बेघर झालेल्या कुटुंबाचा हक्काच्या घरासाठी आज़ाद मैदानावर आमरण उपोषण

बेघर झालेल्या कुटुंबाचा हक्काच्या घरासाठी आज़ाद मैदानावर आमरण उपोषण

चूनाभट्टी, मुंबई येथे जुलै २०२२ रोजी दरड़ कोसळून साधना विरकर नामक एका गरीब व असहाय महिलेचे घर बेचिराख झाले. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधि यांनी त्यांना घर देण्याचे आश्वासन दिल परंतु आजतागायत पूर्ण केले नाही, महानगर पालिका एल वार्ड विभागाने त्या कुटुंबाला महानगर पालिकेच्या एका पडीक शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरुपात स्थलांतर केले, वर्षभर त्या पडीक शाळेमध्ये राहिल्यानंतर त्या कुटुंबाला दुसऱ्या महानगर पालिकेच्या नेहरू नगर शाळेमध्ये स्थलांतरित केले. या शाळेमध्ये सुद्धा ७ महीने घालविल्यानंतर आता निवडणुकीचे कारण सांगून त्या कुटुंबाला दुसरीकडे स्थलांतरित न करता अक्षरशहा रस्त्यावरच आणले. मागील दोन वर्षापासून त्या कुटुंबाचे केवळ स्थलांतर करण्यात आले परंतु त्यांचे पुनर्वसन करण्यात आले नाही, आणि आज त्यांना बाहेर काढून रस्त्यावरच आणले.

जूलै २०२३ रोजी, रायगढ़ जिल्ह्यात इर्शाळवाड़ी या ठिकाणी दरड़ कोसळून बेचिराख झालेल्या घरांचे मुख्यमंत्री यांनी स्वताहा भेट देऊन बेघर रहिवाशांचे तात्काळ पुनर्वसन केले आणि अशा परिस्थितीतील दरड़ कोसळून बेघर झालेल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे परिपत्रक सुद्धा काढले परंतु शासन या प्रकरणात त्याची अंमलबजावणी करताना दिसत नाही. इर्शाळवाड़ी मध्ये दरड़ कोसळलेल्या रहिवाशांना वेगळा कायदा आणि मुंबईत वेगळा कायदा कसा.??

शासनाच्या चुकीच्या व दुर्लक्षिपणाच्या धोरणामुळे चूनाभट्टीतील एक गरीब कुटुंब मागील दोन वर्षापासून आपल्या घराच्या प्रतीक्षित आहे आणि आज ते कुटुंब अक्षरशहा रस्त्यावर आले आहे.

राईट टू शेल्टर ने यासंदर्भात सर्व संबंधित प्राधिकरणा सोबत पत्रव्यवहार केला, परंतु त्यांचा कुठलाच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर स्थानिक पोलिस ठाणे, स्थानिक आमदार व वार्ड ऑफिसर, एल वार्ड यांच्याशी सुद्धा चर्चा केलि परंतु कुठलाच सकारात्मक निर्णय न झाल्यामुळे, आज दिनांक १४ मार्च २०२४ रोजी सदर कुटुंब आपल्या हक्काच्या घरासाठी आज़ाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहे.

राईट टू शेल्टर ही संघटना उपोषणकर्त्या साधना विरकर व त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे राईट टू शेल्टर चे अध्यक्ष अँड. संतोष सांजकर यांनी सांगितले.

0Shares

Related post

दोन ठाकरे व दोन पवारांनी एकत्र यावे ही वांझोटी चर्चा ….!

दोन ठाकरे व दोन पवारांनी एकत्र यावे ही वांझोटी चर्चा ….!

महाराष्ट्राचे हित, अस्मितेसाठी एकत्रीकरणाची काहीच उपयुक्तता नाही…!         दोन ठाकरे व दोन पवार…
बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ त्वरित मागे घ्या ! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अंधेरी पूर्वेत तीव्र निदर्शने

बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ त्वरित मागे घ्या ! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अंधेरी पूर्वेत तीव्र निदर्शने

प्रवाश्यांच्या खिश्याला भुर्दंड ठरणारी बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ त्वरित मागे घ्या !! मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची अंधेरी…
सार्वभौमत्वाशी तडजोड म्हणजे देशाला गुलामीत लोटण्याचा प्रयत्न

सार्वभौमत्वाशी तडजोड म्हणजे देशाला गुलामीत लोटण्याचा प्रयत्न

धर्म सत्तेचे वर्चस्व उखडून फेकणाऱ्या संविधाननिक लोकशाही व्यवस्थेपेक्षा धर्मसत्तेचे वर्चस्व असणारी राज्य व्यवस्था संघाला प्रिय !…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *