• 25
  • 1 minute read

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान !

मी बँकेकडून बाजारभावाने कर्जे घेऊन शेअर मार्केट / रिअल इस्टेट / क्रिप्टो करन्सी च्या सट्टेबाजीत घालीन ;
तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी तर कर्जावरचे व्याज भरणार आहे !

शेती , एमएसएमई , सेल्फ हेल्प ग्रुप , लघुउद्योगांना कर्जे उपलब्ध होत नसतील तर माझा काय दोष ?
______

मी कालव्यातून पाणी घेऊन त्याची शीतपेये बनवीन नाहीतर बिअर ; किंवा पंचतारांकित किंवा माझ्या घरात स्विमिंग पूल
तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी बाजारभावाने पाण्याचा भाव मोजायला तयार आहे

माणसांना , गुरांना , शेतीला पाणी कमी मिळाले तर माझा काय दोष ?
_______

मी शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घेऊन, त्या काही वर्षे पाडून ठेवीन मग उद्योगांना / रियल इस्टेट कंपन्यांना चढ्या भावाने विकेन

तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी बाजारभावाने जमिनीचा भाव मोजायला तयार आहे (शेतकरी कर्जबाजारीपणामुळे डिस्ट्रेस सेल करत मिळेल त्या किमतीत देखील विक्री करतात – हे खरेतर ते सांगत नाहीत)

मी जमिनी दाबून ठेवल्यामुळे जमिनीचे भाव वाढणार असतील तर माझा काय दोष ?
______

मी हॉटेल मध्ये पदार्थ ऑर्डर केले आहेत ; मी खाईन नाहीतर तसेच टाकून देईन

तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ? मी तिथल्या लावलेल्या किमतीप्रमाणे बिल भरायला तयार आहे

लाखो लोकांना साधे पोटभर खायला मिळत नाही तर माझा काय दोष ?
_____

हे करणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा व्यक्तिगत काहीच दोष नाही ; त्या जे काही करत आहेत ते एकतर प्रचलित कायद्याप्रमाणे करीत आहेत किंवा प्रचलित कायदे त्यांना आडकाठी करत नाहीत

प्रश्न विचारला पाहिजे : कायदे कोण बनवतो ? आणि ते तसेच का बनवतो ? कायदे बनवण्याची दुसरी पद्धत असूच शकत नाही का ? किंवा अगदी उघड उघड खटकणाऱ्या गोष्टींना प्रतिबंध करणारे कायदे कधीच का बनवले जात नाहीत ?
________

“प्रचलित” मार्केट तत्त्वज्ञान वस्तुमाल / मत्ता विकणार ज्यांच्याकडे क्रयशक्ती आहे , मग त्यांनी त्याचा उपभोग घ्यावा , नाश करावा , किंवा पाडून ठेवावे किंवा दामदुपटीने अजून कोणाला विकावे.

“प्रचलित” मार्केट तत्वज्ञान अर्थकारणाचे सामाजिक , नैतिक , पर्यावरणीय , राजकीय पैलू असतात या जमिनी सत्याला माहित असून नाकारते ; स्वकेंद्री धनदांडग्यांची धन करणारे आर्थिक तत्वज्ञान आहे ते !

म्हणून अर्थव्यवस्थेबद्दल नाही सर्वसमावेशक “राजकीय अर्थव्यवस्थे”बद्दल बोलले पाहिजे.

सर्वात मूलभूत प्रश्न आहे…….तुम्ही / आपण जोरात बोलणार आहोत का ; “हो आम्हाला प्रॉब्लेम आहे “ !

वरील वाक्यात महत्वाचा शब्द आहे “प्रचलित”… मार्केट तर पुरातन काळापासून अस्तित्वात होती. एकविसाव्या शतकासाठी, तरुण आणि न जन्मलेल्या पिढ्यांच्यासाठी जनकेंद्री आणि पर्यावरणकेंद्री पर्यायी मार्केट तत्त्वज्ञान हवे आहे. तरुणांनो यावर काम करा.

संजीव चांदोरकर (२५ नोव्हेंबर २०२५)

0Shares

Related post

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप !

२०२६: साशंक स्वागत! नवीन वर्षात प्रवेश करतांना जगावर एक दृष्टिक्षेप ! ऐंशीच्या दशकापासून, “आपण अशी जगाची…
“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा लागतोय?

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

“गिग वर्कर्स”, “ दहा मिनिटात डिलिव्हरी” या आयडियाज त्यांना सुचतातच कशा? गिग वर्कर्सना संप का करावा…

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने :

पुन्हा एकदा आलेल्या निवडणूक मोसमाच्या निमित्ताने : कोणती बांधिलकी अधिक टिकाऊ/ चिवट ? “विचारातून” आलेली की…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *