• 85
  • 1 minute read

मंगळवारी १६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा.

मंगळवारी १६ सप्टेंबरला टिळक भवनमध्ये काँग्रेसचा रोजगार मेळावा.

४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार, बेरोजगार तरुणांसाठी मोठी संधी.

मुंबई, दि. १२ सप्टेंबर २०२५
राज्यात बेरोजगारांची संख्या प्रचंड वाढलेली असून शिक्षण असूनही रोजगार मिळत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार नोकर भरती करत नसल्याने लाखो पात्र मुले-मुली रोजगारापासून वंचित आहेत. तरुणांच्या हाताला काम मिळावे या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने पुढाकार घेतला असून मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागातर्फे आयोजित या रोजगार मेळाव्यात आयटी, बँकिंग, रिटेल, हेल्थकेअर, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रांतील ४० पेक्षा जास्त नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. या माध्यमातून तरुणांना शेकडो नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यातील इयत्ता ८ वी पासपासून उच्च शिक्षित गरीब व मध्यम वर्गीय तरुणांसाठी ही विशेष संधी आहे. बेरोजगार तरुणांनी

https://forms.gle/1Y7mScKgSAc9tY1E8

या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी व या मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.

0Shares

Related post

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व संघाच्या ब्राह्मणी राष्ट्र निर्मितीच्या वायरसमुळे देशाची एकता, अखंडता व आरोग्य धोक्यात…..!

संसदीय प्रणालीला लागलेल्या ” संघी वायरस ” व किड्यांना ठेचणे हेच देश हिताचे…..! देशाची एकता, अखंडता,…
स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

स्मशानातून आंबेडकरांचा पुतळा बाहेर काढण्यासाठी अखेर राज असरोंडकर यांनी उपसलं बेमुदत उपोषणाचं हत्यार !

जेव्हापासून हा पुतळा मी स्मशानात पाहिलाय, तेव्हापासून माझ्या मनाला वेदना – राज असरोंडकर तब्येतीच्या कारणामुळे अलिकडच्या…
अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव….!

अशोक खरात व झिरवळ प्रकरणाकडे फडणवीस संधी म्हणून पाहत आहेत, हेच फुले, शाहू, आंबेडकर यांच्या महाराष्ट्राचे…

मंत्री आणि मंत्र्यांचे बेडरूम ही सुरक्षित नसतील, तर याला कायद्याचे राज्य म्हणायचे का ?    …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *