• 162
  • 1 minute read

बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम: अतुल लोंढे

बेकायदेशीर काम रोखणाऱ्या महिला IPS अधिकाऱ्याला धमकी देणा-या उपमुख्यमंत्री अजित पवारांची टगेगिरी कायम: अतुल लोंढे

मुंबई, दि. ५ सप्टेंबर २०२५
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंजली कृष्णा या महिला आयपीएस अधिकाऱ्याला फोनवरून दिलेली धमकी अत्यंत निषेधार्ह आहे. प्रामाणिकपणे काम करणा-या अधिकाऱ्यांना फोनवरून धमकी देऊन अवैध धंद्याविरोधातील कारवाई थांबवा म्हणून दमदाटी करणे हे चुकीचे असून अजित पवारांची ही टगेगिरी महाराष्ट्राला तसेच अजित पवारांसारख्या ज्येष्ठ मंत्र्याला शोभणारी नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अतुल लोंढे पुढे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात बेकायदेशीर मुरुम उपसा केला जात असता त्याच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी गेले असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला. यावेळी अजित पवार यांनी महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांना दमदाटी करत तुझी एवढी हिम्मत, तुझ्यावरच कारवाई करतो, अशी धमकी देऊन सुरु असलेली कारवाई थांबवा असे बजावले. बेकायदेशीर कामावर कारवाई होत असताना राज्याचे उपमुख्यमंत्रीच जर त्याला संरक्षण देत असतील आणि कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावत असतील तर राज्यात कायद्याचे राज्य नाही हे सिद्ध होते.

अतुल लोंढे पुढे म्हणाले की, अजित पवार हे फार शिस्तप्रिय असल्याचा आव आणतात. अनेक वर्षांपासून ते मंत्री तसेच उपमुख्यमंत्री पदावर आहेत, त्यांच्यासारख्या ज्येष्ठ व अनुभवी मंत्र्यांने एका महिला पोलीस अधिकाऱ्याला धमक्या देऊन बेकायदेशीर कामाला संरक्षण देत आहेत हे अत्यंत गंभीर आहे. बेकायदेशीर कामांना असा राजाश्रय देणे अयोग्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर खुलासा केला पाहिजे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

0Shares

Related post

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …
‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

‘मिठाच्या सत्याग्रहापूर्वी पाण्याचा संघर्ष: महाड सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षाचे महत्त्व’

महाडचा चवदार तळे सत्याग्रह भारतीय संविधानाचा पाया !      भारतीय सर्वोच्च न्यायालयातील जेष्ठ विधिज्ञ संजय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *