सत्यशोधक कम्युनिष्ठ नेते प्रा.रणजित परदेशी अंथरुणाला खिळलेले असतांनाच त्यांच्या पत्नी आणि विचारवंत सरोज कांबळेंच्या मरणाबाबत त्यांच्या मुलाकडे अंगुलीनिर्देश केला जात आहे.त्यानेच आपल्या आईला छळ-मारहाण करुन ठार केल्याच्या बातम्या झळकत आहेत.या पार्श्वभूमीवर माझ्या नात्यातल्या पतीपत्नींच्या अश्याच प्रकारे दिड वर्षांपुर्वी तडफडत झालेल्या मरणाची कथा आठवली. तो कस्टममध्ये प्रिव्हेंटीव्ह आॅफिसर;तर पत्नी शिपिंग कार्पोरेशनमध्ये कामाला.एक मुलगा,एक मुलगी चौकौनी कुटुंब.पत्नी ऐच्छिक निवृत्ती घेते!तर पती येणार्या पैश्यांच्या ओघामुळे व्यसनाधिन होतो.नव्या मुंबईत हजार फुटाचा ब्लाॅक.कधी तरी त्याला कँसरचे निदान होते.उपचार सुरु असतांनाच युवावस्थेत जाणार्या मुलाच्या हातात सुत्रे एकवटतात.बँकेतील वेतनही तोच काढून ऐश करु लागतो.मायबापांचा छळ सुरु होतो.त्याच्या मरणाच्या आठवडाभर अगोदरच मुलाला आई तंबाखू खाण्यावरुन टोकते.मुलगा आईला बेदम मारहाण करीत असताना अंथरुणावरुन कसाबसा उठून बाप आवरायचा प्रयास करतो.त्या अन्न भरवण्यासाठी नाकात नळी घातलेल्या बापाला मुलगा उरावर बसून मारपीट करतो.त्यानंतर ४-६दिवसात बापाचा अखेर मृत्यु. आता घरात आई-मुलगा-मुलगी.ते हाॅटेलातून दोघांपुरतेच जेवन मागवतात.आई कशीबशी छळ,उपासमार सहन करीत महिना काढते आणि बरोबर एक महिण्याने जवळच्या दूसर्या इमारतीच्या छतावरून झेप घेवून मरणाला कवटाळते. हे काय चाललेय? कोसळणारे कौटूंबिक नात्यांचे हे गुन्हेगारीकरण समाजाला रोखता येणार नाही काय? समाजाच्या या वाढत्या संवेदनहीनतेची घसरण कशी थांबवता येईल?