• 670
  • 1 minute read

नव नालंदा विद्यापीठ निर्मिती

नव नालंदा विद्यापीठ निर्मिती

भारताचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्रीची शपथ घेलेले नरेंद्र मोदीं यांनी  19 जून 2024 रोजी भारत आणि पूर्वी एशिया शिखर संमेलनाला उपस्थित राहण्या पूर्वी ‘ नालंदा विश्वविद्यालय न्यू कैंपसचे उद्घाटन. केले. उद्घाटन सोहळ्यास एशिया शिखर संमेलनाचे 17 देशाचे प्रमुख उपस्थित होते. भारताच्या प्रगत शैक्षणिक प्रयत्नांच्या चिरस्थायी भावनेचा आणि भारताच्या G20 प्रेसिडेन्सी थीम, वसुधैव कुटुंबकम यांच्याशी सुसंगत जागतिक समुदाय तयार करण्याच्या त्याच्या वचनबद्धतेचा जिवंत पुरावा म्हणजे भारताच्या G20 परिषद मध्ये विदेशातून आलेल्या सर्व राष्ट्र प्रमुख पाहुणे याना 
राष्ट्रपती द्रोपती मूर्मु याच्या हस्ते नालंदा विद्यापिठाची प्रतिकृती पाहुण्यांना भेट देण्यात आली.

भारताचा गौरवशाली इतिहास  सांगणारे प्राचीन नालंदा विद्यापीठ ख्रिस्त पुर्व ६ व्या शतकात ज्ञानाचे केंद्र होते. १२ व्या शतकात खिल्जीने हे साम्राज्य उद्धस्त करण्यापुर्वी जगातील  जवळपास १० हजार विद्यार्थी शिक्षण घेत तर देशोविदोशीचे २००० शिक्षक शिकवीत होते. नालंदा येथे शिकवणारे काही उल्लेखनीय विद्वान हे नागार्जुन (सर्वात महत्त्वाचे महायान तत्त्वज्ञ), दिनागा (भारतीय तर्कशास्त्रातील बौद्ध संस्थापकांपैकी एक), धर्मपाल (बंगाल प्रदेशातील पाल साम्राज्याचे दुसरे शासक) बुद्धपालिता, शांतरक्षिता और आर्यदेव असे महान विद्वान शिक्षक होते.चिनी यात्री ह्वेन सांग, फाह्यान आणि इत्सिंग यांनी सहा वर्ष राहून नालंदा विद्यापीठ
मध्ये शिक्क्षण घेतले. विद्वान ह्वेन सांग याने आपल्या देशी जाताना बौद्ध धम्माचे 600 ग्रंथ सोबत घेवुन गेले.जगातील सर्वात प्राचीन
विद्यापीठां पैकी एक म्हणून नालंदा विद्यापीठ
ओळखले जाणार आहे.
प्राचीन काळी नालंदा विद्यापीठ मध्ये अभ्यासक्रमात फक्त बौद्ध धम्मच नव्हे तर वैदिक धर्मशास्त्रे. वेदाध्ययन, अध्यात्म, व्याकरण, हेतुविद्या, आयुर्वेद, सांख्यदर्शन, , ज्योतिष, व पाणिनीसूत्रे , तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, मेटाफिजिक्स, वैद्यकशास्त्र अश्या 64 कलाचे शिक्षण दिले जात होते.सध्याच्या शिक्षणाचे फक्त भगविकरण करणाऱ्या सरकार आणि शिक्षण मंत्री यांनी नालंदा विद्यापीठचा आदर्श घेतला पाहिजे.कारण त्यावेळी विविधता, योग्यता, विचारस्वातंत्र्य, सामूहिक शासन, स्वायत्तता आणि ज्ञानाची देवाणघेवाण लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत असेच शिक्षण दिले जात होते.नालंदा विद्यापीठ हा जगासाठी ज्ञानदीप होते.
बख्तियार खिलजीने इसवी सन 1190 मध्ये नालंदा विद्यापीठाचे साम्राज्य. उध्वस्त करण्या पूर्वी विद्यापीठाचे 300 शिकविण्याचे रूम होते. सात मोठे सभागृह होते.जगाला प्रज्ञावान करणारी नऊ मजली 90 लाख ग्रंथाची लायब्ररी होती.अतिशय मौल्यवान, दुर्मिळ ग्रंथ संपदा. म्हणजे जगाच्या 75 टक्के ज्ञानाचा साठा होता.नालंदा विद्यापीठाला किल्ला समजून उध्वस्त करण्यात आले.नऊ मजली लायब्ररीला आग लावण्यात आली.ही आग सलग तीन महिने पेटत होती.जगातील पहिले उच्चतम दर्जाचे विद्यापीठ जळाल्याने मानवी समतेचा विचार तीन हजार वर्ष मागे पडला.
नव नालंदा विद्यापीठ निर्माण करण्यासाठी जगातील 17 देश पुढाकार घेत आहेत.यावरून नालंदा विद्यापीठ ची महानता लक्षात येते.बौद्ध धम्म आणि साम्राज्य या वैभवाचां  ऱ्हास झाल्या नंतर भारतावर अनेक देशांनी राज्य करून भारताला गुलाम बनविण्याचा इतिहास आहे.
इंग्रजांनी तर भारतावर १५० वर्ष राज्य केले.भारतीय गुलाम का झाले याची कारणे डॉ.बाबसाहेब यांनी आपल्या क्रांती आणि प्रतिक्रंती यांग्रंथात सविस्तर माडला आहे.बहुजन हा देव धर्म आणि ब्राह्मण पुरोहित याच्या धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होत नाही तोपर्यंत तो सामाजिक धार्मिक आर्थिक आणि राजकीय सत्ता प्रस्थापित करू शकत नाही.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी पंचशीलचे समर्थक केले नसते डॉ
बाबसाहेब भारताची राजमुद्रा अशोक स्तंभ आणि राष्ट्र ध्वजवर अशोकचक्र याना स्थान देऊ शकले नसते.गत वेभव हरवलेल्या नालंदा विद्यापीठच्या भिंती ,800 वर्षां पासून ओरडुन सांगत आहेत .की आमचेही पुनर्निर्माण करा.नेहरू आंबेडकर यांच्या जाणिवेतून राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी 20 नोव्हेंबर 1951 रोजी नालंदा विद्यापीठ नवं निर्माण करण्याची आधारशिला लावली.भिक्षु जगदीश कश्यप यानी बिहार सरकारकडे विनंती करून  “मगध इंस्टीट्यूट ऑफ पोस्ट-ग्रेजुएट स्टडीज एंड रिसर्च इन पाली एंड एलाइड लैंग्वेजेज एंड बुद्धिस्ट लर्निंग” नावाची एक शोध संस्था  स्थापना केली.त्यांनी 1955 साला पर्यंत देवनागरी लिपि मध्ये  संपूर्ण पाली त्रिपिटक  41 खंड प्रकाशित केले.
जगाला युद्ध नको बुद्ध हवा असा शांतीदूत बुद्ध याना बोधी साक्षात्कार झालेल्या बिहार गया ही जगासाठी पावित्र्भुमी आहे.जगातील लोक या भूमीला भेट देण्यास येताना बौध्द गया येथे पायात चपल घालत नाहीत.प्रत्येक बौध्द राष्ट्राची येथे भव्य अशी महविहार असून जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र बनले आहे.1946 पासून बिहारचे 23 मुख्यमंत्री झाले. ओबीसी लालु प्रसाद यादव दिर्घ काळ मुख्यमंत्री राहिले. मागासवर्गीय भोला पासवान तीन वेळ तर पी.बी मण्डल एक वेळ मुख्यमंत्री राहिले.बुध्दाची पवित्र भूमी बिहार मध्ये असल्याने सर्व बौद्ध राष्ट्रांनी बिहारची गरिबी कमी करण्यासाठी नेहमीच आर्थिक मदत दिली आहे.
तसेच जागतिक कीर्तीचे पर्यटन केंद्र असल्याने बिहार सरकारला त्याचा देखील आर्थिक फायदा झाला आहे.यामधून जागतिक कीर्तीचे नालंदा निर्माण करण्यासाठी एकही मुख्यमंत्रीने विशेष प्रयत्न केल्याचे दिसत नाही.
सनातनी याना बुद्ध आणि त्याचा देव स्वर्ग आत्मा नाकारणारा धम्म नको आहे.पण डॉ.बाबसाहेब यांनी बौध्द धम्म घेतला त्याच्या नावाने राजकारण करणारे जगजीवन राम भारताचे उपप्रधान मंत्री होते. राम विलास पासवान तर सरकार कोणतेही असो सलग सात वेळा केंद्रात मंत्री होते .मिरा कुमार काँग्रेसच्या लोकसभा स्पीकर होत्या. नितीन मांझी बिहारचे मुख्यमंत्री होते.कित्येक वर्षे बोगस डिग्री मिळविण्यात बिहारला बदनाम केले जात होते.त्याची चीड येवून जरी नालंदा विद्यापीठची बिहार सरकारमे नवं निर्मिती करण्याची गरज होती.
             बुद्धम् शरणम् गच्छामी
म्हणजे बुध्दाला नव्हे तर स्वतःच्या बुद्धीला शरण जाणे होय. ज्ञान प्राप्तीची अवस्था म्हणजे बुद्ध होय. जागृत अवस्था ही धर्म पंथ जात भाषा आणि प्रांत याच्या पलीकडे जावून मानवी कल्याण आणि विकासाचा विचार करीत असते.धर्माने मुसलमान असेल तरी
राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी चंद्रावर यान पाठवून भारताला जगाच्या प्रगत राष्ट्राच्या पागतीत बसविले.बिहार! विधिमंडळामध्ये 2006 साली
आपल्या भाषणात प्राचीन जागतिक कीर्तीचे नालंदा विद्यापीठाचां गौरवशाली इतिहास मांडून बिहार सरकार कडे पुन्हा नव्याने नालंदा विद्यापीठ सुरू करण्याची मागणी केली.यावर भारतात चर्चा झाली नसली तरी 2007 साली
फिलिपाईन्सच्या दुसऱ्या आशियाई शिखर परिषद मध्ये चर्चा झाली.वाढता दहशतवाद पर्यावरणाचां बिघडणारा समतोल आणि वाढती बेकारी बेरोजगारी ही संपूर्ण जगाची समस्या असून माणसांनी माणसाशी माणसा सारखे वागण्यासाठी बौद्ध तत्त्वज्ञानाची गरज आहे.त्या पद्धतीचे शिक्षण मिळण्यासाठी बिहारच्या बुद्ध भूमी प्राचीन नालंदा विद्यापीठ जवळच नव नालंदा विद्यापीठ स्थापन करण्याची जगातील 17 देशानी नुसती. मागणी केली नाही तर आर्थिक निधी देण्याचे घोषित केले.
थायलंड मध्ये चौथी आशियाई शिखर परिषद ऑक्टोबर 2009 झाली. त्यामध्ये देखील नालंदा विद्यापीठ निर्माण बदल भारत सरकारला विचारण्यात आले.17 देशांनी आपला निधी देखील देऊ केला.अखेर तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी नालंदा विद्यापीठ मंटर ग्रुप स्थापन करून राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांना अध्यक्ष म्हणून आणि नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन याची सचिव म्हणून नियुक्ती केली आणि 25 नोव्हेंबर 2010 रोजी नालंदा विद्यापीठाच्या स्थापने साठीचा कायदा मंजूर केला.केंद्राने पुढाकार घेतल्यामुळे बिहार सरकारने नव नालंदा विद्यापीठ निर्माणसाठी प्राचीन नालंदा विद्यापीठ जवळ ५०० एकर जमिन उपलब्ध करून दिली.विश्वविद्यालय अनुदान आयोगाने एकूण २७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.सर्वसामान्यपणे विद्यापीठे ही केंद्रीय शिक्षण संस्था या केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत असला तरी नालंदा विद्यापीठाचा कारभार हा परराष्ट्रसंबंध मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली चालतो.
तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या याच्या कार्यकाळात 2014 साली नव नालंदा विद्यापीठ सुरू करण्यात आले.प्रथम दर्शनी 30 देशातील 1400, विद्यार्थिनी प्रवेशासाठी नाव नोंदणी केली.परंतु त्यांना प्रवेश न देता ११ प्राध्यापक आणि 30 विद्यार्थी अशी सुरुवात करण्यात आली. सध्या ३० प्राध्यापक ३०० विद्यार्थी आणि ५० संशोधक विद्यार्थी
शिक्षण घेत आहेत.तत्कालीन परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज याच्या हस्ते नालंदाच्या आधुनिक अवतारात औपचारिक उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी स्वराज म्हणाल्या की, भूतकाळातील हे नालंदा  विद्यापीठ देशाला ज्ञानाच्या माध्यमातून जगाशी जोडण्यासाठी ‘सेतू आणि पाया’ म्हणून काम करेल.परंतु त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अधिक दक्ष असली पाहिजेत.?केंद्र सरकार शिवाय बिहार सरकार नव नालंदा विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. यात
नितीश कुमार अग्रेसर आहेत. त्यांनी निर्माण केलेले बुद्ध पार्क आणि रेल्वे स्टेशन वरील बौद्ध देखावे फारच प्रेक्षणीय आहेत. सध्या काँग्रेस भारतीय संविधान आणि डॉ.बाबसाहेब आंबेडकर याचा कितीही डंका वाजवीत असली तरी डॉ.बाबसाहेब याची सर्व पवित्र ठिकाण ही भाजप याच्या कार्यकाळात प्रेक्षणीय झाल्याचे वास्तव काँग्रेसला देखील मान्य करावे लागले. नव नालंदा विद्यापीठ देखील भाजपाच्या कार्यकाळात सुरू झाले
आणि नितीश कुमार भाजपच्या कार्यकाळात त्याची व्याप्ती वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.बिहारचे नालंदा विद्यापीठ याला जागतिक कीर्तीचां दर्जा प्राप्त होण्यासाठी भारतातील बौद्ध धर्मियांनी देखील सतत सरकारला जागे करण्यासाठी आवाज उठविला पाहिजे.

– आनंद म्हस्के (चेंबूर)

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *