- 54
- 1 minute read
सन्यस्त खड्ग नाटकामागील सावरकरांच्या हेतूचा जाहीर निषेध. – अॅड. डॉ. सुरेश माने
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 56
सन्यस्त खड्ग नाटकामागील सावरकरांच्या हेतूचा जाहीर निषेध.
मुंबई: दि. २५ आगष्ट २०२५
हिंदू-हिंदुत्व व हिंदूराष्ट्राचे ध्येय व चिंतेमधून विज्ञानवादी स्वांतत्र्यवीर सावकरांनी काही अवैज्ञानिक भूमिका घेतल्या. त्याचेच नेमके अपत्य म्हणजे सावरकर लिखीत ‘सन्यस्त खड्ङ्ग’ ही नाट्य कलाकृती असल्यामुळेच आजपर्यंत त्याकडे कुणी फारसे लक्ष दिले नाही. परंतू वर्तमान काळात हिंदुत्वाच्या नावाने इतर समाजघटकांवर सांस्कृतिक आक्रमणे अनेक मार्गाने होत असताना वर्तमानात अशा नाट्यकलाकृतीकडे दुर्लक्ष होणे शक्य नसल्यामुळे काही व्यक्ती संगटनाकडून या नाट्यप्रयोगास विरोध होत आहे. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी सुध्दा अशा बौध्द तत्वज्ञान व बुध्दविचार विरोधी नाट्यकृतीचा जाहीर निषध करते व गरज पडल्यास संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा या पत्रकाव्दारे देत आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही भूमिका वांरवांर त्यानंतर सुध्दा प्रकट झालेली आहे. सावरकरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाड, नाशिक सत्याग्रहवेळी हिंदु-सुधारणेसाठी प्रत्यक्षात जरी सहभाग घेतला नाही तरी पाठींबा जाहीर केला. परंतू डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १९५६ च्या बौध्द धम्म स्विकारणे व हिंदू-धर्माचा त्याग करने त्यांना आवडले नव्हते. ज्या बौध्द विचार क्रांतीने वैदिक संस्कृतीचे आधारस्तंभ जमीनदोस्त केले त्या बुध्दक्रांतीला विज्ञानवादी सावरकरांनी दोष दयावा हे अनाकलनिय होय. शिवाय सन्यस्त खड्ग नाट्याव्दारे बौध्द अहिंसेचे तत्वज्ञान चुकीच्या पध्दतीने मांडून, बुध्द नव्हे तर युध्द हाच मार्ग योग्य होय अशी शिकवण देणारे हे नाट्य सम्राट अशोक या महान बौध्द सम्राटाच्या भूमिकेवर प्रश्नं उभे करते. तर बौध्द तत्वज्ञान व भगवान बुध्दाच्या शांततामय व अहिंसक विचाराने देशातील क्षात्रतेज, लढावूपणा तेज पावले अशी मांडणी करण्या-यापैकी अनेक असून सावरकर देखील या मालीकेत मोडतात ही शोकांतिका होय. खरेतर नाट्य परिनिरीक्षण मंडळाने योग्यता प्रमाणपत्र देताना व्यापकरीत्या या बाबींचा व संभाव्य परिणामाचा विचार करण्याची गरज होती, परंतू देशात सर्वत्र बहुतेक सरकारी संस्थाचे भगवेकरण होत असताना नाट्य परिनिरीक्षण मंडळाकडून अशी अपेक्षा किती करायची हा देखील प्रश्नं आहे.
“सन्यस्त खड्ग” नाटकामागची सावरकरांची भूमिका म्हणजे मध्ययुगातील हिंदू-तत्ववेता कुमारीला भट्ट याच्यांच मतांचे प्रतिबिंब आहे. त्यांनी वैदिक संस्कृतिचे समर्थन करीत बौध्द व जैन तत्वज्ञानाला विरोध केला होता. परंतू कुमारिल भट्टाचे दुदैव म्हणजे त्याच्याच पुतण्याने ‘धम्मकिर्ती’ यांनीच बौध्द तत्वज्ञानाचा स्विकार केला व ते एक नामांकीत बौध्द विचारक म्हणून प्रसिध्द झाले. आज वैदिक संस्कृती विचार समर्थक कुमारिल भट्ट यांना जगात कोण ओळखते तर जगातील एक तृतीयांश जनता ही बुध्दाला आपला आदर्श मानते.
खरेतर या नाटकांच्या कलाकाराबद्दल किंवा जे-जे सहभागी आहेत त्याच्याबद्दलचा वाद हा दुय्यम दर्जाचा प्रथम वादग्रस्त मुद्दा म्हणजे अशा नाट्यकलाकृती व्दारे ज्या महाराष्ट्रात लाखो बौध्द आहेत तेथे बुध्दविचार चुकीने मांडणे, त्याचे विडंबन, विटंबना करने हे योग्य आहे का? म्हणून राज्यसरकार, पोलिस व कायदा प्रशासन यांना आम्ही जाहीर आवाहण करीत आहोत की अशा कलाकृती ज्यामुळे विविध समाजामध्ये दुही-व्देष-परस्पर विरोध निर्माण होतो त्यांना संरक्षण व परवानगी देता कामा नये. राहीला प्रश्नं या नाट्य कलाकृतीचे निर्माते श्री पणशीकर यांच्या भूमिकेचा की, “काही आक्षेप असतील तर समोर बसून चर्चा करूया आम्ही विचार करण्यास तयार आहोत” ही बाब स्वागताची आहे. परंतू नाटक थांबवून की चालू ठेवून चर्चा करायची ? खरोखरच नाट्यनिर्मात पणशीकर आपल्या भूमिकेवर ठाम असतील अशा चर्चेचे जाहीर आयोजन शिवाजी पार्क मुंबई मैदानातच व्हावे अशीही आमची भूमिका होय. पणशीकरांनी आयोजन व आवाहन करून पहावे.
0Shares