- 57
- 1 minute read
भ्रष्टाचार थांबवण्यासाठी पोलिस आणि कोर्ट सक्षम नाही.
3waysmediadmin
February 2, 2024
Post Views: 81
आता प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार माजलेला आहे.सहसा सत्तेवरील आमदार खासदार मंत्री भ्रष्टाचार करतात.आणि सत्तेवर नसलेले विरोध करतात.पण विरोधी पक्षातील आजी माजी आमदार खासदार मंत्री हेच भ्रष्टाचारी असल्याने त्यांच्यात विरोधाचे नैतिक, बौद्धिक बळ उरलेले नाही.त्यामुळे सत्तेवरील आमदार खासदार मंत्री यांनी भ्रष्टाचाराची हद्द पार केली आहे.
कांग्रेस सत्तेवर होती तेंव्हा असाच भ्रष्टाचार बोकाळला होता.म्हणून आण्णा हजारे यांनी लोकपाल आणि लोकायुक्त ची मागणी केली होती.त्यात भ्रष्टाचाराने होरफळलेले लोक मोठ्या संख्येने सहभागी झाले.पण त्यात चोरीसाठी उतावीळ आणि लपून बसलेले लोक सामील झाले.या आंदोलन मुळे कांग्रेसचा सफाया झाला.आनंद झाला.पण त्यांचे जागी भाजप सत्तेवर येऊन हाहाकार माजवला आहे.आता पुन्हा या चोरांच्या विरोधात लढण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक वेळी लढण्याची पद्धत वेगळी असते.आता आण्णा हजारे यांची पद्धत उपयोगी ठरणार नसेल तर नवीन पद्धत शोधुन वापरली पाहिजे.जी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी वापरली होती.
आमदार खासदार मंत्री आणि अधिकारी विरोधात पोलीस तक्रार घेत नाहीत.न्यायाधिश तर आरोपपत्र वाचतही नाहीत.राष्ट्रपती या कामी मदत करू शकत नाही.मग काय करणार?चीन पाकिस्तान अमेरिका रशिया तर या कामी मदत करणारच नाही.मग काय करावे?कोणाकडे जावे? कोणत्याही धर्मातील देव, ईश्वर या कामी मदत करणार नाहीत.
मला वाटते, आपल्या संविधानात विधानसभा आणि लोकसभा सर्वोच्च मानली गेली आहे.तेथील सदस्य त्यांना सोयीचे,फायद्याचे निर्णय घेतात.थोढी आशा होती विरोधी पक्षातील नेत्यांची.पण ती आशा मावळली आहे.विरोधी पक्षातील नेते तर जास्त बेशिस्त आहेत.तेच अवैध धंदे करण्यात व्यस्त आहेत.यातीलच काही हरामखोर भाजप कडे जाऊन भ्रष्टाचाराचे गुऱ्हाळ चालवत आहेत.जे उरलेले आहेत ते सुद्धा भाजपच्या वाटेवर आहेत.कोण बोलणार भ्रष्टाचार विरोधात?
लोक राहुल गांधी कडे बोट दाखवतात.पण राहुल गांधी यांच्याच कांग्रेस मधील नेते, पदाधिकारी बेशिस्त,बेवडे, बदमाष आहेत.या लोकांना भाजप विरोधात लढण्याची उर्मी नाही,गर्मी नाही.शक्यता वाटत नाही.शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे अनुयायी भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत.ते बचावासाठी सुरक्षित खंदक शोधत आहेत.
मोदी आणि भ्रष्टाचार,मोदी आणि अत्याचार विरोधात आता जनतेने गांधीजी आणि जेपींच्या मार्गाने एकत्रित लढायला तयार झाले पाहिजे.सर्वात आधी तर आसपासचे आमदार खासदार मंत्री जे जनतेशी गद्दार आहेत त्यांनाच जेरबंद केले पाहिजे.याच नालायक, हरामखोर आमदार खासदार मंत्री मुळे भ्रष्टाचार बोकाळला आहे.दोन लाख लोक एक आमदार निवडून देतात तर दोन हजार लोकांना एक चोर जास्त भारी पडणार नाही.आधी याचा बंदोबस्त करणे हिच पुढील आंदोलनाची सुरुवात होऊ शकते.
भारतातील तरूण भगतसिंग राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंग्रा, उधमसिंग, चंद्रशेखर आझाद यांचा चाहता आहे.तर यांचाच मार्ग तरूणांनी अनुसरला पाहिजे.तुमच्या ताटातील वाटा कोणी चोरला? तो चोर त्या जिल्ह्यातील तरूणांनी उलटा टांगून झटकला पाहिजे.त्याचा खिसा खाली केला पाहिजे.
या व्यतिरिक्त काही चांगला आणि रामबाण उपाय असेल तर सुचवला पाहिजे.एकमेकांना कळवला पाहिजे.जेणेकरून तरूणांमध्ये उत्साह,साहस निर्माण होईल.जोपर्यंत चोरांची चीड येत नाही तोपर्यंत लढण्याचे मनोबल येत नाही.चोरांची चीड येणे हे क्रांतीचे पहिले लक्षण आहे.
आधी फर्मान काढले पाहिजे.
“चोरांनो ,चोरलेला माल सरकारी तिजोरीत जमा करा नाहीतर शिक्षा भोगायला तयार व्हा ! “
काल जळगाव शहरातील शंभर फूट रस्ता डांबरीकरण करण्यासाठी शंभर लोकांनी आमदार सुरेश भोळे यांना घेराव घातला.रस्ता बनवा नाहीतर राजीनामा द्या.गर्दी पाहून आमदार खरे बोलायला लागले.त्यांनी ताबडतोब आदेश दिला कि उद्या या रस्त्यावर खडी, मुरूम,विटा टाका.पुढील अधिवेशनात या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देऊ.
… शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव
ReplyForward Add reaction |
0Shares