आज दिनांक २५ डिसेंबर, खऱ्या अर्थाने स्री मुक्ती व बंधूता दिवस. भारतीय बंधूत्वाचे व अखंडत्वाचे जतन करून, त्यास वृद्धिंगत करा. डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी अमानवीय धर्मग्रंथ, मनुस्मृती, चे जाहीर दहन केले. चुल, मुल व भोगवस्तू समजल्या जाणाऱ्या स्त्रीला, तसेच अस्पृश्य म्हणून गणल्या गेलेल्या पशुहूनी जीवन जगणाऱ्या मानवाला मनुस्मृतीच्या भयावह जोखंडातून मुक्त केले. भारत देश स्वतंत्र झाल्यावर, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला बुद्ध शिकवणूकीवर आधारित माणसाला माणूसपण बहाल करणारे स्वातंत्र्य, समता, बंधूता व न्यायावर आधारित मानवतावादी संविधान लिहून, देशात माणसाला माणूसपण बहाल करणाऱ्या बंधूत्वाची पाया भरणी केली. परंतू, काही मुठभर मनुवादी, हिंदू व हिंदुत्वाच्या नावावर भारतीयांना भावनिक करून, पुन्हा मनुस्मृती लादू पाहत आहेत व देशातील बंधूता जात व धर्माच्या नावावर नष्ट करू पाहत आहेत. अशा देश विघातक, मनुस्मृती लादू पाहणाऱ्या मनुवादी औलादीचा डाव हाणून पाडा व भारतीय संविधानाचा व भारतीयत्वाचा बचाव करा. मी प्रथमतः आणि अंतिमतःही भारतीयच आहे, डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश ध्यानी ठेवून, भारतीय बंधूत्वाचे व अखंडत्वाचे जतन करा.