• 80
  • 1 minute read

मराठा-धनगर उपाशी अन् बाकी सगळ्या मागास जाती तुपाशी, आहेत कां ?

मराठा-धनगर उपाशी अन् बाकी सगळ्या मागास जाती तुपाशी, आहेत कां ?

मराठा-धनगर उपाशी अन् बाकी सगळ्या मागास जाती तुपाशी, आहेत कां ?

महाराष्ट्रात दोनच जातीचे प्रश्न प्रलंबित आहेत अशी स्थिती निर्माण केली जात आहे .एक आहे मराठा व दुसरी धनगर .मग महाराष्ट्रातील अनुसुचित जाती मधील 59 जाती अनुसुचित जमाती म्हणजे खऱ्या आदिवासी जाती जमाती ,मुळ विमुक्त भटक्या जाती जमाती म्हणजेच कैकाडी ,टकारी ,रामोशी ,वडार ,वैदु कोल्हाटी अशा 42 जाती मग ओबीसी मधील बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी ,आगरी ,कोळी ,भंडारी अशा जाती या सर्व जातींचे प्रश्न सुटले आहेत काय ? अशा जाती मधील पोर रोज तुपात बुडवून चपाती खातात काय ,शिक्षणामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे काय ? या जाती जमाती मधील जे खासदार ,आमदार आहेत ते याच जाती मधील आहेत काय? सगळ्या शैक्षणिक संस्था ,साखर कारखाने ,दुध डेअरी,वाळु माफीया याच वर्गातील आहेत काय ? सत्य परिस्थिती काय आहे याचा विचार होणार आहे की बळी तो कान पिळी हेच होणार आहे ,देश किंवा राज्य संविधानानुसार चालणार आहे की दांडगाव्याने चालणार आहे ? संविधानाचा जो मध्यवर्ती गाभा आहे “” न्याय ,स्वातंत्र्य, समता व बंधुत्व “” त्यालाच गाठण्यासाठी हे डांबरट पुढे आणले जात आहेत का ? लोकशाहीचे उदातींकरण करायचे आहे की खाजगीकरण हे स्पष्ट दिसत असतानाच सर्व जनता झोपली आहे की झोपेच सोंग घेतलेली आहे .इतक्या उदासिनतेने या सर्व बाबींकडे अनुसुचित जाती ,अनुसुचित जमाती ,मुळ विमुक्त भटक्या जाती जमाती ,ओबीसी मधील बलुतेदार अलुतेदार मायक्रो ओबीसी मुस्लिम ओबीसी जर पहात असतील तर आता जी गुलामगिरी डोक्यावर बसेल ती पुन्हा हजारो वर्षे निघणार नाही .आणी महात्मा फुले ,छत्रपती शाहु महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहलेल्या संविधानातील तरतुदी मुळे कोणताही लढा न लढता सहजासहजी मिळाल्या मुळे ही उदासिनता आलेली आहे .मार्टीन ल्युथर किंगचे चरित्र वाचा तुम्हाला समजेल फक्त काळा आणी गोरा इतक्याच भेद मिटवण्यासाठी जगातील लाखो करोडो लोकांचे प्राण गेलेले आहेत .मराठा आणि धनगर समाज्यातील काही लोकांना हाताशी धरुन लोकशाही नासवण्याचे काम चालु आहे .आता जर अनुसुचित जाती ,जमाती ,मुळ विमुक्त भटके ,कमकुवत ओबीसी मुस्लिम ओबीसी जागे झाले नाहीत तर डोक्यावर घोंघावणारा जातीवाद ,धर्म वाद ,खाजगीकरणाचा ब्रह्मराक्षस तुमचा जीव घेतल्या शिवाय राहणार नाही हे निश्चित.

– तुकाराम माने.

0Shares

Related post

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन

7 नोव्हेंबर प्रज्ञासूर्य डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांचा शालेय प्रवेश दिन. अस्पृश्यांच्या न्याय हक्कासाठी  गांधीजींना “मला मायभूमी नाही” असे.…
सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!

सत्ताधारी आणि विरोधक संविधानाशी बेईमानच! परिवर्तनवादी नव्या राजकारणाची गरज!      भारतीय संविधानाचे पहिले जाहीर उल्लंघन…
महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

महाराष्ट्राला कफल्लक करणं, हीच शिंदे-फडणवीस सरकारची फलश्रुती !

मोदी-शहा -फडणवीस या त्रिकुटामुळे महाराष्ट्र कफल्लक !        छत्रपती, फुले, शाहू अन आंबेडकर यांचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *