• 80
  • 1 minute read

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे प्रत्यक्षात भरडल्या जाणाऱ्या लोकांची बैठक.

मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे प्रत्यक्षात भरडल्या जाणाऱ्या लोकांची बैठक.

आमंत्रित :- मुळ विमुक्त भटक्या जमाती ( बंजारा वगळुन ) व कमकुवत ओबीसी बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी ( धनगर ,वंजारी ,माळी वगळुन ) त्याच बरोबर आंबेडकरी समाज्यातील मदत करणारे कायदे तज्ञ.

         महोदय आज मराठा आरक्षणाचा ते ही ओबीसी मधूनच या भुमिके मुळे मुळ विमुक्त भटक्या जमाती व कमकुवत ओबीसी बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी यांची एकत्रीत बैठक आयोजित केली आहे .स्वातंत्र्यानंतर लोकशाहीच्या प्रक्रियेत हा वर्ग आलाच नाही .या दोन्ही वर्गामध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय अल्प आहे व ग्रामीण व शहरी पातळीवर कोणतेही ठोस उत्पन्नाचे साधन नाही .राजकीय प्रतिनिधित्व तर विशेषतः लोकसभेत व विधानसभेत आमचे प्रतिनिधित्वच नाही .सुरुवातीला काँग्रेसच्या सर्व समाज समावेशक भुमिकेमुळे बलुतेदार अलुतेदार वर्गातील रत्नाप्पा कुंभार ,शंकरराव जगताप ,कांत्या कोळी अश्या लोकांना प्रतिनिधित्व मिळाले त्यानंतर हळूहळू जातीयता कमी होण्याऐवजी ती वाढतच गेली .त्यामुळे या तीस वर्षात तर हा समाज पुर्ण दुर्लक्षितच झाला .अर्थात त्याला फक्त प्रस्थापित वर्गच जबाबदार आहे असे नव्हे आम्हीही तितकेच जबाबदार आहोत .आज थोडे बहुत का होईना शिक्षणाचे प्रमाण आहे .किमान काही लोक तरी मध्यमवर्गीय व थोडे बहुत श्रीमंत आहेत .पण आपण आपल्या भुमिकाच काही ठरवत नाही .अंतर्गत जातीभेद हे ही मोठे कारण आहे आज सर्व समाज समावेशक सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक व राजकीय लोकशाही या वर्गाला मिळण्यासाठी याच वर्गातील हा विषय समजणाऱ्या लोकांनी एकत्रीत कार्यक्रम ठरवुन सर्व समाज समावेशक भुमिका घेऊन त्यातल्या त्रुटी दुर करणे .सांघिक काम करण्याची भुमिका घेणे .स्थानिक स्वराज्य संस्था असो की लोकसभेत व विधानसभेत प्रतिनिधित्व मिळणे हा आपला अधिकार नव्हे काय ? आपली गुलामी व कच खाऊ वृत्ती बाजूला सारुन एकमेकांना समजून घेऊन काम करण्यासाठी एकत्रीत बैठक आयोजित केली आहे .कृपया इच्छुक लोकांनी आपण हजर राहणार असल्यास आपला होकार कळवावा ही विनंती . ‌‌‌‌‌

आपला स्नेहांकित :–

तुकाराम माने

9833484637

0Shares

Related post

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

“रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक”

रुपया डॉलर विनिमय: वर्गीय परिणाम आणि परकीय गुंतवणूक  रुपया डॉलर विनिमयाच्या चर्चांमध्ये वर्गीय आयाम टेबलावर आणण्याची…
स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार

स्मार्टफोन, टीव्ही, बाजारपेठ: बदललेल्या जीवनशैलीवर लोकांचे मिश्रित विचार ती लहानपणची बाहुली किंवा विदूषक आठवतोय ? कसाही…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *