धुळे दि.१०(यूबीजी विमर्श-संहिता) – धुळे जिल्हा वकील संघाचे सन्माननीय सदस्य, महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे सक्रिय सदस्य, तसेच संपूर्ण महाराष्ट्र व गोवा वकील संघात लाडके, ज्युनिअर वकिलांचे मार्गदर्शक, नेहमी वकिलांच्या अडचणींना तत्परतेने धावून जाणारे, प्रभावी नेतृत्वगुण व समयसूचकता असलेले, हसमुख व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले ॲड. अमोलदादा सावंत यांची दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा बारच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धुळे जिल्हा वकील संघाने मुंबईत बार कौन्सिल च्या कार्यालयात जाऊन सत्कार करण्यात आला. या वेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. राहुल पाटील, उपाध्यक्ष ॲड. मधुकर भिसे, सचिव ॲड. उमेशकांत पाटील, ॲड. बळीराम वाघ, कार्यकारणी सदस्य ॲड. उमाकांत घोडराज, ॲड. अर्जुन महाले, ॲड. ललित महाले, ॲड. अमोल बडगुजर, तसेच ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. विजय रंवदळे, ॲड. हितेश कबाडे, ॲड. राहुल शिकारे, ॲड. योगेश खैरनार, ॲड. प्रशांत चौधरी आदींनी अमोल सावंत सरांचे अभिनंदन केले. अमोल सावंत धुळे बारचे सदस्य असल्याने जिल्हा वकील संघाचा सन्मान व प्रतिष्ठा महाराष्ट्र आणि गोवा राज्यात वाढली असल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमास वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.