• 81
  • 1 minute read

भारतातील विद्यापीठे विनाशाच्या मार्गावर …?

भारतातील विद्यापीठे विनाशाच्या मार्गावर …?

            कार्डिनल न्यूमन या विचारवंताने १९ व्या शतकात “The Idea of a University” या निबंधात विद्यापीठ केवळ व्यावसायिक कौशल्य देणारे ठिकाण नसून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवते.येथे विद्यार्थी तर्कशुद्ध विचार करायला शिकतो असं सांगून उदार शिक्षण (Liberal Education) या
संकल्पनेवर भर दिला.

भारतातील विद्यापीठाचे बहुतेक कुलगुरू अगदी
जेएनयू सकट भगवीकरण झालेले आहेत.तसेच न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणजे नो एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत आपण प्राचीन वेदकाळामध्ये पोहोचलेले आहोत .डार्विनची हाकालपट्टी केली गेलेली आहे . इतिहास विकृत स्वरूपात शिकवले जाऊ लागले आहेत. विज्ञानापासून आपण फारकत घेतली आहे .

सरसकट संपूर्ण देशात एकच भाषा, एकच धर्म , एकच संस्कृती ,एकच भगवा रंग आणायचा आहे . या पार्श्वभूमीवर पाली भाषा मुंबई विद्यापीठात बंद करण्यात येत आहे .ती भाषा बंद केली जाऊ नये म्हणून गेले २५ दिवस आदरणीय भन्ते विमांसा शांतपूर्ण रित्या उपोषण करत होते .

काल युनिव्हर्सिटीमध्ये अल्पसंख्यांक मंत्री “किरन रिजिजू” (जे स्वतः बौद्ध धर्माचे आहेत ) आले असताना त्यांना आपले निवेदन देण्यासाठी भन्ते जात होते. त्यांना रिजिजू यांना भेटण्यापासून रोखण्यासाठी सुरक्षा कर्मी कडून मारहाण करण्यात आली .

मुळात पाली भाषेचे उच्चाटन विद्यापीठातून करण्याचा प्रयत्न करणे हे चुकीचे आहे.पाली ही प्राकृत भाषांपैकी एक मानली जाते. संस्कृतपेक्षा सोपी आणि बोलभाषेला जवळची असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना समजणारी भाषा होती.
बुद्धांचे उपदेश, विनयपिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक हे त्रिपिटक ग्रंथ पाली भाषेत लिहिले गेले.

त्यामुळे पाली ही बौद्ध धर्माची भाषा म्हणून प्रसिद्ध आहे .या भाषेला विरोध करणे , बौद्ध धर्माच्या भन्तेना मारपीट करणे हा फक्त बौद्ध धर्माचा अपमान नव्हे तर लोकशाहीचा / संविधानाचा अपमान आहे. यासंदर्भात सर्व धर्मियांनी व निधर्मी लोकांनी एकत्र येऊन निषेध नोंदवण्याची आवश्यकता आहे !

शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य संघटना, प्राध्यापक संघटना, शिक्षक संघटना यांनी फक्त पगार वाढीसाठी लढण्यापेक्षा लोकशाही /समता/ मेत्ता ही मूल्य जपण्यासाठी पुढे यावे!

– Leena Pandhare
निवृत्त प्राध्यापक आणि प्राचार्य

0Shares

Related post

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार!

मुंबई महानगरपालिका निवडणूक : प्रकाश आंबेडकरांचे सत्ताधाऱ्यांवर प्रहार! मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून,…

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड!

पुण्याच्या राजकारणातील धुरंधर नेतृत्व काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची…
बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता

बाबासाहेबांची पत्रकारिता मराठी वृत्तपत्रसृष्टी केवळ एकाच वर्गाची आहे, इतरांना यात प्रवेश नाही अशी एकप्रकारची भावना त्यावेळी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *