विश्वास उटगी यांचा हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश
मुंबई, दि. २७ मे २०२५
बँकींग क्षेत्रातील विविध प्रश्नावर मागील ४० वर्ष सातत्याने सरकारला जाब विचारणारे विश्वास उटगी यांनी आज गांधी भवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी विश्वास उटगी यांचे काँग्रेस परिवारात स्वागत करून शुभेच्छा दिल्या.
य़ावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ,विश्वास उटगी, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
“केंद्र व राज्यात भाजपा सरकारचा मनमानी कारभार सुरु असून बँकांच्या कामातही हस्तक्षेप वाढला आहे. काही भांडवलदार बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेले आहेत, भाजपा सरकार त्यांच्यावर काही कारवाई करत नाही. आर्थिक पातळीवरही भाजपा सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारच्या बँकींग व आर्थिक क्षेत्रातील मुद्द्यांवर आवाज उठवून सरकारला जागे करण्याचे काम विश्वास उटगी करतील”, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला आहे.
य़ावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी व प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.