• 33
  • 1 minute read

तरीही कॉंग्रेस बरी कशी…?

तरीही कॉंग्रेस बरी कशी…?

तरीही कॉंग्रेस बरी कशी…?

———————————–
आंबेडकरी विचारधारेचे राजकारण महाराष्ट्रात ऊभेच राहू नये म्हणून सरंजामी वृत्तीच्या कॉंग्रेस पक्षाच्या दगाबाज राज्यकर्त्यांनी गेली ६० वर्षे सातत्याने षडयंत्र करीत नवे नवे डाव खेळून आंबेडकरी राजकीय चळवळीला ब्रेक लावण्याचा खास प्रयत्न केला आहे…!!
रिपब्लिकन पक्षाचे गट तट कायम राहिले पाहिजे या दृष्ट भावनेपोटी कॉंग्रेसच्या सरंजामी नेत्यांनी रा. सु. गवई साहेबांना नेहमी सोबतं ठेवले. त्यांना व्यक्तीशः विधानपरिषदेचे उपसभापती, सभापती अशी बक्षिसी मिळतं राहिली मात्र त्यांच्या संपूर्ण आयुष्यात ते त्यांच्या रिपब्लिकन गटाचा एकही आमदार कधीच निवडून आणू शकले नाही.ही वस्तुस्थिती आहे. हा इतिहास आहे. रा. सु. गवई साहेबांचे विधान असायचे सिट ऑर नो सिट् बट वोट फॉर कॉंग्रेस.(Seat or no seat but vote for Congress….!! अशा पार्श्वभूमीवर आंबेडकरी विचारधारेचा पक्ष आणि राजकीय ताकद कशी निर्माण होईल.???
रिपब्लिकन पक्षाचे गट तट कायम राहिले पाहिजे या दृष्ट भावनेपोटी रामदास आठवले यांना सरंजामी वृत्तीच्या कॉंग्रेस पक्षाच्या दगाबाज नेतृत्वाने समाज कल्याण मंत्री बनविले. त्यांच्या रिपब्लिकन गटाचे प्रितमकुमार शेगावकर, दयानंद म्हस्के, आणि गंगाधर गाडे. हेही मंत्री झाले. मात्र यापैकी एकही जण प्रत्यक्ष निवडणुकीत ऊभा राहून निवडून आला नाही. त्यांना विधानपरिषदेचे आमदार बनविले आणि व्यक्तीशः बक्षिसी मिळाली. रिपब्लिकन पक्षाची ताकद म्हणून निवडणूक लढून ते जनमतावर निवडून आलेले नेते नाहीत…!!
आंबेडकरी समुहातील संधीसाधू लोक हेरायचे, त्यांना सत्तेचे तुकडे द्यायचे आणि मांडलिक म्हणून वागवायचे हा सरंजामी बाणा अवलंबतं रिपब्लिकन राजकारण संपवण्यासाठी थंड डोक्याने कॉंग्रेस पक्षाचा दगाबाज नेता सातत्याने प्रयत्न करीत राहिला…!!

दुसऱ्या बाजूने स्वाभिमानी राजकारण ऊभे करीत निवडणुकीत उमेदवार ऊभे करुन स्वबळावर निवडून येऊन आंबेडकरी विचारधारेचा राजकीय पक्ष ऊभा करण्याचा यशस्वी प्रयत्न जेव्हा जेव्हा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केला ,त्याला शह देण्यासाठी दगाबाज कॉंग्रेशी नेतृत्वाने भारिप बहूजन महासंघाचे आमदार आणि मंत्री आमिष दाखवून फोडले.त्यांना कॉंग्रेस पक्षात सामावून घेतले…!!

१९९३ साली भारिपच्या तिकिटावर किनवट विधानसभा निवडणूक लढवून निवडून आलेला
आमदार भिमराव केराम.
कॅबिनेट मंत्री मखराम पवार, (मुर्तिजापूर विधानसभा)
कॅबिनेट मंत्री. डॉ. डी. एम. भांडे. (अकोला पूर्व विधानसभा)
राज्यमंत्री रामदास बोडखे. ( अकोट विधानसभा.)
आमदार वसंत सुर्यवंशी (साक्री विधानसभा.)
आमदार बळीराम सिरस्कार (बाळापूर विधानसभा)
आमदार हरिदास भदे. (अकोला पूर्व विधानसभा.)
हे सर्व आमदार भारिप बहूजन महासंघाचे स्वबळावर निवडून आले आहेत. मात्र त्यांना आमिषे देऊन कॉंग्रेस पक्षात सामावून घेतले हा महाराष्ट्रातील आंबेडकरी विचारधारेच्या राजकीय पक्षाचा इतिहास आहे…!!

रिपब्लिकन पक्ष एकसंध आणि सक्षम पणे ऊभा राहू नये म्हणून गट तट कायम ठेवले, त्यासाठी सत्तेच्या तुकड्यांची आमिषे दिली गेली….!!
स्वाभिमानी राजकारण सुरू करुन आपली ताकद दाखवून देतं असेल तर त्या नेतृत्वाला नामोहरम करण्यासाठी त्याचे सहकारी, आमदार, मंत्री फुस लावून, आमिषे देऊन फोडायचे आणि त्याची ताकद खच्ची करायची असे प्रयोग करणारा दगाबाज नेता आणि दगाबाज कॉंग्रेस पक्ष आंबेडकरी समुहाने दगडापेक्षा मऊ आहे हे म्हणणे कितपत योग्य आहे…!!
आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकी पुर्वी पुन्हा एक रिपब्लिकन गट जन्माला घातला गेला आहे. त्याचे पालकत्व दगाबाज नेतृत्वाकडेच आहे…!!
संधीसाधू लोक पिढी दरपिढी येतं राहतील. गट निर्माण करुन स्वकल्याण साधून आंबेडकरी विचारधारेचं राजकारण नासवून जातील….!!
परंतु आपणं आंबेडकरी समुह म्हणून यांना रोखणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे…!!

– प्रा.भास्कर भोजने (फुले आंबेडकरी विद्वत सभा अकोला)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *