• 155
  • 1 minute read

भारत नगर येथे पंचशील बुद्ध विहाराचा लोकार्पण आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

भारत नगर येथे पंचशील बुद्ध विहाराचा लोकार्पण आणि बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा संपन्न

जगाचे अंतिम सत्य म्हणजे बुद्ध होय. सत्य शोधण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक धर्माची स्थापना केली. परंतु सत्याचा न्याय निवडा होई पर्यंत असत्य जगभर फिरून येत असल्याने सामान्य माणसाची तेव्हढी क्षमता नसते. असत्यालाच सत्य समजल्याने समाजात मोठे गैरसमज आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी उपासक उपासिका यानी बुद्ध विहारात आले पाहिजे .असे भारतीय बौद्ध महासभाचे बोध्दाचारी दासा गायकवाड म्हणाले . राष्ट्रवादी युवती मुंबई उपाध्यक्ष मां.सनाम मल्लिक यानी निळी रिबीन कापून पंचशील बुद्ध विहार याचे लोकार्पण केले तर
बोध्दाचारी दासा गायकवाड ,बौद्ध साहित्यिक आनंद म्हस्के,लॉर्ड बुद्धा चॅनलचे किशोर दाणीl आयोजक उपसिका उषा पांडुरंग कापडणे आदी मान्यवर याच्या हस्ते पंचशील बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.

बौद्ध साहित्यिक आणि लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रतिनिधी बौद्ध धम्म हा माणसाच्या विकासाचा केंद्र बिंदू आहे. तो विकास होण्यासाठीच डॉ.बाबासाहेब यानी दर रविवारी चला बुद्ध विहारी हा संदेश दिला आहे. विहार निर्मिती मुळे विभागातील बौद्ध धर्मियांची धम्म प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी वाढली आहे. बुध्द विहार ही फक्त बालवाडी , अंगणवाडी आणि धम्मविधीसाठी नाहीत. विहारात धम्मवर्ग ,
धम्मशिबिर , श्रामनेर दीक्षा , धम्म संगितीचे आयोजन करण्यात आली पाहिजेत.वीहार ही कोणाची मक्तेदारी होऊ नयेत.तर विहार ही ज्ञानाची , आरोग्याची , आर्थिकची केंद्र बनली पाहिजे. विहार विकासाची केंद्र होण्यासाठी बौद्ध धर्मियांनी निदान दर रविवारी बुद्ध विहारात आलेच पाहिजे
लॉर्ड बुद्धा चॅनलचे किशोर दाणी आपल्या भाषणात म्हणाले की, आदर्श परिवार आणि आदर्श समाज घडविण्यासाठी बौद्ध धम्मा शिवाय पर्याय नाही.या विभागात आदर्श विहार निर्माण केल्या बदल आयोजक धम्म.दानविर सर्वाचे कौतुक केले पाहिजे.कारण अश्या वस्तू या सर्वाचा त्यागा शिवाय उभा राहू शकत नाहीत. प्रुखम पाहुण्या मां.सनाम मल्लिक आपल्या भाषणात म्हणाल्या धर्मनिरपेक्ष लोकशाहीत प्रत्येकास आपल्या धर्माचा आणि धर्मस्थळाचा प्रचार प्रसार आणि आपल्या समाजावर संस्कार करण्याचा भारतीय संविधानने पूर्ण अधिकार दिला आहे.विभागात बौध्द विहार नसल्याची नंदा उर्फ उषा पांडुरंग कापडणे आणि रहिवाशी याची तक्रार होती. स्थानिक आमदार नवाब मल्लिक यानी पुढाकार घेवून विभागात भव्य बुद्ध विहारची निर्मिती केली आहे..

त्याची व्यवस्था आणि कार्य करण्याची आपण आपल्या सर्वाची जबाबदारी आहे. मोठ्या संघर्ष करून पंचशील बुद्ध विहार निर्मिती करणाऱ्या विभागाच्या समाज सेविका उपाशिक नंदा उर्फ उषा पांडुरंग कापडणे यानी स्थानिक आमदार नवाब मल्लिक साहेब आणि धम्मदान देणाऱ्या सर्वाचे आभार व्यक्त करून म्हंटले की स्थानिक लोकांच्या त्याग आणि सहकार्यामुळे हे भव्य विहार उभा राहू शकले. नवाब मल्लिक साहेब याची तब्बेत बरी नसल्यामुळे येऊ शकले नसले तरी त्याच्या कन्या राष्ट्रवादी युवती मुंबई उपाध्यक्ष मां.सनाम मल्लिक यानी कार्यक्रमास उपस्थित राहून आमचा आनंद दुगुनित केला आहे.कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.या प्रसंगी विष्णू गायकवाड,विशाल झेंडे,मधुकर शिरसाठ याची मार्गदर्शनपर भाषण झाली.भीमा बनसोडे, यानी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केले.
विहारात बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यपूर्वी विभागातून बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमानंतर विभागातील
सर्व उपासक उपासिका याना भोजनदान देण्यात आले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश वानखेडे, गौतम ससाणे ,बळी घरवाडे,गीता खंडागळे, शकुंतला शिंदे,अनिता समिंदरे ,राहुल सरवदे , आदींनी परिश्रम घेतले.

  • आनंद म्हस्के
0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *