• 71
  • 1 minute read

निवडणुकीचे निकाल ठरविणार : हिंदू / ब्राह्मणी राज्य व्यवस्थेची पुन्हा स्थापना की संविधानाचे राज्य कायम राहणार ?

निवडणुकीचे निकाल ठरविणार : हिंदू / ब्राह्मणी राज्य व्यवस्थेची पुन्हा स्थापना की संविधानाचे राज्य कायम राहणार ?

ज्या शिवसेनेनी साथ दिली. महाराष्ट्राच्या राजकारणात स्थान मिळवून दिले, त्याच सेनेला फोडून, संविधान पायदळी तुडवून एकनाथ शिंदेसोबत सरकार स्थापन करुन ही राज्यात दहाचा ही आकडा पार करु शकत नाही, हे स्वतःच केलेल्या एका सर्व्हेतून पुढे आल्यावर राष्ट्रवादी फोडली. ज्या अजित पवारांवर गेली दहा वर्ष सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना उपमुख्यमंत्री करुन राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ही त्यांच्याकडेच दिल्या. तरी ही काटा/ आकडा दहाच्या पुढे सरकत नाही, हे पाहिल्यावर संघ व भाजपने पुन्हा एकदा बी टीमचा प्रयोग सुरु केला. आज बी टीमच्याच भरवशावर भाजप देशभर लोकसभा निवडणूका लढवित आहे. तसेच ईडी व सीबीआयला ही मदतीला घेतले. इतके करून दहाचा आकडा भाजप पार करु शकणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे चित्र केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशभरात अशीच अवस्था भाजपची आहे. जगातील सर्वांत मोठे सामाजिक संघटन व राजकीय पक्ष म्हणवून घेणाऱ्या संघ व भाजपची ही दयनीय अवस्था लाजिरवाणी आहे.
इलेक्ट्रोरल बॉण्ड व अन्य मार्गाने केलेल्या भ्रष्टाचारातून भाजपकडे हजारों कोटी रुपये जमा आहेत. बोगस पीएमच्या बोगस पीएम फंडातील कोटी रुपये गाठीशी आहेत. घोटाळेबाज EVM मशीन मदतीला आहे. सर्व पक्षांतील भ्रष्टाचारी नेत्यांना ईडी, सीबीआयचा धाक दाखवून व नोटीसा देवून स्वतःच्या पक्षात घेतले आहे. ती भ्रष्टाचारी फौज ही सोबत आहे. मोदी व भाजपने राम मंदिर बांधले अन रामालाच पैदा केल्याचा प्रचार केला जात आहे. तरी ही स्वतःच्या बळावर निवडणुकीला सामोरे जाण्याची हिम्मत संघ व भाजपची नाही. याचे प्रमुख कारण आहे व ते म्हणजे संघ व भाजपची विचारधाराच अमानवीय अन् अनैसर्गिक आहे. त्यामुळे संघ व भाजप कधीच या देशाचे सामाजिक व राजकीय नेतृत्व करु शकत नाही अन् करू ही शकणार नाही. संघाला अपेक्षित असलेला समाज ते कधीच निर्माण करु शकणार नाहीत. त्यांना जे हिंदू राष्ट्र निर्माण करायचे आहे. ते त्यांना कधीच करता येणार नाही.
समाजाला एकजूट करुन त्या समाजाचा विकास करणे, हे ब्राह्मणी व्यवस्थेच्या डीएनएमध्ये कधीच नव्हते. समाजाला विभाजित करूनच या शक्तींनी आपली सत्ता स्थापन केली. त्यासाठी अमानवीय व अनैसर्गिक समाज व्यवस्था वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून उभी केली. या व्यवस्थेला पुराणं व धर्म ग्रंथांचा आधार दिला. सर्व पुराणं, गीता, रामायण, महाभारत अन् मनुस्मृती ही भेदभेदावरच आधारित आहेत. या सर्व ग्रंथांनी या देशातील ८० टक्के समाजाला शूद्र ठरवून त्यांना गुलाम केले. त्यांचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार हिरावून घेतला. सर्व प्रकारच्या विकासाच्या प्रक्रियेपासून या बहुजन समाजाला वंचित ठेवले. हे उघड सत्य या बहुजनांना कळले आहे. त्यामुळे हा समाज भाजपला कधीच साथ व सत्ता देणार नाही. हे संघ, भाजपला चांगलेच कळत आहे. त्यामुळेच आपल्या विरोधातील मतांचे विभाजन करण्याचा अजेंडा ते या बहुजन समाजातीलच नेत्यांना हाताशी धरून राबवित आहेत. अन् यामध्ये ते यशस्वी ही होत आहेत.
हिंदू धर्मात ८० टक्के लोक हे शूद्र म्हणजे गुलाम आहेत. पण भारतीय संविधानाने या शुद्राची या धर्मांध शक्तींच्या गुलामगिरीतून मुक्तता केली असून बहुजन ही नवी ओळख त्यांना दिली आहे. त्यामुळेच संघ व भाजपचा संविधानाला उघड व जाहीर विरोध आहे. संविधान बदलून या देशात पुन्हा मनुस्मृतीमधील कायद्यावर चालणारे हिंदू राष्ट्र ( ब्राह्मणी राष्ट्र) स्थापित करण्याचा संघाचा मुख्य अजेंडा असून यासाठीच ४०० पारचा नारा भाजपने दिला आहे. यावेळी पाशवी बहुमत मिळवून संघाच्या स्थापनेचा शतक महोत्सवी सोहळा साजरा करीत असताना या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करणे, हा या शक्तींचा मुख्य अजेंडा आहे. २५ सप्टेंबर १९२५ रोजी नागपुरात संघाची स्थापना झाली. या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुढच्याच वर्षी संघाचे शतक महोत्सवी वर्ष सुरु होत आहे.
हिंदू राष्ट्र म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला पुन्हा स्थापित करण्यासाठी एक शतकापासून संघ अथक मेहनत करीत आहे. आज देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल संघासाठी शेवटीचीच संधी ठरणार आहेत. ब्राह्मणी समाज व्यवस्था पुन्हा स्थापित होणार की धर्म निरपेक्षता व माणूस केंद्र बिंदू असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे राज्य कायम राहणार ? हे ही निवडणूक व तिचे निकाल ठरविणार आहेत. त्यामुळे होत असलेली निवडणूक केवळ महत्त्वाची नाहीतर तर ती ऐतिहासिक ठरणार आहे. बाकी संविधानाच्या राज्यात सर्व नागरिक एक समान आहेत व ब्राह्मणी म्हणजे हिंदू राष्ट्रात ८० टक्के बहुजन समाज शूद्र ठरून पुन्हा गुलाम होणार आहे. संविधानानेच दिलेला मताचा अधिकार व ते मत आज आपल्याकडे आहे. यातील कशाची निवड करायची ते ही हेच मत ठरविणार आहे. आज आपला आहे. उद्या ही आपलाच असेल याचा निर्णय आपल्या हतात आहे.


– राहुल गायकवाड
(महासचिव, समाजवादी, पार्टी महाराष्ट्र प्रदेश)

0Shares

Related post

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

महाविकास आघाडी लढेगी नही, तो जितेंगी कैसे…?

भाजप – मित्र पक्षांच्या या अनपेक्षित यशाचे खरे श्रेय शरद पवार व मविआ नेत्यांनाच….!    …
7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *