• 21
  • 2 minutes read

पालघर तालुक्यामधील सफाळे येथील शिलटे या गावी तलावाचे खोदकाम करताना सापडली बुद्ध मूर्ती

पालघर तालुक्यामधील सफाळे येथील शिलटे या गावी तलावाचे खोदकाम करताना सापडली बुद्ध मूर्ती

पालघर (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्यातील सफाळे रेल्वे स्टेशन पासून पश्चिमेस 4 की.मी. अंतर असलेल्या शिलटे या गावी वर्षभरापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने तलावाचे खोदकाम सुरू असताना, काही पुरातन अवशेष व मूर्ती बाहेर आल्याने जेसीबी वाल्याने काम थांबवून तेथून पळायान केले. परंतु सदरची बातमी शिलटे ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामसेवक यांनी पुरातन विभागाला कळवणे आवश्यक असताना जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केले.
भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य व बौद्ध धम्माचे प्रचारक आदरणीय श्रीपाद शेलार गुरूजी यांना सदरची माहिती मिळाली असता, स्वतः श्रीपाद शेलार गुरुजी, काळे गुरुजी, दत्ताराम गायकवाड गुरुजी व प्रदीप जाधव गुरुजी यांनी घटनास्थळी भेट देऊन खातरजमा केली. व स्वतः तळ्यात उतरून घाणीत पडलेले अवशेष पाण्याने स्वच्छ धुऊन पाहणी केली असता तथागत बुद्धांची मूर्ती व अवशेष असल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान श्रीपाद शेलार गुरूजी यांनी सामाजिक कार्यकर्ते आविश राऊत यांना शनिवार दिनांक 25 मे रोजी रात्री 8.00 वाजताच्या सुमारास भ्रमणध्वनी द्वारे कळवले असता, तसेच संपूर्ण माहिती त्यांच्या पर्सनल वॉट्स ॲप वर पाठवली असता, आविश राऊत यांनी वेळ न दडवता त्याच वेळेस सदरची माहिती उपजिल्हाधिकारी साहेब पालघर (RD) सुभाष भगाडे साहेब , पालघरचे तहसीलदार रमेश शेडगे साहेब आणि पालघर गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर साहेब यांना प्रत्यक्ष भ्रमणध्वनी द्वारे माहिती देण्यात आली आहे. तसेच या ऐतिहासिक ठिकाणी ताबडतोब संरक्षण देण्याबाबत तसेच पुरातन विभागास प्राचारण करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. तसेच याबाबतची माहिती पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके साहेब यांनाही भ्रमणध्वनी द्वारे सकाळच्या सुमारास आविश राऊत यांनी कळविले असता, त्वरित कार्यवाही बाबत आश्वासन जिल्हाधिकारी साहेब पालघर यांनी राऊत यांना दिले आहे. सदरच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी पुरातन विभागाला पाचारण करण्यात येऊन संरक्षण देण्यात यावे याबाबत कार्यवाही करण्याची विनंती संबंधित अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
तसेच शिलटे गावाचे ग्रामसेविका प्रतीक्षा पाटील यांना त्वरित प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन स्थळ पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश गटविकास अधिकारी पालघर यांनी दिले आहेत.
लक्षात असू द्या की पालघर जिल्ह्यातील आजचे नालासोपारा हा परिसर प्राचीन काळात शुर्पारक नगरी नावाने ओळखला जात होता. येथील पूर्णा नावाचा व्यापारी उत्तर प्रदेशात गेल्यानंतर भगवान गौतम बुद्धांच्या प्रवचनाने प्रभावित होऊन त्याने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. शुर्पारक नगरीत परतल्यानंतर त्याने एक चंदनाचा स्तूप बांधला होता. या स्तुपात भगवान बुद्ध ७० दिवस राहिले असल्याचा इतिहास आहे. हा स्तूप जमिनीत गाडला गेला होता. १८८२ साली उत्खननात हा स्तूप सापडला होता. हा स्तूप २ हजार ५५९ वर्ष जुना आहे. सम्राट अशोकाने धम्म प्रसार सुरू केल्यानंतर त्याने आपला मुलगा महेंद्र आणि कन्या संघमित्रा यांना भिक्कू आणि भिक्कूणी बनवून पाठवले होते. त्यांनीही या स्तुपाला भेट देऊन बौद्ध धम्माच्या प्रसारास सुरुवात केली होती. त्यांनी स्तुपात १४ शिलालेख कोरले होते. एप्रिल 1882 मध्ये, भगवानलाल इंद्रजी, एक प्रख्यात पुरातत्त्वशास्त्रज्ञ, नाणकशास्त्रज्ञ आणि एपिग्राफिस्ट यांनी सोपाराजवळील मर्देस गावातील बुरुड राजाचे कोट टीला उत्खनन केले. बौद्ध स्तूपाचे अवशेष सापडले होते. स्तूपाच्या मध्यभागी (विटांनी बांधलेल्या खोलीच्या आत) एक मोठा दगडी खजिना उत्खनन करण्यात आला ज्यामध्ये मैत्रेय बुद्धाच्या आठ कांस्य प्रतिमा होत्या. हा पालघर जिल्ह्याचा इतिहास आहे. आणि आता पुन्हा पालघर जिल्ह्यामध्ये सफाळे विभागांमध्ये शिलटे गावांमध्ये बुद्धांचे अवशेष सापडणे. हा योगायोग नसून पालघर जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण भारत बुद्धमय होता हा ऐतिहासिक पुरावा आहे. मनुवादी व्यवस्थेने बुद्ध आणि त्यांच्या विचारांना कितीही लपवण्याचा व संपवण्याचा प्रयत्न केला. कितीही गाडण्याचा प्रयत्न केला तरी जिथे खोदाल तिथे फक्त बुद्धच दिसेल हा इतिहास अधोरेखित झाला आहे.
पूर्णा नावाच्या ज्या व्यापाऱ्याने बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी शुर्पारक नगरीत परतल्यानंतर एक चंदनाचा स्तूप बांधला होता. हा स्तूप २ हजार ५५९ वर्ष जुना असल्याचे सिद्ध झाले आहे. त्याच काळात सफाळे येथील शिलटे गावात सुद्धा स्तूप बांधण्यात आला असावा असा तर्क येथील ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लोक करत आहेत. दरम्यान पुरातन विभागाच्या संशोधनानंतर सापडलेल्या बौद्ध मूर्ती व अवशेषांची पुरातन माहिती समोर येतील असा सार्थ विश्वास बौद्ध समाजाने व्यक्त केला आहे.

0Shares

Related post

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन

रिपब्लिकन एकता आघाडीची’ समन्वय समिती स्थापन महाविकास आघाडीला पाठिंबा कायम मुंबई:  विधानसभा निवडणुकीत भाजपची  भिस्त मित्र…
बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने…
एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

एक पक्षीय सत्ता आणून लुटीचा कॉर्पोरेट फॉर्म्युला म्हणजे आजचे सत्ताकारण

प्रस्थापित राजकीय पक्ष कॉर्पोरेट सेक्टरच्या कब्जात      मनी, मसल अन मिडिया  या 3 एम चा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *