आजकाल कोणतेही इकॉनॉमिक डेली उघडून बघा. इकॉनोमिक टाइम्स, बिझनेस स्टॅंडर्ड, बिझनेस लाईन. बातम्यांचे पहिले पान येण्याच्या आधी दोन, तीन, कधीतरी चार पब्लिक इशूच्या प्रत्येकी दोन पानपान भर जाहिराती असतात.
२०२२ मध्ये ४० पब्लिक इश्यू मधून ४०,००० कोटी रुपये भांडवलाची उभारणी झाली. २०२३ मध्ये ७८ इश्यू मधून ६८,००० कोटी रुपये २०२४ मध्ये ८२ इश्युमधून १,८२,००० कोटी रुपये २०२५ मध्ये आतापर्यंत ४८ इश्युमधून ६५,००० कोटी रुपये
पब्लिक इश्यू मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये पहिल्यांदाच शेअर्समध्ये गुंतवणूक करणारे बरेच आहेत.
शेअर डिमॅट अकाऊंट मध्ये आल्यानंतर, शेअर लिस्टिंग झाल्या झाल्या विकून टाकणारे बरेच आहेत.
पब्लिक इश्यू ही खरेतर दीर्घकालीन गुंतवणूक असली पाहिजे. पण नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांचा काहीही अभ्यास नसतो. लवकरात लवकर जास्तीत जास्त नफा मिळवणे हे एकमेव ध्येय झाले आहे.
त्यात काही गैर नाही. कधीपर्यंत जोपर्यंत तुम्हाला प्रत्यक्ष नफा मिळतो तोपर्यंत. आणि तोटा झाला तर ?
किती पब्लिक इश्यू त्यांच्या इश्यू प्राईस पेक्षा जास्त किंवा कमी किमतीत आहेत हा प्रश्न नवीन गुंतवणूकदारांनी विचारला पाहिजे.
२०२४ मध्ये जे पब्लिक इश्यू आले त्यापैकी ४० टक्के कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या इशू प्राइस पेक्षा खूप कमी किमतीत उपलब्ध आहेत.
काही वेळा तोटा आला, नुकसानं झाले तरी हरकत नाही. पण त्यातून शिका. आंधळेपणे पुन्हा पुन्हा त्याच त्याच चूका करू नका.
शेवटचे. कर्जे काढून शेअर्स मध्ये कधीही गुंतवणूक करू नका. ब्रोकर लोक तर जाळे टाकून बसले आहेत.