• 162
  • 1 minute read

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी *पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे*

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी  *पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे*

परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणी पोलीस अधीक्षकांवर खुनाचा गुन्हा दाखल करा : राहुल डंबाळे

पुणे : परभणी येथील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा दिनांक 11 डिसेंबर रोजी झालेल्या पोलीस मारहाणीत मृत्यू झालेला आहे. सदर बाबतची पुष्टी आज शिवविच्छेदन अहवालात करण्यात आलेली आहे, त्यामुळे सदर प्रकरणी आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सूर्यवंशी यांना  मारहाण करणारे पोलीस निरीक्षक , कर्मचारी यांच्यासह यात सहभागी असलेले पोलीस अधीक्षक परभणी यांच्यावर देखील खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित केलेल्या निदर्शनाच्या आंदोलनाद्वारे केली. तसेच या प्रकरणी सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयास एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई व कुटुंबातील एक सदस्य शासकीय नोकरीत सामावून घेण्याची मागणी देखील करण्यात आली.
 
” आंबेडकरी आंदोलकांबाबत पोलीस प्रशासन व सरकार भेदभाव पूर्ण वागत असल्याचे हे उदाहरण असून हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणे व दलित कार्यकर्त्यांना मरेपर्यंत मारणे ही शासनाची नीती समोर आलेली आहे. ”  अशी भुमिकाही यावेळी डंबाळे यांनी मांडली. 
 
दरम्यान परभणी येथे आंबेडकरी आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्वच गुन्हे मागे घेण्यात येऊन सर्व आंदोलकांची मुक्तता करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
 
सदर आंदोलनामध्ये राहुल डंबाळे , बाप्पुसाहेब भोसले, सुवर्णा डंबाळे , अशोक जगताप , संगिताताई आठवले , रविंद्र क्षीरसागर, सत्यवान गायकवाड , विठ्ठल गायकवाड, अनिताताई धिमधिमे , स्नेहाताई माने , सुजाताताई सोनकांबळे , इलियाज शेख , प्रतिक डंबाळे , आनंद कांबळे, फिरोज मुल्ला , रिपब्लिकन युवा मोर्चा सह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दलित पॅंथर यासह विविध पक्ष संघटनातील प्रतिनिधी सहभागी झाले होते.
0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *