (सेवा निवृत्त सहाय्यक अभियंता IRS, (सामाजिक चिंतक)) यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक राजकीय कार्याचा उल्लेख मांडला, व अंतिम तहा बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकारणा पेक्षा सामाजिक आंदोलनास महत्त्व दिले असे मत मांडले. व बाबासाहेब बोलले होते की संपूर्ण भारत बौद्धमय करु, हाच उद्देश मला महत्त्वाचा वाटतो असे परखड व्यक्त झाले.
३. मा. डाॅ. प्रतीक देहाडे(सामाजिक चिंतक) यांनी महापुरुषांच्या आंदोलन उद्देश सांगून विषयाला न्याय दिला. ते बोलले की मूलनिवासी बहुजनांचे अभिसरण अर्थ एकीकरण करणे. महणजे भावाला भावाची भेट करून देणे. कारण हे सर्व एकाच व्यवस्थेने त्रस्त झालेले पीडित रूग्ण आहेत. सोप्या भाषेत सांगायचे तर,त्यांचे आणि आमचे दुखणे सारखेच आहे, फरक फक्त एवढा की, आम्हाला कपडे नाही म्हणून दुखीचे निशाण दिसून येते, परंतु तुम्ही कपडे घातले म्हणून ते दुखणे झाकले गेले आहे, दिसून येते नाही. मात्र त्रास सारखाच होतोय, म्हणून आम्हाला एकत्र येणे गरजेचे आहे. अडचण येवढी आहे की, ते आजारी तर आहे परंतु ते इलाज चुकीचा घेत आहेत. ज्यांनी त्यांना आजारी पाडले त्याच्याकडे औषध मागत आहेत म्हणून आजार बरा न होता पसरत जात आहे हे आपल्याला थांबवायला पाहिजे.असे सांगितले.
४.मा. संतोष थोरात(संघटन सचिव, मूलनिवासी संघ म. रा.)
यांनी या विषयावर मत मांडले, विषयात मूळनिवासी बहुजनांची एकीकरण करणे म्हणजे, जी नाही आहे ते करणे होय. तेव्हाच राष्ट्र निर्माण शक्य आहे. परंतु देशात लोकांना भ्रमित करणाराही वर्ग आहे. देशात विविध जाती, धर्म, पंत, संप्रदाय आहेत, त्यांना भारतीय संविधानाने एकत्र केले आहे, परंतु देशात ब्राह्मणवादी समूह भारतीय नागरीकांना जात आणि धर्म श्रेष्ठ मानायला सांगत आहे, त्यामुळे प्रत्यक्षात देशात जनमाणसामधे राष्ट्र भावना निर्माण झालेली दिसत नाही. तो जात आणि धर्म ला समाज आणि राष्ट्र समजत आहे. म्हणून बहुजनांना संघटीत करायचे असेल तर जाती-धर्मा च्या श्रेष्ठत्वाची अफूची नशा,मुक्त करावा लागेल.व मूळनिवासी बहुजन या गौरवशाली भौगोलिक आणि संख्या दर्शक ओळखे अंतर्गत संघटीत करावे असे ते म्हणाले, आणि ब्राह्मणांच्या नितिमत्ता व ग्रंथावर आधारित चौपाइ कींवा म्हण, “पूजिअ विप्र शील गुन हीना | सूद्र न गुन गन ग्यान प्रवीना ||” अर्थात ब्राह्मण हा चरीत्रहीन, दुर्गुणी असला तरी तो पूजनीय आहे, आणि शुद्र कीतीही विद्वान, गुनी,असला तरी तो पूजनीय नाही. यावरच आधारित मराठी म्हण आहे – “ब्राह्मण कीतीही असला भ्रष्ट, तरी तीनही लोकी श्रेष्ठ” हे कविता सादर करुन स्पष्ट केले.
५. मा. अँड. प्रशांत जाधव (शिल्ड फाउंडेशन) यांनी बि. एस. 4 अभियानाचे प्रभावी चांगले परिणाम सांगितले, समाजाला संघटित करण्यासाठी नियोजन कसे करावे हे सांगितले.
६. मा. शिवाजी राजे(प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस, शरद चंद्र पवार गट) यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की, आजच्या घडीला राष्ट्रीय स्तरावर चर्चा केला जाणारा मुद्दा असेल तर तो संविधान आहे. कारण विपक्ष संविधान वाचवा ही भूमिका दर्शवित आहे, तर सत्ता पक्ष आम्ही संविधानानुसार चालत आहोत हे दर्शवित आहे, भले ते नाटक करत आहेत पण त्यांना हेकराव लागत आहे, याचे श्रेय बामसेफला जाते. का बामसेफ च्या जनजागृती मुळे देशात जनमत तयार होते,व प्रभाव मोठ्या प्रमाणात होतो. दोन्ही पक्ष संविधानाच्या विसंगत आहेत परंतु त्यांना मनमानी उघड करणे कठीण जात आहे कारण लोकतांत्रिक संविधान मनमानी करू देत नाही. म्हणून ते वेळोवेळी वेगवेगळ्या माध्यमातून संविधानाचा कु प्रचार करत आहेत. मग तो आरक्षण असो अथवा कोणत्याही मुद्दा. हल्ली बदलापूर मधे लहान मुलीवर अत्याचार झाला परंतु प्रशासन वेळेत योग्य कारवाई करत नाही तर वेगवेगळ्या माध्यमातून संविधान, न्यायव्यवस्था, कायदा बरोबर नाही हे दर्शविण्याचा प्रयत्न करत आहेत. वर्तमान सत्ता पक्षने न्यायव्यवस्था, प्रशासन हस्तगत केली असेही ते म्हणाले. म्हणून यूवा,महिला, तरूणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असले तरी आपल्या हक्क अधिकारासाठी संघटीत व्हायला पाहिजे अशी आशा व्यक्त केली. व जेव्हा जेव्हा गरज मदत असेल तर मला बोलवा मी शामिल होऊन आंदोलनात सहभागी होणार असे आश्वासन दिले.

७. मूलनिवासी राजकुमार मांझी (उपाध्यक्ष बामसेफ म. रा.) यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सभेला संबोधित करताना मूळनिवासी आणि ब्राह्मण हे वेगळे आहेत हे स्पष्ट करताना संविधानिक यंत्रणा आणि नियंत्रण संस्था यातील फरक स्पष्ट केला, संविधानिक वर्गाची वर्गवारी आणि राज्य राज्यातील वर्गवारी यात वर्गिकरण क्रम वेगवेगळे आहेत हे सांगितले. आणि राहणीमान देखील मूळनिवासींची राज्याच्या निर्धारित नियमावर अवलंबून आहे. परंतु ब्राह्मण वेगळे दिसून येतात हे सांगण्यासाठी शशी थरूर कसा गोरा, चिट्टी, उंची, बांधा,केरळ राज्यातील बापी,मंडल लोक कसे दिसतात?आहेना फरक भारतीय मूळनिवासी व्यक्ती च्या विसंगत आहे.असे स्पष्ट केले. आणि संपूर्ण भारतात ब्राह्मण वर्गाची, वर्गवारी सारखीच आहे, कोणत्याच राज्यात बदल नाही, त्यांची राहणीमानही सारखीच असते. असे सांगितले. म्हणजे आमचे भारतीय मूळनिवासींचे चरित्र, सवभाव, संस्कृती, चाली, रिती हे राज्यवर अवलंबून आहे. परंतु ब्राह्मणांच्या चाली, रिती, संपूर्ण देशात सारखेच आहेत. असे स्पष्ट केले. हाच फरक आहे आमच्यात आणि त्यांच्यात.. आणि आपल्या महापुरुषांनीही सिद्ध केले की ब्राह्मण विदेशी आहेत. आणि स्वतः ब्राह्मण व्यक्ती बोलत आहेत की आम्ही बाहेरुन आलोत. सुरत गुजरात मधी विश्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया स्वतः म्हणाला की आम्ही इरान वरुन लढत लढत इथपर्यंत आलोत, आता इथून पुढे कुठे जावे? म्हणजे sc, st, obc, minority, हे भारतीय मूळनिवासी आहेत. आणि भारतात ८५℅ इतकी टक्केवारी आहे. प्रश्न निर्माण होतो की संख्येने जास्त असूनही मूळनिवासींचे देशात खच्चीकरण का झाले आहे? हा चर्चा करण्याचा विषय आहे. मागील दोन शतकात देशाची आर्थिक वृध्दी झालेली आहे.
जागतिक सह भारतीय आर्थिक प्रक्रिया स्पष्ट केली. भारत चीन, हे जगातील स्तरावर आर्थिक स्त्रोत आहेत, लोकसंख्या, ग्राहक, युवा जास्त आहेत म्हणून इतर देशांचे लक्ष या भारतावर केंद्रीत झाले आहे. परंतु येथी, पुजीपती उच्चवर्णीय समूह हे देशात धनवान होऊन स्थापित झालेले आहेत. ते तरुणांना कींवा मूळनिवासींना विकसित होउ देत नाहीत. म्हणून देशाची प्रगती होण्यास अडथळा निर्माण होत आहे. या सर्व समस्या आहेत म्हणून या देशात मूळनिवासींचे एकत्रिकरण व्हावे असे आम्ही करू इच्छितो. आणि हे करण्यासाठी कार्यकर्तेंना मार्गदर्शन करुन प्रेरित केले.
आणि या सत्राचे आभार प्रदर्शन मूलनिवासी संजय मोहिते (सचिव मूलनिवासी संघ ठाणे जिल्हा) यांनी केले. व कार्कत्यांनी पोलीस प्रशासनाचेही आभार मानले,
अशाप्रकारे हा लोकतांत्रिक संविधान यशस्वीतेचा लोक महोत्सव संपन्न झाला.

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *