नंदुरबार 19/जुलै /2025 शनिवार बहुजन समाज पार्टी नंदुरबार जिल्हा तर्फे जिल्हास्तरीय संघटन समीक्षा बैठक व नवीन पद अधिकारी नेमण्यात आले. शासकीय विश्रामगृहात नंदुरबार येथे उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पाडला या बैठकीला *प्रमुख मार्गदर्शन नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब ब्राम्हणे आणि जिल्हा प्रभारी मा.जितेंद्र भाऊ तायडे उपस्थित होत*.
मा बाळासाहेब ब्राम्हणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले
*बसपा सुप्रीमो बहन कु मायावती जी यांनी भारतातील सर्वात मोठ्या राज्य उत्तरप्रदेशमध्ये राजकीय सत्ता स्थापन करून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच संपन्न साकार करण्याचे काम आदरणीय बहन कु मायावती जी यांनी केले आहे. बहुजन समाज पार्टी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महापुरुषांच्या विचार धारेवर चालणारी पार्टी आहे. असे म्हणाले.* नंतर
कार्यक्रमात गणेश भाऊ पवार करचकुपे यांना बसपा युवा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले. व रेशमताई सोनवणे यांना होलार सामाज भाईचारा जिल्हाध्यक्षा पदी नियुक्त करण्यात आले तसेच मा अर्जुन पवार साहेब यांना बसपा जिल्हा कमेंटी सदस्य पदी नियुक्त करण्यात आली.व नवीन पद अधिकारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले. महासचिव विश्वास भाऊ पवार यांनी ही त्यांच्या भाषणांतून अनमोल विचार मांडले तसेच अर्जुन पवार साहेब यांनी *फुले.शाहु.आंबेडकर कांशीराम चळवळीतील अनमोल विचार मांडले* तसेच कार्यक्रमात प्रमुख उपस्थितीत महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रमिलाताई जाधव. जिल्हा सचिव राजेंद्र महाले विधानसभा महासचिव दीपक महीरे विधानसभा कोषाध्यक्ष अविनाश वाघ. शहर उपाध्यक्ष जितेंद्र संदानशिव शहर सहसचिव संजय जावरे.कृष्णा सामुद्रे सनि मनोज पवार .छोटू सोनवणे. शुभम सामुद्रे. गौरव पवार अजय भिल .नरेश पानपाटिल. जितेंद्र शिंपी.आंनदा पानपाटिल. निंबा पानपाटिल रत्नदीप सामुद्रे मोठ्या संख्यांने पद अधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.