मनुष्यकेंद्री समाजनिर्मितीचा माणसाचा प्रवास काही हजार वर्ष, सिव्हिलायझेशन इतकाच जुना आहे.
त्या त्या काळातील विचारवंत त्याचे टॉर्च बेअरर असतात. निसर्गक्रमानुसार ते काळाच्या पडद्याआड जातात. पण त्यांचे भविष्यवेधी विचार त्यांच्यानंतर देखील जिवंत राहतात.
इथे एक गोची तयार होते. विचारवंत गेल्यानंतर त्यांच्या विचारांचे नेमके अर्थ काय होते याचे स्वांतत्र्य त्याच्या विचारानुसार चालण्याचा दावा करणाऱ्या त्याच्या अनुयायांना मिळते. एकाच विचारवंताला, तत्वज्ञाला अनेक गट तयार होतात.
इथे मुळात विचार म्हणजे काय ? त्याचे उद्दिष्ट काय असे प्रश्न विचारले पाहिजेत.
इथे गांधीजी पुढे येतात. “ सत्याचा शोध खरा. विचारव्यूह / आयडीयाज त्या सत्या पर्यंत जाण्याच्या मार्ग आहेत. सत्याचा शोध घेतांना मांडलेल्या विचारात सातत्याचा आग्रह मी धरत नाही. पुढे जाऊन आपण भूतकाळात कवटाळलेले विचार चुकीचे होते असे मला वाटले तर मी पूर्वीच्या विचारांचा त्याग करतो” (Harijan April 29 1933)
स्वतंत्र प्रज्ञा असणाऱ्यांचे हे सामायिक लक्षण म्हणता येईल