- 63
- 1 minute read
फक्त त्यांच्यातील माणूस जिवंत हवा.
फक्त त्यांच्यातील माणूस जिवंत हवा.
(प्रविण यादव) बदलापूर बाल लैंगिक अत्याचाराची घटना आणि इतर असंख्य घटना पाहून बहुसंख्य पोलिसांच्या संवेदना हरवल्या आहेत का ? पोलिस महिला आणि बाल अत्याचारा विरोधात दुर्लक्ष का करतात ? असे प्रश्न उपस्थित होतात.
मुंबईतील एका विभागात गार्डनमध्ये एक विकृत जेष्ठ नागरिक विकृत चाळे करीत ११ वर्षीय लहान मुलीला आपल्याकडे बोलवत होता.ती आणि तीचा चुलत भाऊ यामुळे घाबरुन घरी पळून आले.तीने आईला सर्व घटना सांगितली .आईने लगेच गार्डनमध्ये धाव घेतली योगा -योगाने मी रस्त्यात भेटलो ,आम्ही त्या व्यक्तीचा शोध घेतला परंतु सापडला नाही .गार्डनच्या अनधिकृत वाँचमनला विचारपूस केली परंतु तो माहिती देऊ शकला नाही.
आम्ही पोलिस ठाण्यात धाव घेतली तेथे एक सेवानिवृत्तीकडे वाटचाल करणारा API अधिकारी होता.त्याला सर्व घटना सांगितली त्याने शांतपणे ऐकून घेतले आणि शांतपणे आम्हाला सांगितले पुन्हा भेटला घेऊन या. ‘. आमच्या तळपायाची आग मस्तकात गेली होती त्यात असा अधिकारी भेटला तरी आम्ही संयम ठेवला एका वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटून सर्व माहिती दिली.निष्क्रिय ,असंवेदनशिल अधिकाऱ्यांच्या वर्तना बद्दल तक्रार केली.त्यांनी लगेचच दोन काँन्स्टेबलना बोलवून शोध घ्यायला आमच्या सोबत पाठवले.त्या दिवशी विकृत सापडला नाही परंतु दोन दिवसांनी तो वेडा सापडला ,वरिष्ठ अधिकाऱ्यांने सत्यशोधक पट्ट्याने त्याचा समाचार घेतला.एक अधिकारी वर्दी चढवून खुर्ची उबवत होता तर दुसरा वर्दीला जागून कार्यरत होता. सध्या पोलिस दलात अशा असंवेदनशिल निष्क्रिय लोकांचा भरणा जास्त दिसतो. महिलांच्या केसबाबत तरी संवेदनशिलता दाखवायला हवी.
पोलिस गुन्हा नोंदवायला नेहमीच टाळाटाळ करताना दिसतात.कारण .. FIR नोंदवा ,पंचनामा करा ,चौकशी करा, आरोपीला अटक करा , त्याचे मेडिकल करा , कोर्टात हजर करा ,त्याचा रिमांड घ्या , पुरावे गोळा करा ,कोर्टात चार्जशिट दाखल करा अशी खूप दिर्घकालीन काम करावे लागते.म्हणूनच गुन्हा नोंदवून घेणे टाळले जाते.अदखलपात्र गुन्हा नोंदवून ,चोरीचा गुन्ह्यात गहाळ झाले लिहून काम टाळले जाते.कर्तव्यात कसूर केली जाते.
नुकतीच एक घटना पाहण्यात आली .बारावीला 96% गुण मिळविलेल्या १८ वर्षीय इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांवर गुन्हा नोदविण्यात आला . वडिलांना मारहान करणाऱ्या व्यक्ती विरोधात तक्रार करायला तो वडिलांसोबत पोलिस ठाण्यात गेला .चार तास बसून होता . ते तक्रार करण्यासाठी तिष्ठत होते तेव्हा मारणारा छान फीरत होता.पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आणि समोरच्या आरोपीला सन्मानाने सोडले ? तरुण मुलगा पोलिसांची ही असंवेदनशिलता पहात होता.आपल्या वडिलांना मारणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी साधा दम ही न देता सोडून दिले ,हे पाहून चिडला.घरी येताच समोरच्या व्यक्तीला जाब विचारला ,मारामारी झाली. दोघांनाही लागले परंतु समोरच्या व्यक्तीला जखम झाली आणि एक गुणवंत विद्यार्थी पोलिस दप्तरी आरोपी झाला.
नेहमी स्त्रियांसमोर तक्रार दारु पिऊन शिविगाळ करणाऱ्या ,इमारत परिसरात झोपी जाणाऱ्या एका वेड्या दारुड्याला पकडून पोलिसांच्या स्वाधिन करायला गेलो. तेव्हा तो बेवडा पोलिस ठाण्याच्या गेटवरच कोसळला हे पाहून एक सब इन्सपेक्टर म्हणतो कसा ? अरे कुणी आणले याला काम वाढवायला ? मी सांगितले मी आणले .तेव्हा तो म्हणाला ‘ हा मेला वगैरे तर ,आमच्यावर यायचे ‘. मी त्यांना म्हणालो ‘मी असेन तुमच्या बाजूने.’चार पाच वेळा त्या वेड्या बेवड्याला घेऊन गेलो पोलिस ठाण्यात .पोलिस अदखलपात्र तक्रार त्यांच्या सोईची लिहायचे आणि काही वेळाने त्याला सोडून द्यायचे .एक API अधिकारी संवेदनशील होता परंतु ड्यूटी आँफीसर PSI ने त्याला ही जुमानले नाही.या केस संदर्भात वरिष्ठांना सांगितले .परंतु कारवाई नाहीच. आता तो बेवडा आला तर त्याला रिक्शात घालून दूर सोडून येतो पोलिस ठाण्यात जाऊन आपला वेळ वाया घाललत नाही. पूर्वी पोलिस दलात वरिष्ठांचा धाक असायचा आता तो राहीला नाही.
अनेकदा मुलगी गायब झाली – हरवली आणि पालक तक्रार करायला गेल्यावर ..पोलिसांच्या मनात येणारा पहिला प्रश्न असतो कुणाबरोबर पळून तर गेली नाही ना ? अरे तीचे अपहरण झालेले असू शकते ,खून झालेला असू शकतो.परंतु पोलिस गांभिर्याने घेताना दिसत नाहीत. मिसिंग केस चोवीस तासानंतरच घेतली जाते.तोपर्यंत विपरित घडू शकते. पोलिस निष्क्रिय असतील तर अदखलपात्र गुन्याचे दखलपात्र गुन्ह्यात रुपांतर होऊ शकते आणि सजग असतील तर होणारे गुन्हे टळू शकतात.
, नुकतीच बातमी बाहेर आली माहिम पोलिस वसाहतीत पोलिसांची दहा बारा घरे फोडली गेली आहेत. पोलिस वसाहतीत ही अवस्था असेल तर बाहेर काय अवस्था असेल ? ठाणे शिळफाटा पुजाऱ्यांनी केलेला विवाहितेचा बलात्कार -मर्डर ,उरणमध्ये दाऊद नामक युवकाने मुलीचा खून .पोलिस दक्ष असतील तर अशा घटना टाळता येऊ शकतात गुन्हेगारी थांबू शकते.फक्त पोलिसांतील माणूस जिवंत असायला हवा आणि राजकारण्यांनी पक्षपाती न राहता कायद्याचे राज्य राखले पाहिजे.