रत्नागिरी जाताना त्या दिवशी मी नेत्रावती एक्सप्रेस ने प्रवास करत होतो सोबत त्रिशूळ आणि त्रिवेंद्रमचे प्रवासी होते आणि सहजच साबरीमला चा विषय निघाला आणि रेल्वे कंपार्टमेंटमध्ये त्या केरळी लोक दोन भाग पडले एका भागातील लोक म्हणत होते की सर्वोच्च न्यायालयाने जे केले ते बरोबर बर केले सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना कायद्याने चालावं लागेल परंतु दुसऱ्या गटातील लोक मनाला लागली की ही एक फार पुरातन प्रथा आहे आणि म्हणून ती जपली पाहिजे त्यासाठी त्यांनी सांगितले की मंदिर जंगलात 40 किलोमीटर आहे आणि 10 ते 50 वयोगटातील महिला यांनी प्रवास केल्यास आणि त्या गर्भवती असल्यास त्यांना त्रास होऊ नये हा या प्रथेमागे कारण आहे भारतीय समाजात प्रथा आणि कायदा यांच्यातील संघर्ष सातत्याने होत असतोप्रथेच्या नावाखाली पुरातन व्यवस्था टिकवून ठेवण्याचा एक वर्ग आहे तर भारतीय संविधानानुसार सर्वांना संधी व समान अधिकार मिळावे असा लढणारा दुसरा वर्ग आहे मी त्यांना म्हटले की काय आज शबरीमला मंदिरात जातानाचा रस्ता शंभर वर्षापूर्वी होता तसाच आहे का त्यावर तो म्हणाला आता रस्ता बरा आहे मग मी त्यास म्हटले के मग काळानुसार आपण बदलायला हवे ना शंभर वर्षापूर्वी जे योग्य होते ते आज शंभर वर्षानंतर अयोग्य आहे एवढेच आम्हाला समजून घ्यायचे आहे. म्हटले एकेकाळी सतीची प्रथा योग्य आहे असे म्हणणारे कित्येक महाभाग होते पण आज कुणी सतीच्या प्रथेचे समर्थन करेल का प्रथेबाबत होणारा समूह निशब्द झाला. जय भारत जय संविधान – प्रदीप ढोबळे