• 68
  • 1 minute read

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

तंत्रज्ञान पुढे, पण आत्मा मागे: बॉर्डर २ विरुद्ध बॉर्डर १

ही जेन झी जेन अल्फा टाळ्या वाजवू वाजवू बॉर्डर २ बघतायत. यांना काय माहिती बॉर्डर १ ची क्रेझ. जी आजही आहे. बॉर्डर २ बॉर्डर १ च्या जवळपासही नाही. दोन्ही चित्रपटात प्लॉट १९७१ चाच आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने updated असला तरीही बॉर्डर २ पेक्षा बॉर्डर १ च जास्त authentic वाटतो.

 
बॉर्डर १ चा USP होता त्याचा बॅकग्राऊंड स्कोर. आदेश श्रीवास्तवचा. बॉर्डर २ ला देखील शेवटी त्याचाच आधार घेऊन टाळ्या घ्याव्या लागल्यात. जावेद अख्तर यांची अवीट गाणी आणि अनु मलिकचे अजरामर संगीत. कायम plagiarism चा शिक्का लागलेल्या अनु मलिकने बॉर्डरसाठी दिलेले संगीत खरच अप्रतिम आहे. २ मधली गाणी आवडली नाही. सोनू निगम आणि रूपकुमार राठोड Legend का आहेत हे २ ची गाणी ऐकून समजतं. विशाल मिश्रा आणि अरिजित सिंग husky singing चे competition करतात काय? आरं मोकळं गा की राजाहो. अर्थात दोघेही मोठे गायकयेत, पण आपलं एक मत! त्यांच्यापेक्षा Diljit Dosanjh चा आवाज काय लागला आहे. मस्त एकदम!
 
बॉर्डर २ च्या नट नट्यांच्या acting बद्दल काही बोलणार नाही. कारण बोलण्यासारखे काही नाहीच.  बॉर्डर १ कधीही विस्मृतीत जाणारा सिनेमा नाही. सीन टू सीन लक्षात राहणारा सिनेमा. बॉर्डर २ ची क्रेझ आजच्या जनरेशनची आहे. लवकर hype आणि लवकर विस्मृती.
 
तरी बॉर्डर १ बॉर्डर २ च्या कानात हळूच म्हणत असेल 
 
चमन में इख़्तिलात-ए-रंग-ओ-बू से बात बनती है
हम ही हम हैं तो क्या हम हैं तुम ही तुम हो तो क्या तुम हो
(शायर: सरशार सैलानी)
 
डॉ. आशिष तांबे
0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *