आजच्या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कंपूने तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत महाराजांचा देह सोडून दिला अन नंतर अशी आवई उठवली कि महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले.
इंद्रायणीच्या डोहात रडले मासे सांगा ओ सांगा वैकुंठीचे विमान कसे होते ???? व सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक गरूड होता यावर कोणत्याही जिवंत माणसा�चा विश्वास बसणार नाही …!!!!
तुकाराम महाराज यांची हत्या करताना पांडू मांग नावाच्या तरुणाने बघीतली होती.गावात येवून त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होते. पण भटांनी आवई उठवली महाराज वैकूंठाला गेले
बरे गेलेच असे समजले तरी ते एकादशीे सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीला अभद्र दिवशी का गेले होते ?
ते विमान वैकूंठावरून आले होत म्हणेे मग आतापर्यंत च्या इतिहासात एकदाच का आले ? मग आता काय त्याची फेरी बंद पडली का ? कि वैमानिक फरार आहे ?
.बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकूंठाला गेले मान्य आहे मग सर्व जगात बोलबाला व्हायला पाहीजे होता.एकाही बामणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव का येत नाही?
किती ब्राह्मण देहुला दर्शन घ्यायला जातात ?
आळंदी इतका विकास देहूचा का झाला नाही ? कारण ज्ञानेश्वर महाराज ब्राह्मण व तुकाराम मराठा होते हे मराठ्यांनो का लक्षात येत नाही ? उभ्या जगात ही एकमेव घटना घडली मग बामणांच्या तोंडी रामदासाचेच का नाव येते ? आषाढी एकादशीला ज्ञानेश्वरांच्या पालखीसमोर तुकोबाची आरती का होवू दिली जात नाही?
तुकारामांची हत्या मंबाजी भट व इतरांनी केली व आवई उठवली ते वैकूंठाला गेले.
इंद्रायनीचा मासा विचारतो नभा | वैकुंठाला तुका नेला कैसा || माझा भोळा देव कारे तु चोरला | मोह कैसा आवरला नाही तुला || मारोनी त्यासी भट झाला थोर | जीवासी खेळ कैसा केला || दादा म्हणे माझा तुका देहभाव | गाथा रुपी अमर जगी झाला ||