• 85
  • 1 minute read

नव पेशवाईच्या दरबारात छत्रपतींच्या वंशजांचा अपमान…!

नव पेशवाईच्या दरबारात छत्रपतींच्या वंशजांचा अपमान…!

कुठलाही राजकीय पक्ष जिंकण्यासाठीच उमेदवार देतो व निवडणूक लढतो. उमेदवार ठरविताना प्रत्येक पक्षाची लायक उमेदवाराबाबत एक कसोटी असते. आता त्या कसोटीत उदयनराजे बसत नसतील म्हणून भाजप त्यांना उमेदवारी देत नसेल. लायकी काढत असेल तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण उदयनराजे छत्रपतींचे वंशज आहेत व छत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे उदयनराजे यांची लायकी काढणाऱ्या भाजपला छत्रपतींचा महाराष्ट्र या निवडणूकीत योग्य तो धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.
उदयन राजे छत्रपतींचे वंशज नसते तर यासंदर्भात काहीच बोलण्याची गरज नव्हती. पण भाजप छत्रपतींच्या वंशजांची लायकी काढत असल्याने यावर बोलावे लागते. खर तर या लोकशाही राज्य व्यवस्थेत उदयनराजे यांना छत्रपतींच्या गादीचे वारस म्हणणे चूक ठरेल. पण ते वंशज आहेत. हे खरे. अन् मग त्यांचा अपमान हा साऱ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. अन् संधी मिळेल तेव्हा भाजप हा अपमान करीत आहे. असे कही पहिल्यांदाच घडत आहे, असे नाही. छत्रपतींच्या वंशजांचा वेळोवेळी अपमान भाजपने केला आहे. उदयनराजे यांनाच याचा अनुभव अनेक वेळा आलेला आहे. पण सत्तेच्या लालसे पोटी ते ही अपमान करून घेण्यासाठी वेळोवेळी भाजपच्या दावणीला स्वतःला बांधून घेतात, हे छत्रपतींचें व त्यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
भाजप म्हणजे आधुनिक युगातील नव पेशवे असून ब्राह्मणी धर्म संपविणाऱ्या शिवशाहीचे ते कट्टर वैरी आहेत. अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत ब्राह्मणी पेशव्यांनी शिवशाही संपविली आहे. त्यासाठी कडेलोटाचा सामना ही त्यांनी केला आहे. छ्त्रपती शिवाजी राजे व छ्त्रपती संभाजी राजे यांच्याच विचारांचा प्रभाव व आदर्श असल्याने ५०० महार मावळ्यांनी भीमा कोरेगाव येथे २८ हजार पेशव्यांना कापून काढले आहे. हा पराभव पेशव्यांच्या जिव्हारी लागलेला आहे. अन् जेव्हा केव्हा भीमा कोरेगावच्या विजय स्तंभ त्यांच्या समोर येतो. तेव्हा ते छत्रपतींच्या महाराष्ट्रावर सूड उगवतात. तर त्यांच्या वळचणीला स्वतःच जाऊन हे वंशज ही स्वतःसह महाराष्ट्राचा अपमान करून घेतात.
विद्यमान लोकशाहीला मान्य नसले तरी राज्यातील जनतेच्या मनात राजे ही पदवी आहे. या मानाच्या पदवी पुढे एका खासदारकीची लायकी काहीच नाही. पण या वंशजांना हे कळतच नाही. म्हणून ते छत्रपतींची हुजरेगिरी करणाऱ्यांची हुजरेगिरी करीत आहेत. अन् याचाच फायदा उठवीत सूड भावनेने ते छत्रपतींच्या वंशजांचा अपमान करीत आहेत.
माझ्याकडे रेल्वेचे, विमानाचे तिकीट आहे. पण लोकसभेचे नाही, असे केविलवाणी पणे उदयनराजे बोलत आहेत. एका उमेदवारीसाठी किती लाचार व्हायचे हे त्यांनी आता तरी ठरविले पाहिजे. गेली आठ दिवस छत्रपतींचे वंशज एका तडीपारला भेटण्यासाठी दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. हे ऐकायला ही बरे वाटत नाही. भिकेत मिळत असेल तर त्या उमेदवारीवर लाथ मारून राज्यातील जनतेच्या मनातील राजे या पदवीचा उदयनराजे यांनी सन्मान करावा, अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे.
बाकी स्वतःची व छत्रपतींच्या वंशाची किती इज्जत घालून घ्यायची हे उदयनराजे यांच्या हातात आहे. भाजपने तर २०१९ मध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढलेल्या नरेन्द्र पाटील यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे.

-राहुल गायकवाड
(महासचिव, समाजवादी पार्टी महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”

निवडणूक ईव्हीएम मधील हेराफेरी, काळ्या पैशाचा महापूर, व निवडणूक आयोगाची निष्क्रीयता या विरोधात बीआरएसपी लढा उभारणार”…
आंबेडकरी चळवळ व मिशन चालविणारेच डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नांतील वर्ग व वर्णहीन भारताच्या निर्मितेतील अडथळे….!

आंबेडकरी चळवळ व मिशन चालविणारेच डॉ. आंबेडकर यांच्या स्वप्नांतील वर्ग व वर्णहीन भारताच्या निर्मितेतील अडथळे….!

विधानसभा निवडणुकीतील 4,140 उमेदवारांमध्ये रिपब्लिकन पक्ष, आंबेडकरी विचारांच्या 19 पक्षांचे अन अपक्ष बौद्ध उमेदवारांची संख्या 2040…
अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

अपप्रचार करणाऱ्या नवाब मलिक यांच्या विरोधात कारवाई करा – अबू आझमी यांची अजित पवार यांच्याकडे मागणी

नशेच्या प्रकरणावरून मानखुर्द – शिवाजीनगरमधील जनतेची बदनामी सहन केली जाणार नाही…. अबु आजमी यांचा अजित पवार…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *